LIVE BLOG | BIG BREAKING | विधानसभेच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीवर काळे ढग, उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Sep 2019 10:23 PM
उस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह पाच जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यात, उदयनराजे आणि
शिवेंद्रसिंहराजे मुख्यमंत्र्यांसोबत एकाचं मंचावर
BIG BREAKING | विधानसभेच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीवर काळे ढग, मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती
हिंगोली : कळमनूरी ते नांदेड रोडवर भीषण अपघात,

अपघातात 33 जण किरकोळ जखमी तर दोघांची प्रकृती चिंताजनक
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सातारा शहरात दाखल, उदयनराजे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष
औरंगाबाद : जायकवाडी धरण 99.28 टक्के भरलं, 100 टक्के भरल्यानंतर जायकवाडीतून विसर्ग सुरु होणार, नाशिकमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ
सांगली : सांगली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का,

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांंची काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी
,
सत्यजित देशमुख विधानपरिषदेचे माजी सभापती, दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र
,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या येणाऱ्या महाजनादेश यात्रेत सत्यजित देशमुख याचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता
गडचिरोली : पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, दोन नक्षल्यांना कंठस्नान, गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापती पोलीस केंद्राअंतर्गत येणाऱ्या जंगलात चकमक, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त, नक्षल्यांचा कॅम्प असल्याची माहिती
मुंबई उपनगरात रात्रभर पावसाची संततधार, अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मिरारोड परिसरात पाऊस, कल्याण, डोंबिवली परिसरातही पावसाची जोरदार हजेरी
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, बदलापूर स्थानकाजवळ विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने

पार्श्वभूमी

1. युतीच्या दाव्यानंतरही शिवसेना-भाजप स्वबळाच्या तयारीत असल्याची शक्यता, दादरमध्ये भाजपकडून 288 जागांसाठी चाचपणी, तर आज शिवसेनेची मातोश्रीवर खलबतं

2. दिल्लीत सोनिया गांधी, शरद पवार आणि अमित शहांमध्ये बैठक झाल्याचा प्रकाश आंबेडकरांच्या कार्यालयाचा दावा, बैठकीतील तपशील जाहीर करावा, वंचितचे पवारांना आव्हान

3. उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल, अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश, आज पुणे आणि साताऱ्यात राजेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचं शक्तीप्रदर्शन

4. विधानसभेला मनसेला सोबत घेणार नाही, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाडांकडून स्पष्ट, तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्याची शक्यता

5. बारामतीत मुख्यमंत्र्यांचा पवार काका-पुतण्यावर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा सौम्य लाठीमार

6. सौदी अरेबियातील तेल विहिंरीवर ड्रोन हल्ले, अराम्कोमधील पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपनी निशाण्यावर, परिसरात धुराचे लोण

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.