LIVE BLOG | एनडीए-1 च्या कार्यकाळात जाहिरातींवर एकूण 5909 कोटींचा खर्च
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
शेतात पाणी भरताना विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू,
अकोले तालुक्यातील गर्दणी येथील घटना,
संगिता झोळेकर (42) आणि अविष्कार (16) या मायलेकांचा मृत्यू
नाशिक : सिन्नर तालुक्यातील सुनीता शरद जाधव या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू
,
पाडळी गावात शेतात काम करत असताना साप चावल्याने मृत्यू,
नाशिक जिल्ह्यातील सर्पदंशाने मृत्यू झाल्याची 8 दिवसातील दुसरी घटना
ऑल फूड अँड लायसन्स होल्डर फाऊंडेशनचा निर्णय,
औषध पुरवठादारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकल्याच्या निषेधार्थ औषध पुरवठा बंद,
रुग्णांचे हाल होण्याची शक्यता
अंधेरी, जोगेश्वरीमध्ये हलक्या सरी
गोरेगाव आणि जोगेश्वरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल उशिराने
पार्श्वभूमी
1. 15 सप्टेंबरपासून राज्यात विधानसभेची आचारसंहिता, तर 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान निवडणूक, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत
2. आजपासून मुंबई मनपाच्या रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा बंद, काळ्या यादीत टाकल्याने औषध पुरवठादार संघटनेचा निर्णय, रुग्णांचे हाल होण्याची शक्यता
3. महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून पोहोचल्याची हवामान खात्याची वर्दी, मात्र प्रत्यक्षात राज्याचा अनेक भाग कोरडाच, तर महाराष्ट्राच्या चेरापुंजीतही पावसाची प्रतिक्षा
4. ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी आज पुणे येथे मुक्कामी, दुपारी संगमवाडी पुलावर दोन्ही पालख्यांचा संगम, तर भिडेंना माऊलींच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाही
5. फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, अँटिग्वा सरकारकडून चोकसीचं नागरिकत्व रद्द, लवकरच प्रत्यार्पण होण्याची शक्यता
6. विश्वचषकाच्या रणांगणात आज पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी, पाकिस्तानसाठी करो या मरो तर सामना जिंकल्यास न्यूझीलंड उपांत्य फेरीत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -