LIVE BLOG : कर्जबुडव्या नीरव मोदी 'एबीपी'च्या कॅमेऱ्यात कैद
कर्जबुडव्या नीरव मोदी 'एबीपी'च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लंडनमधील कोर्टाच्या अटक वॉरंटनंतर नीरवच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
19 Mar 2019 12:08 AM
यवतमाळ : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रेमासाई आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, यवतमाळच्या लोहारा पोलिसात गुन्हा, विनापरवानगी चारचाकी वाहनांची रॅली काढली होती
गोवा : मगोचे दोन आमदार नितिन गडकरींच्या भेटीसाठी सिदादीमध्ये, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर आणि गोवा साधन सुविधा महामंडळाचे अध्यक्ष दीपक पावसकर गडकरींच्या भेटीला, दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा, गोव्यात स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याची पावसकरांंची माहिती
गोवा : गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा, कृषीमंत्री विजय सरदेसाई केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सिदादीमध्ये दाखल, सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणारं पत्र अद्याप दिलेलं नाही, आता चर्चा होणार असल्याची सरदेसाईंची माहिती
भाजपच्या बैठकांचे सत्र सूरुच,
नितिन गडकरींकडून गोव्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा,
सभापती प्रमोद सावंत, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, उपसभापती मायकल लोबो, पंचायत मंत्री माविन गुदीन्हो, आमदार ग्लेन टिकलो, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आदी नेतेमंडळी गडकरींसोबतच्या बैठकीला हजर

प्रमोद सावंत यांचा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आजच होणार, सावंत यांना आज रात्री 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ
प्रमोद सावंत यांचा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आजच होणार, सावंत यांना आज रात्री 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, हृदयविकाराच्या सौम्य झटक्यानंतर पीटर मुखर्जी यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्यास सीबीआय कोर्टाची परवानगी, मुखर्जींवर बायपास किंवा अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटना, स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक, कलम 304 (2) अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटना, स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला अटक, कलम 304 (2) अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय थोड्याच वेळात होणार, अमित शाह यांची माहिती
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय थोड्याच वेळात होणार, अमित शाह यांची माहिती
पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला अटक होण्याची शक्यता, लंडन कोर्टाने आदेश दिल्यावर लंडनमध्येच बेड्या पडण्याची चिन्हं
पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला अटक होण्याची शक्यता, लंडन कोर्टाने आदेश दिल्यावर लंडनमध्येच बेड्या पडण्याची चिन्हं
मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटनेविरोधात हायकोर्टात नवी याचिका, मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त, रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह महापौरही प्रतिवादी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी तर जखमींना 25 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी
अमरावती | जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल, चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथील वैद्यकीय अधिकारी महिलेकडूनच तक्रार, तक्रारदार महिलेचा अमरावती पोलिस अधीक्षक कार्यालयात गोंधळ, महिलेकडून पेट्रोलने भरलेली बॉटल जप्त, आरोपींना पोलिस अभय देत असल्याचा आरोप
उपस्थितांच्या मागणीनंतर खासदार उदयनराजे भोसलेंची कॉलर उडवून स्टाईलबाजी
गोव्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार उपमुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्र गोमांतक पार्टीच्या सुदिन ढवळीकर यांच्या नावाची चर्चा विजय सरदेसाईदेखील उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता
गोव्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार उपमुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्र गोमांतक पार्टीच्या सुदिन ढवळीकर यांच्या नावाची चर्चा विजय सरदेसाईदेखील उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर टोलजवळ अपघात, कारचा चक्काचूर, प्रवासी किरकोळ जखमी, उपचारासाठी खोपोलीतील रुग्णालयात दाखल

मुंबई : वरळीजवळ समुद्रात रेवती नावाची बोट बुडाली, बोटीतील 7 लोकांपैकी एकजण बेपत्ता, 6 जण सुरक्षित
गोव्यात दुपारी तीन वाजल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी- गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकरांची माहिती
मुंबई शेअर बाजाराची उसळी, निर्देशांक ३५० अंशांनी उसळला. एअर स्टाईक नंतर शेअरबाजारात लगातार वाढ दिसून येतीय. एअर स्ट्राईकनंतर निर्देशांक तब्बल २२०० अंशांनी वाढलाय.
#BREAKING यवतमाळ : टीपेश्वर अभयारण्यातील T-4 वाघिणीचा गळ्यात तार अडकून जखमी झाल्याने मृत्यू, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनच्या मार्गदर्शनानुसार आज वाघिणीचे शवविच्छेदन होणार
पार्श्वभूमी
राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची कर्करोगाशी झुंज अपयशी, पणजीतल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, गोव्यावर शोककळा
2. आज संध्याकाळी पणजीत पर्रिकरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर
3. पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात दाखल, मुख्यमंत्रीपदासाठी पक्षनेतृत्वाकडून शोधाशोध
4. माझ्या सल्ल्यानंतरच मोदी सरकारकडून एअरस्ट्राईक, चाकणमध्ये शरद पवारांचा खळबळजनक दावा, श्रेयवादाचं राजकारण उफाळण्याची शक्यता
5. लोकसभेत मनसेचं इंजिन यार्डातच राहणार, निवडणूक लढवणार नसल्यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध, राज ठाकरे कुणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
6. खोतकरांचं बंड थंड करण्यात उद्धव आणि मुख्यमंत्र्यांना यश, विधानसभेत दगाफटका न करण्याच्या अटीवर लोकसभेतून माघार, जालन्यात दानवेंचा मार्ग सुकर