LIVE BLOG | 30 सप्टेंबरपर्यंत आरेतील वृक्षतोड करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Sep 2019 03:36 PM
केंद्रीय निवडणूक आयुक्तांची उद्या पत्रकार परिषद, राज्यातील निवडणुकीची माहिती देणार, मात्र उद्या निवडणूक जाहीर होणार नाही
अहमदनगर : आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाज आक्रमक,
संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा,
हजारोंच्या संख्येने समाज बांधव एकवटले,
शहरातून काढला भव्य मोर्चा
मुंबईतील मेट्रो, कोस्टल रोड, आरे कारशेड, वृक्षतोड, इत्यादी पर्यावरण संवर्धनासंदर्भात दाखल याचिकांवर मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी, एकाच विषयावरील कोणत्या याचिकांवर तातडीने सुनावणी आवश्यक आहे, कोणत्या जुन्या याचिका, अर्ज निकाली काढता येतील याची चाचपणी सुरू
सोलापूर : शरद पवार यांचे सोलापुरात आगमन, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात, शरद पवारांचे चार पुतळा चौकात जल्लोषात स्वागत
नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण 100 टक्के भरले, धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

नाशिक : कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकरण, सरकारवाडा पोलीस संशयित आरोपींचा घेणार ताबा, महारयत कंपनीचे संचालक आणि पदाधिकारी सुधीर मोहिते, हनुमंत जगदाळे, विजय शेंडे आणि संदीप मोहिते विरोधात नाशिकमध्ये गुन्हे दाखल, पुरावे गोळा करण्यासोबतच 19 शेतकऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम जवळपास पूर्ण

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. विधानसभेसाठी भाजपची 288 जागांवर चाचपणी, नाशिकमध्ये गिरीश महाजनांचं वक्तव्य, शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा देताना युती होणार असल्याचाही पुनरुच्चार

2. नाणारचं झालं तेचं आरेचं होईल, विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून भाजपवर दबावतंत्र, तर कारशेडसाठी आरेला पर्याय नाही, अश्विनी भिडेंची स्पष्टोक्ती

3.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा वाढदिवस, देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव, गुजरातच्या केवडिया जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

4. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज कोल्हापूरमार्गे कोकणात, तर शरद पवार सोलापूर, उस्मानाबादच्या दौऱ्यावर

5. पेट्रोल-डिझेलचे दर 5 ते 6 रुपयाने वाढण्याची शक्यता, सौदी अरेबियातील अराम्को कंपनीच्या तेल विहिरींवरच्या ड्रोन हल्ल्यानंतर इंधन टंचाईचं संकट

6. आज 2019 मधली एकमेव अंगारकी संकष्टी, दर्शनासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी, पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.