LIVE BLOG | जे नाणारचं झालं तेच आरेचं होईल : उद्धव ठाकरे

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Sep 2019 10:16 PM
पुणे : मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेऊन जेजुरीला येत असलेल्या भाविकांच्या बसला जेजुरीजवळ अपघात, सात जण गंभीर तर 20 जण किरकोळ जखमी
मुंबई : विकासकामांना खीळ घालण्यासाठी चुकीची माहिती देत हायकोर्टाची दिशाभूल करण पडलं महागात. पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली कोर्टात खोटी माहिती सादर केल्याबद्दल दंड, नवी मुंबईतील अभिव्यक्त या सेवाभावी संस्थेला एक लाखाचा दंड, रक्कम विधी व सहाय्य विभागाला देण्याचे निर्देश
LIVE : जे नाणारचं झालं तेच आरेचं होईल, आरेसंदर्भात उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका
इस्लामपूर - कडकनाथ कोंबडी पालन घोटाळाप्रकरणी सांगली रस्त्यावर जनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या, स्वाभिमानीचे कार्यकर्ते कोंबड्या आणि अंडी फेकून फरार, ताकारी-पलूस रोडदरम्यान स्वाभिमानीचं आंदोलन
पुणे : खासगी बस-कारचा भीषण अपघात, विख्यात सर्जन केतन खुर्जेकर यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू
सातारा : धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले, धरणातून 25 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु
शिर्डी : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचं निधन, 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगमनेर तालुक्यावर शोककळा, दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार

औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे उघडले, 8 हजारपेक्षा अधिक क्युसेक वेगाने पाण्याच विसर्ग सुरु

सांगली : राष्ट्रवादीवर आगपाखड करत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुखाची काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. विधानसभेला युती होईलच, पण गाफील राहू नका, कार्यकर्त्यांच्या मेऴाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून

2.विकासाच्या कामांबाबत आघाडी सरकारच्या काळात उदासिनता, नाव न घेता उदयनराजेंचं पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र, मेगागळतीवरून आत्मचिंतन करण्याचा पलटवार

3. भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात, संध्याकाळी 6 वाजता इचलकरंजीत तर 8 वाजता कोल्हापुरात जाहीर सभा

4. पळपुट्या नेत्यांचा जनताच समाचार घेईल, भाजपमधील मेगाभरतीवर शरद पवारांचा टोला, आज पवार नाशिक दौऱ्यावर

5. जायकवाडी धरणाचे 4 दरवाजे उघ़डले, 1 हजार 57 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु, तर पालघर, विसाई, विरारलाही पावसानं झोडपलं

6. पबजी गेममुळे कोल्हापुरातील तरुणाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं, रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तरुण पबजीच्याच भाषेत बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.