LIVE BLOG | राज ठाकरेंच्या टीकेने मोदींना फरक पडणार नाही : मुनगंटीवार

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिंडोरीमध्ये धनराज महाले यांना उमेदवारी मिळाल्याने त्या नाराज होत्या

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Mar 2019 11:31 PM
काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, नऊ जणांपैकी महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश, मुंबई दक्षिण मध्य मधून एकनाथ गायकवाड, यवतमाळ-वाशिममधून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी
पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल, राष्ट्रपतींकडून नियुक्ती
कोणी शाप दिला म्हणून नरेंद्र मोदींसारख्या कार्यक्षम पंतप्रधानांना फरक पडणार नाही, राज ठाकरेंच्या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर
उबर इट्स, झोमॅटो आणि स्विगी या अन्नपदार्थ पुरवणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांना नाशिक अन्न आणि औषध प्रशासनाची नोटीस, या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजनी सुरक्षित अन्न हाताळण्याचा परवाना सात दिवसात न घेतल्यास कारवाई, नाशकात या कंपन्यांचे जवळपास 3 हजार 500 डिलीवरी बॉईज

बीड-कल्याण महामार्गावर अंमळनेर चेकपोस्टवर अडीच कोटींची रोख रक्कम पोलिसांकडून जप्त, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची कारवाई, रक्कम बीडच्या एका मल्टिस्टेटची असल्याची माहिती, ज्या गाडीतून रोकड नेली जात होती, ती गाडी बीडच्या एका दैनिकाच्या नावावर असल्याची पोलिसांची माहिती
नाशिक : राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार, दिंडोरीमध्ये धनराज महाले यांना उमेदवारी मिळाल्याने नाराजी
भाजपचे लोक तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर ते घ्या,
त्यांनी देश लुटला आहे, तुम्ही त्यांना लुटलं तर काहीही हरकत नाही : राज ठाकरे
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश, रणजितसिंह मोहिते पाटील यांची घोषणा
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश, रणजितसिंह मोहिते पाटील यांची घोषणा
परभणी : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदविरोधात गुन्हा, परवानगी न घेता पूर्णा शहरात रॅली काढल्याचा ठपका, उमेदवार आलमगीर पठाण यांच्यासह 40 जणांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, पूर्णा पोलिसांची कारवाई
अंबरनाथ : ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात मोठी आग, सुकलेल्या झाडा-झुडुपांनी पेट घेतल्याने आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु
तब्बल 29 वार केलेल्या बाळू खकाळ खून प्रकरणात पाच आरोपीना जन्मठेप,
आष्टी तालुक्यातील केरुळ येथील बहुचर्चित रवींद्र उर्फ बाळू खाकाळ खून प्रकरणाचा निकाल लागला,
सचिन सूर्यवंशी, सय्यद गौस सय्यद नूर, भाऊसाहेब मोहन साबळे, महेंद्र सेवकराम महाजन आणि नितीन संजय शिंदे या पाच जणांना जन्मठेप
#Mumbai
एखाद्याच्या जीवनमानावर घाला घालून विकास होणार असेल तर ते योग्य नाही - मुंबई उच्च न्यायालय,
'कोस्टल रोड' प्रकल्पाबाबत सरकारी यंत्रणेत सुसूत्रता नाही,
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका कोणीही एकमेकांच्या संपर्कात नसल्याने हायकोर्टाने सुनावले

नागपूर : काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला अंतरिम स्थगिती, नागपूर खंडपीठाचा निर्णय, अडीच ते तीन महिन्यासाठी निवडणूक घेऊन प्रशासन आणि उमेदवारांचे पैसे वाया जाऊ नये यासाठी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल

मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे सोपवला, लवकरच काँग्रेस अध्यक्ष याबाबत निर्णय घेणार
मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे सोपवला, लवकरच काँग्रेस अध्यक्ष याबाबत निर्णय घेणार
मुंबई : मल्टिप्लेक्सचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या सूर सपाटा या चित्रपटाला केसरी सिनेमामुळे मुंबई सह उपनगरात एकही शो नसल्याची निर्मात्यांची माहिती. निर्माते मनसे चित्रपट शाखेकडे. याबाबत आता तीव्र आंदोलन करण्याचा अमेय खोपकर यांचा इशारा.
भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता
नागपूर : यशोधरानगर परिसरात शेर ए पंजाब लॉन जवळ काल रात्री पोलिसांनी 5 जणांना धारधार शस्त्रांसह अटक केली आहे. अब्दुल शाफिक, अब्दुल रफीक, मो इरफान, शेख नजीर आणि मो शकील हे पाच आरोपी एका इंडिका कारमध्ये हत्यार घेऊन चालल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली गेली.
नागपूर रेल्वे स्थानकात जिवंत काडतुसं सापडली, प्लॅटफॉर्म नंबर 7 च्या बाजूला मेंटेनन्स विभाग कार्यालयाच्या बाजूला ही काडतुसं सापडली
अशोक चव्हाण नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदाराने निवडणूक लढवावी, प्रदेशाध्यक्षाने निवडणूक लढवत नाही तर चुकीचा संदेश जाईल, म्हणून पक्षश्रेष्ठीनेच आग्रह केला की, अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती. तर अशोक चव्हाण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याची चर्चा होती.
रणजितसिंह मोहिते पाटील यांचा आज होणार भाजप प्रवेश , खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलुज येथील शिवरत्न बंगल्यावर बोलावली महत्वाची बैठक

पुणे : पुण्यात भारत आणि आफ्रिकन देशांचा संयुक्त लष्करी सराव ,
27 मार्चपर्यंत चालणाऱ्या लष्करी सरावात 18 देशांचा सहभाग
#BREAKING दिल्ली : राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांची एकत्रित चर्चा, महाराष्ट्रातील स्थितीबाबत आणि जागावाटपावर तासभर चर्चा, महाराष्ट्रातील आघाडीच्या जागावाटपाचं चित्र लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता, राधाकृष्ण विखे पाटलांच्या बाबतीत जे झालं त्याबद्दल काँग्रेस हायकमांडची नाराजी
यवतमाळ : आचारसंहिताचा भंग केल्याप्रकरणी प्रेमासाई वर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल यवतमाळच्या लोहारा पोलिसात गुन्हा दाखल , विनापरवानगी चारचाकी वाहनांची रॅली काढली होती
यवतमाळ : आचारसंहिताचा भंग केल्याप्रकरणी प्रेमासाई वर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल यवतमाळच्या लोहारा पोलिसात गुन्हा दाखल , विनापरवानगी चारचाकी वाहनांची रॅली काढली होती
नंदुरबार : शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ दोन गटात हाणामारी. माळीवाडा व हमालवाडा या भागातील दोन गट आमने सामने. पूर्व वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी. हाणामारीत लाठ्या काठ्या सह हत्यार वापर. हाणामारीत भाजपा नगरसेवक आनंद माळी गंभीर जखमी. पोलिसांनी केली धरपकड सुरु, शहरात तणावपूर्ण शांतता

नागपूर : एकाच कुटुंबातील तीन लहान मुला-मुलींना खाद्यपदार्थातून विषबाधा , नागपूरच्या पारडी परिसरातील रामनगर मधील घटना, रविवारी दुपारी दुकानातून मॅगीचे पॅकेट्स आणून खाल्यानंतर संध्याकाळी सर्वांना उलटी, पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पार्श्वभूमी

1. भाजप नेते प्रमोद सावंत बनले गोव्याचे नवे मुख्यमंत्री, तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई उपमुख्यमंत्री पदी विराजमान

2. 14 हजार कोटींचं कर्ज बुडवणारा नीरव मोदी एबीपीच्या कॅमेऱ्यात कैद, प्रश्नांना उत्तर न देताच काढता पाय, लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

3. चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही, बोटयात्रेच्या पहिल्याच दिवशी प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

4. प्रियंका गांधी पप्पी तर नरेंद्र मोदी शेर, देशाचे सांस्कृतिक मंत्री महेश शर्मांचं बेताल वक्तव्य,

5.एअरस्ट्राईकमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा मागणाऱ्या शरद पवारांचं घूमजाव, दहशतवाद्यांच्या आकड्याची चर्चा नको, पवारांची नवीन फेसबुक पोस्ट

6. रिलायन्स कम्युनिकेशननं इरिस्कन कंपनीला 458 कोटी दिले, सूत्रांची माहिती, कंपनीने वेळेत पैसे दिल्यानं अनिल अंबानींची जेलवारी टळली

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.