LIVE BLOG | गोडसेबाबत वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहचा माफीनामा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 May 2019 10:34 AM
सीएसएमटीमधील हिमालय पूल दुर्घटना प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना सादर, प्राथमिक चौकशी अहवालात दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांची नावं वगळता नव्याने कुठल्याही अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आलेला नाही
नथुराम गोडसे देशभक्त असल्याच्या वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहचा माफीनामा, 'ते माझं वैयक्तिक मत, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, कोणाचं मन दुखावलं असल्यास माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं, ते विसरता येण्यासारखं नाही. माध्यमांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास'

ठाणे : मनसेच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी, मात्र ठाणे महापालिका मुख्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार
ठाणे : मनसेच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी, मात्र ठाणे महापालिका मुख्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार
'बलात्काराच्या खटल्यांमध्ये केवळ पीडितेची जबानी पुरेशी नाही, तसे पुरावेही असायलाच हवेत'. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. ठाणे सत्र न्यायालयानं बलात्काराच्या आरोपांखाली सुनावलेली ७ वर्षांची सक्तमजुरी हायकोर्टाकडून रद्द
नवी मुंबई : ब्लॅकमेल करुन पैसे उकळणाऱ्या रबाळे पोलिस ठाण्याच्या पाच कर्मचाऱ्यांचं निलंबन, कारमध्ये अश्लील चाळे करत असल्याचा आरोप करत पोलिसांनी केलेली दोन लाखांची मागणी, महिलेच्या तक्रारीनंतर डीसीपी सुधाकर पाठारेंकडून पाच पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन

सांगली : मौजे डिग्रजमध्ये कृष्णा नदीच्या काठावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील लहान मुलाला मगरीने ओढून नेले, बारा वर्षांच्या आकाश जाधवचा शोध सुरु
कौन बानेगा करोडपती या कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक जणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा हुबेहूब आवाज काढून तुम्हाला सात कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे, असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
चंद्रपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाडीसमोर अचानक गाय आल्यामुळे वरोऱ्यात अपघात, सुरक्षारक्षक जखमी, भागवत सुखरुप
#BREAKING
कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन, मुलीचा पोलिसाकडून विनयभंग,
याप्रकरणी पोलीस कर्मचारी चेतन घाडगे याला अटक
कलम 354 आणि पॉक्सोअंतर्गत घाडगेवर कारवाई
#Kolhapur
मराठा आरक्षण पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकरणी निवडणूक आयोगाकडून अध्यादेश काढण्यासाठी परवानगी, सूत्रांची माहिती, उद्या अध्यादेश काढण्याची चिन्हं, मराठा आरक्षण पीजी मेडीकलचा तिढा सोडवण्याबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार
कोलकात्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पदयात्रा, पश्चिम बंगालचा लोकसभा प्रचार आज रात्री दहा वाजता थंडावणार

शरद पवारांनंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही दुष्काळी दौऱ्यावर, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दुष्काळी गावांना भेट, दौऱ्याची सुरुवात जिरेगावातून, पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती असलेल्या गावातील लोकांशी सुप्रिया सुळेंची चर्चा
भोपाळ : नथुराम गोडसे देशभक्त होते, भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वक्तव्याने पुन्हा वाद
मुंबई : अवैध जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरण, नगरसेवकपद रद्द झालेल्या पालिका प्रभागात पोटनिवडणुका जाहीर करण्यास हायकोर्टाची स्थगिती, दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची नगरसेवकपदावर दावा सांगत हायकोर्टात धाव, 12 जूनपर्यंत निवडणुका जाहीर करु नका, जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार सुनावणी
डोंबिवली : कोपर रेल्वे स्थानकात तिकीट विचारल्याने प्रवाशाची टीसीला मारहाण, जानू वळवी असं मारहाण झालेल्या टीसीचं नाव, डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, मारहाण करणारा प्रवासी किशन परमारला अटक
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील अनेक भागात माओवाद्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 19 मे रोजी जिल्हा बंद करण्याचं आव्हान बॅनरमार्फत दिलं आहे.
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील अनेक भागात माओवाद्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 19 मे रोजी जिल्हा बंद करण्याचं आव्हान बॅनरमार्फत दिलं आहे.
अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून आज सोनं प्रति तोळा 33,000 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात एकाच आठवड्यात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून आज सोनं प्रति तोळा 33,000 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात एकाच आठवड्यात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
पुणे : पुण्यातील शनिवार पेठेत लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. प्रभात टॉकीजसमोरील गल्लीत असलेल्या पाच मजली जोशी संकुल या इमारतीत आग लागली होती. या इमारतीत एकूण 20 फ्लॅट्स आहेत. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अडकलेल्या सर्व 25 रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
पुणे : पुण्यातील शनिवार पेठेत भीषण आग लागली आहे. प्रभात टॉकीजसमोरील गल्लीमध्ये असलेल्या एका इमारतीत आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धुरात अडकलेल्या चार जणांची जवानांनी सुटका केली असून टेरेसवर असलेल्या अंदाजे दहा जणांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत.
पुणे : चिखलीत मित्राकडून मित्राची दगडाने ठेचून हत्या, आरोपी फरार, हत्येचं नेमकं कारण अस्पष्ट
इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात,
धरणाच्या गाळ मोऱ्यातून 1700 क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात,
सोलापूर शहर व नदीकाठच्या गावांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार,
सध्या उजनी धरणाची पाण्याची पातळी उणे 39 टक्के

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. एक्झिट पोलशी संबंधीत ट्वीट काढण्याचे निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश, एक्झिट पोलशी निगडीत ट्विट हटवले जाण्याची शक्यता

2. पश्चिम बंगालमधील प्रचार आजच थांबणार, कोलकाता हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व निर्णय, तर ममता बॅनर्जींची जोरदार रॅली

3. लोकसभा निकालानंतर राज्यात मोठ्या फेरबदलाची शक्यता, राधाकृष्ण विखे, विजयसिंह मोहिते आणि जयदत्त क्षीरसागरांना भाजप-सेनेकडून मोठी खाती

4. आसामच्या गुवाहाटीत मॉलबाहेर स्फोट, सहा जण जखमी, ग्रेनेड स्फोट असल्याचा पोलिसांचा संशय

5. मान्सून 6 जूनला केरळमध्ये दाखल होणार, स्कायमेटनंतर भारतीय हवामान खात्याचा अंदाज, महाराष्ट्रातही पावसाचं आगमन उशिराने होणार असल्यानं बळीराजा चिंतेत

6. चंद्राचा आकार 50 मीटरनं कमी झाल्याची नासाची माहिती, टायडल फोर्समुळे चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याचाही दावा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.