- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG : नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग, अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल
LIVE BLOG : नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग, अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
17 Aug 2019 11:03 PM
गणपतीपुळे येथे पर्यटक बुडाले दोन महिला, एका पुरुषाचा समावेश,
गणपतीपुळे समुद्रावर समुद्राचा आनंद घेण्यासाठी समुद्रात गेलेल्या पर्यटकांपैकी तीन पर्यटक बुडाले आहेत.सदर पर्यटक हे कसबा बावडा, कोल्हापूर येथील आहे, मूळ गाव हुबळी, कर्नाटक असल्याची माहिती मिळाली आहे.
काजल मचले, सुमन मचले मृतदेह मिळाले, तर उमेश अशोक बागडे, वय 28 हा बेपत्ता आहे.
या दुर्घटनेतून किसन मचले,पूजा बागडे, निर्मला मचले, ऐश्वर्या मिनेकर हे वाचले आहेत.
नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग, अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल
नांदेड : कॉंग्रेसचे माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार, शहरातील चौफाळा येथे त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार, घटनेत पाठीत लागली गोळी, कारण अस्पष्ट, घटनास्थळी पोलीस दाखल
मुंबईच्या मानखुर्द विभागात असलेल्या महाराष्ट्र नगरचा रस्ता चिखलमय झाला आहे. या ठिकाणी मेट्रोच्या कारशेडची निर्मिती सुरू असून यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि चिखल होत आहे. या विरोधात स्थानिक शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी काल चिखलात बसून आंदोलन केले होते. आज देखील या रस्त्याची अवस्था तशीच असल्याने आमदारांनी या ठिकाणी ठिय्या केला.
देहूच्या इंद्रायणी नदीत बुडून एकाचा मृत्यू झालाय. कमलाकर रानडे असं त्यांचं नाव असून एका कंपनीत ते चालक म्हणून काम करत होते. आज सकाळी साडे दहा वाजता इतर कर्मचाऱ्यांना कंपनीत सोडून तो मित्रासोबत नदीत पोहायला उतरला. मात्र तो बाहेर आलाच नाही, सोबतच्या मित्राने ही बाब पोलिसांना सांगितली.
गडचिरोली : शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरून युवक काँग्रेस झाली आक्रमक, गडचिरोली शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात केले आंदोलन
नाशिक- नाशिकरोड येथील अनुराधा सिनेमगृहाला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती, शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात आली. सिनेमागृह आठ वर्षांपासून आहे बंद
महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील अथवा जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावे.
, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या विक्रम भावेचा जामिनासाठी अर्ज, परंतु सी बी आय विशेष न्यायालयाने तो जामीन अर्ज आज फेटाळला .
औरंगाबाद : पैठण शहराच्या दत्त मंदिरापाठीमागे गोदावरी पत्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुले बुडल्याची माहिती. एकाला सुखरूप बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती, दुसरा बुडालेला मुलगा वाहुन गेला, शोध सुरू
पालघर : दमणच्या समुद्रात संशयित स्पीड बोट, सागरी पोलीस, तटरक्षक दल तसेच मच्छिमारांना सतर्क राहण्याच्या सूचना, सर्च ऑपरेशन सुरु
घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर एलबीएस मार्गाकडे जाणार रस्ता बंद : -
मुंबईकरांना आता आणखी एकी रस्तेबंदीला सामोरे जावे लागणार आहे. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर जागृती नगर मेट्रो स्थानकाखाली पूल बांधण्याचे काम एमएमआरडीएतर्फे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील एक वर्ष जुन्या घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर एलबीएस मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद रहाणार आहे. त्यामूळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर एलबीएस मार्गाकडे जाणार रस्ता बंद : -
मुंबईकरांना आता आणखी एकी रस्तेबंदीला सामोरे जावे लागणार आहे. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर जागृती नगर मेट्रो स्थानकाखाली पूल बांधण्याचे काम एमएमआरडीएतर्फे सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील एक वर्ष जुन्या घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर एलबीएस मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद रहाणार आहे. त्यामूळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सांसद आदर्श गाव योजनेअंतर्गत त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील पूरग्रस्त गाव दत्तक घ्यावे,
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
दारु तस्करीसाठी अनोखी शक्कल, देव्हाऱ्याखाली दारुची टाकी : -
दारुविक्रीसाठी एका दारूविक्रेत्याने अनोखी शक्कल लढवली आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी चक्क देव्हाऱ्याखालीच भूमिगत टाके करून दारू तस्करी केली जात होती. यवतमाळ ग्रामीण पोलीसांनी त्याचा भांडाफोड केला आहे.
सांगली : दिपाली सय्यदने पूरग्रस्तांच्या 1000 मुलींच्या विवाहाची जबाबदारी घेतली, सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून 5 कोटी रुपयांची मदत करणार, सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करून घोषणा
यवतमाळ : अवैध दारु विक्रीसाठी देवघराच्या खाली दारूचा साठा,
पोलिसांनी कारवाई करत जप्त केला साठा, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी देवघराखाली भूमिगत टाक्या
रत्नागिरी : कोल्हापुरातील तिघे गणपतीपुळे समुद्रात बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले, तिसऱ्याचे शोधकार्य सुरु, तिघेही मुळचे कर्नाटकातील असून कामानिमित्त कोल्हापूर येथे राहत होते
नाशिक : इगतपुरीच्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी झाली चर्चा, विकासासाठी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण, कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करणार
औरंगाबाद : चौथीच्या विद्यार्थीनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला नागरिकांचा चोप, कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना, मुख्याध्यापकाविरोधात पोशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ऐन गणेशोत्सवात फेरीवाले हटवणार, मुंबईभर झळकले कठोर कारवाईचे फलक
रायगड : रायगड पोलीस मुख्यालयात असलेल्या विश्रामगृहात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काणेकर यांची आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
पार्श्वभूमी
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
1. सुरक्षा परिषदेत पाकिस्तान पुन्हा तोंडावर, काश्मीर मुद्यावरुन फक्त चीनचा पाठिंबा, इतर देश भारतासोबत
2. उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बिघाड, सीएनजी बस, टॅक्सी आणि कार चालकांना फटका बसण्याची शक्यता
3. राष्ट्रवादीची ऑफर धुडकावून काँग्रेसप्रवेश हीच राणेंची घोडचूक, राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी पवारांचं विधान, तर राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4. पुरामुळं ब्रेक मिळालेल्या राजकीय घडामोडींना वेग, रात्री उशिरा भाजपच्या प्रचारसमितीची बैठक, तर मुंबईत पवारांच्या निवासस्थानी सकाळी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक
5.अंतर्वस्त्र उद्योगालाही आर्थिक मंदीची झळ, अर्थतज्ज्ञ ग्रीनस्पॅन यांच्या थिअरीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा, माझाचा स्पेशल रिपोर्ट
6. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच कायम, बीसीसीआयकडून 2021 पर्यंत नियुक्ती