LIVE BLOG : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार मैदानात

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनवणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Mar 2019 11:43 PM

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. मुंबई सीएसएमटीलगतचा पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू तर 31 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती2. पूल दुर्घटनेत जीटी रुग्णालयातील 3 परिचारिकांचा मृत्यू, वडिलांसोबत गेलेल्या...More

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचं आज रात्री 8 वाजता शहरातआगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करीत मुख्य मार्गानं मिरवणूक काढली.