LIVE BLOG : PG Medical Maratha Reservation | खुल्या प्रवर्गातील पालक-विद्यार्थी मार्च काढणार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 May 2019 11:22 PM
येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे 'मेगा'हाल

▶️कल्याण ते कसारा लोकल मार्गावर इंटिग्रेटेड ब्लॉक, रविवारी सकाळी 11.15 ते 2.45 कालावधीत पूर्णतः बंद, लांब पल्ल्याच्या गाड्यांची वेळ किंवा मार्ग बदलणार

▶️माटुंगा ते मुलुंड अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 ते 3.15 पर्यंत ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे आणि बीएमसी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक, पाणी साचून रेल्वे बंद पडू नये यावर चर्चा, डीआरएम एस के जैन आणि बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशींची उपस्थिती, गेल्या वर्षीच्या 19 उच्च क्षमता असलेल्या पाण्याच्या पंपांच्या जागी 27 पंप बसवण्याची मध्य रेल्वेची बीएमसीला मागणी

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी निघणाऱ्या मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आणि पालकांचा मार्च निघणार, मुंबईत वांद्र्यातील कार्टर रोड परिसरात आयोजन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार संभाजी पाटील यांचे निधन
सोलापूर : काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडनेकूर हत्येप्रकरणी MIM नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर गुन्हा, तौफिक शेख यांनी रेश्मा यांच्याकडून 13 लाख घेतल्याचा आरोप, पैसे परत करण्याच्या बहाण्याने रेश्मा यांना घरातून नेऊन हत्या केल्याची रेश्मा यांचे पती बंदेनवाज पडनेकूर यांची पोलिसात फिर्याद, आरोपी तौफिक शेख परागंदा
नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूरच्या डोक्यावर परिणाम, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची टीका, प्रज्ञा सिंहवर पक्षाने कारवाई करावी, भारतातून घालवून देण्याचीही मागणी
मेडिकल पीजी प्रवेशातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, पालकांना उद्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यास आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली.अध्यदेश निघाल्यानंतर खुल्या प्रवर्गतील विद्यार्थी पालक आक्रमक, उद्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या तयारीत
नाशिक : बनावट हेल्मेट विरोधात कारवाई करण्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे पोलिसांना आदेश, नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी चांगल्या प्रतिचे हेल्मेट खरेदी करण्याचे पोलिसांकडून आवाहन
राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेता निवडीसाठी काँग्रेस आमदारांची बैठक होणार, प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे सोमवारी मुंबईत बैठक घेणार
महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा दशतवादीच होता : प्रकाश आंबेडकर
सोलापूर : काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांची हत्या झाली आहे. मागील काही वर्षांपासून नगरसेवक तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यात वाद सुरु होता. तौफिक शेख यांच्याविरोधात रेश्मा यांनी 17 एप्रिल रोजी विनयभंगाची तक्रार दिली होती. मागील काही दिवसापासून त्या बेपत्ता होत्या. तर काळ रात्री 7 वाजता कोलार गावात त्यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आज विजयपूर येथे शवविच्छेदनसाठी आणलं जाणार आहे. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. सीबीआयने राजीव कुमार यांच्यावर सारधा चिटफंड घोटाळ्याचे पुरावे नष्ट करण्याचा आरोप लावला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला कायदेशीरित्या योग्य कारवाई करण्याची परवानगी दिली आहे. पण राजीव कुमार यांना एका आठवड्यात अटक होणार नाही. यादरम्यान राजीव कुमार स्वत:साठी उपलब्ध कायदेशीर पर्याय निवडू शकतात.

सांगली : सांगलीत कृष्णा नदी काठावरुन मगरीने ओढून नेलेल्या आकाश जाधव या मुलाचा मृतदेह सापडला
सांगली-इस्लामपूर रोडवरील तुंगजवळ आज दोन अपघात झाले. पहिला अपघात कंटेनरचा झाला. जयसिंगपूर इथून पुण्याला निघालेला कंनेटनर तुंगजवळ पुढील चाकाचे रॉड तुटल्याने दुभाजकाला धडकून रस्त्यावर आडवा झाला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर दुसरा अपघात हा आष्ट्याहून सांगलीला निघालेली स्विफ्ट गाडीचा झाला. पहाटे पाचच्या सुमारास तुंग मिणचे मळ्याजवळ दुभाजकाला स्विफ्ट धडकून पलटी झाली, यातील तीघेजण किरकोळ जखमी झाले.
पुणे : ब्रेक निकामी झाल्यामुळे पीएमपीची बस सिंहगड कॉलेजच्या तीव्र उतारावरुन सुसाट सुटत थेट हॉटेलमध्ये घुसली, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नाही, सिंहगड कॉलेजवरून बस स्वारगेटकडे जात असताना ब्रेक निकामी होऊन अपघात, बस उतारावरून वेगाने आल्याने कठड्याला धडकून हॉटेलमध्ये शिरली

राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळविरोधात पत्नीची आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा, फसवणूक तसंच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी दत्तूविरोधात गुन्ह्याची नोंद
भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांच्याकडून ट्विटरवरुन साध्वी प्रज्ञांचं समर्थन
यवतमाळ : बनावट कागदपत्र करुन भूखंड हस्तांतरण केल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, न्यायालयाच्या आदेशानंतर अवधुतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद
यवतमाळ : बनावट कागदपत्र करुन भूखंड हस्तांतरण केल्याप्रकरणी यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, न्यायालयाच्या आदेशानंतर अवधुतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद
मुंबई : सीएसएमटी इथल्या हिमालय पूल दुर्घटना प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना सादर करण्यात आला. प्राथमिक चौकशी अहवालात दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांची नावं वगळता नव्याने कुठल्याही अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आलेला नाही. महापालिकेच्या ए विभागाने पूल सौंदर्यीकरणासाठी पूल विभागाकडे एनओसी मागितली होती. परंतु ते पूल विभागाने तात्काळ न दिल्याने ए विभागाने परस्पर पुलाच्या सौंदर्यीकरणाचे काम केल्याचं अहवालात म्हटलं आहे.

कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळ असलेल्या खणीत पोहायला गेलेल्या मुलीचा मृत्यू झाला. समृद्धी अमित सूर्यवंशी असं मृत मुलीचं नाव आहे. रंकाळा परिसरातील खणीमध्ये ती नेहमी पोहायला जात होती. समृद्धी ही बालवक्ता म्हणून देवकर पाणंद परिसरात प्रसिद्ध होती. तिच्या आशा अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे.

पार्श्वभूमी

1. महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त, चौफेर टीकेनंतर आढेवेढे घेत साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा, निवडणूक आयोगाने अहवाल मागावला

2. पंतप्रधान मोदींना तुरुंगात खेचेन, ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती तोडल्याच्या आरोपावरुन ममता बॅनर्जी आक्रमक तर पश्चिम बंगाल वगळता इतरत्र आज प्रचाराचा शेवट

3. मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशाचा तिढा सोडण्यासाठी आज अध्यादेश, निवडणूक आयोगाच्या मंजुरीने सरकारचा जीव भांड्यात

4. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा, आंब्याच्या स्टॉलवरुन राजकारण शिगेला

5. घराचा ताब मुदतीच्या वर्षभरानंतर मिळाला नाही तर ग्राहकांना संरक्षण, पैसे परत मागण्याचा अधिकार, राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा बिल्डरांना चाप

6. बीएमडब्यू एक्स5 च्या नव्या मॉडेलचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते अनावण, कारची किंमत 73 ते 83 लाखाच्या घरात, तर चालकाशी बोलणारी एमजी हेक्टरही लाँच

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.