LIVE BLOG : भारताची दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सनी मात, कर्णधार विराटचे शानदार अर्धशतक 

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Sep 2019 11:01 PM
मुंबईसह ठाणे आणि डोंबिवलीत मुसळधार पाऊस
मुसळधार पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत
मंत्रालयात दोघांनी घेतल्या उड्या, जाळीवर उडी मारली, व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची धावपळ
मंत्रालयात दोघांनी घेतल्या उड्या, जाळीवर उडी मारली, व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची धावपळ
सांगली : विटा-वाळूज मार्गावर एसटी बस पलटी, बसमधील 35 हून अधिक विद्यार्थी जखमी, जखमी विद्यार्थी उपचारासाठी विटामधील शासकीय रुग्णालयात दाखल
पुणे : शिरुर तालुक्यातील न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल
रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात तीन जण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश तर एकाचा शोध सुरुच, तिघेही सांगलीतील इस्लामपूर येथील रहिवाशी
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस, आंदोलन किंवा शांतता भंग केल्यास कायदेशीर कारवाई होणार, काल मनसेने भाजपच्या होर्डिंग्सची आरती करत केलेलं आंदोलन
नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहरात मध्यरात्री झाली रस्त्याची कामे, रोड शोच्या मार्गावर महापालिकेचा रात्रीस खेळ चाले, मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार त्या मार्गावरचे सर्व खड्डे बुजवले
नाशिक : राष्ट्रवादीचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचं रात्रभर जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन, जिल्हा परिषदेतून सिमेंट बंधाऱ्याच्या फाईल गहाळ झाल्याचा आरोप, जिल्हा परिषदेचे काम निकृष्ठ होत असून जो पर्यंत समाधानकारक कारवाई होत नाही तो पर्यंत न हटण्याचा निर्धार

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार, हवामान खात्याचा अंदाज, येत्या 48 तासात मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा

2. नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा, आरेवरून शिवसेनेला इशारा, तर भूमिपुत्रांच्या विरोधामुळेच नाणारला विरोध, आदित्य यांचं वक्तव्य

3. विधानसभेसाठी उमेदवारांची यादी तयार करा, कृष्णकुंजवरच्या बैठकीत राज ठाकरेंचे मनसे नेत्यांना आदेश, सूत्रांची माहिती

4. अमृता फडणवीसांकडून नरेंद्र मोदींना फादर ऑफ कन्ट्रीची उपमा, पंतप्रधानांची महात्मा गांधींसोबत तुलना करण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा आरोप

5. 17 नोव्हेंबरला सरन्यायधीशांच्या निवृत्तीपूर्वी अयोध्या प्रकरणी निकाली काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत, वकिलांना महत्त्वाच्या सूचना

6.पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारताच्या नियंत्रणाखाली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मोठं विधान, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकलाही खडेबोल

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.