- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG : राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, विखेंसोबत चंद्रकांत पाटील देखील उपस्थित
LIVE BLOG : राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, विखेंसोबत चंद्रकांत पाटील देखील उपस्थित
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाव्य मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत 'वर्षा'वर पोहचण्याचा निरोप देण्यात आला आहे.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
15 Jun 2019 11:56 PM
मुंबई : वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्तारावर महत्वाच्या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील वर्षा बंगल्यावर दाखल
पश्चिम रेल्वेचा यु टर्न, मसाज न देण्याचा घेतला निर्णय, इंदोर स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाश्यांना मिळणार होती सुविधा, मात्र आज अचानक पत्रक काढून ही सेवा न देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून जाहीर
उद्याच्या राज्यमंत्रिमंडळाचा विस्तारात राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राजकुमार बाडोले आणि दिलीप कांबळे यांची खुर्ची जाण्याची शक्यता, तर आशिष शेलार, योगेश सागर आणि अतुल सावे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले,
विखेंसोबत चंद्रकांत पाटील देखील उपस्थित
सातारा : उदयनराजेंच्या विरोधात रामराजे समर्थक आक्रमक, उदयनराजेंच्या विरोधात घोषणा देत फलटण शहर कार्यकर्त्यांकडून बंदची हाक
अकरावी प्रवेशासाठी नामवंत कॉलेजेमधील अनुदानित जागा वाढवण्याची आणि बायोफोकलचा इनहाउस कोटा रद्द होणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी अभविपला दिलं आश्वासन, जागा वाढल्याने SSC सहित सर्वच परीक्षा मंडळांच्या विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा..
नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधित विभागाकडून गुन्हा दाखल
, दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्यानं गुन्हा दाखल
#BREAKING
EVM मशीन आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे सर्व 48 उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार,
17 जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांसमोर कार्यकर्ते घंटानाद आंदोलन करणार
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी 11 वाजता, रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर होणार मंत्री
सांगली : सांगली जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बापू पाटील यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन, चंद्रकांत पाटील तासगाव तालुक्यातील सावळज गटाचे जिल्हा परिषद सदस्य, शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील मुंबईल निघाले होते
खासदार विनायक राऊत यांची शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी निवड
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार, सूत्रांची माहिती, संभाव्य मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत 'वर्षा'वर पोहचण्याचा निरोप
पुणे : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी दस्ताने दाम्प्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी दस्ताने दाम्प्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड अर्थात अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी दस्ताने दाम्प्त्यांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : शेतातील विजेची तार तुटल्याने शॉक लागून 100 हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील घटना
नाशिकमध्ये गावगुंडाचा धुमाकूळ सुरुच, म्हसरुळ परिसरात पहाटे दोन कारची तोडफोड, स्कॉर्पिओ आणि फिगो कारच मोठं नुकसान, म्हसरुळ पोलीस घटनास्थळी दाखल
'वायू' चक्रीवादळाने पुन्हा मार्ग बदलला, 36 तासाचा गुजरातच्या कच्छमध्ये पोहोचण्याची शक्यता, गुजरातमधील किनारी भागात एनडीआरएफच्या टीम तैनात
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबूपेठच्या सिटी शाळा परिसरात चवताळलेल्या माकडांचा दोघांना चावा, काल सुमारे 7-8 नागरिकांना घेतला चावा, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल, माकडांना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू
झारखंडमध्ये 20-25 नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, पाच पोलीस जवान शहीद, एक बेपत्ता
पार्श्वभूमी
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा, स्वत: मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
2. बिश्केक परिषदेदरम्यान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात चर्चा, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा, भारताकडून अद्याप दुजोरा नाही
3. ममता बॅनर्जींनी बिनशर्त माफी मागावी, संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांची मागणी, कोलकात्यात झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातल्या डॉक्टरांचा संपात सहभाग
4. मालाड,अंधेरी आणि गोवंडीत अंगावर झाड कोसळल्यानं तिघांचा मृत्यू, तर ठाण्यात रस्ता खचून 3 गाड्या काही फूट खाली
5. तिसऱ्या अपत्यासाठी 50 हजार तर चौथ्या आपत्यासाठी 1 लाखांची मदत, लोकसंख्या घटत असलेल्या माहेश्वरी समाजाचं चेतना लहर अभियान
6. उन्हाळी सुट्टीत अंबाबाई चरणी कोट्यवधीचं दान, दानपेटीत 1 कोटी 7 लाख रुपये जमा, अल्पावधीत जमा झालेलं आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी