LIVE BLOG | जळगावात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, घटनेनंतर मुलांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणून मिठात ठेवले

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Aug 2019 12:00 AM

पार्श्वभूमी

1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पहिली पुण्यतिथी, राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण2. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर, तीन सैनिकांचा खात्मा, कृष्णा घाटी परिसरात गोळीबार3. कलम 370 हटवल्याच्या...More

शेतमालाची उत्पादकता, विपणन आणि निर्यातीवर अधिक भर, देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी बैठक, या बैठकीत बाजार समितीच्या कायद्यामध्ये सुधारणा, करार शेती, शेतीत नवीन तंत्रज्ञान, जीवनाश्यक वस्तू कायद्यातून कृषी उत्पादनांना वगळणे, ई-नाम, कृषी निर्यात आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांनी मते व्यक्त केली.

या सर्व मुद्दयांवरील चर्चेवर पुढील आठवडाभरात सर्व राज्ये आपल्या सूचना देणार असून पुढील पंधरा दिवसात निती आयोगासोबत सर्व राज्याच्या कृषी विभागाच्या सचिवांची बैठक घेण्यात येईल. त्यात अहवालाचा मसुदा तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या समितीसमोर सादर केला जाईल. साधारण: दिड महिन्यात अहवाल अंतिम करून प्रधानमंत्र्यांना सादर केला जाईल, अशी माहिती बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.