LIVE BLOG | सोलापुरात राज ठाकरे आणि शरद पवार एकाच हॉटेलमध्ये मुक्कामाला
आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना 48 तासांची, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 72 तासांची प्रचारबंदी, उद्या सकाळी सहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाची बंदी
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
15 Apr 2019 11:52 PM
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर पाच विकेट्सनी विजय
परभणी : परभणीत वीज पडून 2 जण ठार, 10 मेंढ्यांचा मृत्यू, पाथरी तालुक्यातील अंधापुरी शिवारातील घटना, बाळू काळे, कृष्णा शिंदे यांचा मृत्यू
नाशिक : मनमाड परिसरात विजांचा कडकडाट पावसाला सुरुवात
राज ठाकरेंच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा गेल्या पाच वर्षात मारलेल्या थापा मोजा : राज ठाकरे
नागपाडा पोलिस स्टेशन समोरच्या बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगचा स्लॅब कोसळला, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
यंदा देशात सरासरीच्या इतकाच पाऊस होणार. 96 टक्के पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज
वर्ल्ड कप 2019 साठी क्रिकेट संघाची घोषणा, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी यांचा समावेश
आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना 48 तासांची, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 72 तासांची प्रचारबंदी, उद्या सकाळी सहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाची बंदी
काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीत गोंधळ, मातोंडकरांकडून पोलिस संरक्षणाची मागणी, भाजपने रॅलीत गुंड घुसवल्याचा आरोप
एकनाथ गायकवाड यांच्याकडून कोणाताही संपर्क नाही, तर राहुल शेवाळे संपर्कात आहे, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मी युतीचा प्रचार करणार, काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा इशारा
दंतवैद्यक अभ्यासक्रमातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, 103 व्या घटनादुरुस्तीबाबत याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश, प्रवेश प्रक्रियेत 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा कोटा लागू करण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा
मुंबई : काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीदरम्यान गोंधळ, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मोदी-मोदीच्या घोषणा, काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
औरंगाबाद : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा, थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन करणार घोषणा, हर्षवर्धन जाधव औरंगाबाद लोकसभेतून अपक्ष उमेदवार
#BREAKING झारखंडमध्ये नक्षलवादी आणि सीआरपीएफमध्ये चकमक
गडचिरोली : नक्षली घडामोडीमुळे मतदान न झालेल्या केंद्रावर आज मतदान, एटापल्ली तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात
नाशिक विमानसेवेचे ग्रहण सुटता सुटेना, मुंबई, पुण्यानंतर दिल्लीचं विमानही जमिनीवर,
जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद, आर्थिक डबघाईमुळे जेट एअरवेजकडून सेवा बंद
भाजप आमदार मंदा म्हात्रेंवर गुन्हा दाखल,
आचारसंहितेचा भंग केल्याचा मंदा म्हात्रेंवर आरोप,
म्हात्रे यांनी मतदारांना 23 एप्रिलला साताऱ्यात नरेंद्र पाटील आणि 29 एप्रिलला राजन विचारेंना ठाण्यात मतदान करण्याचे आवाहन केले होते
बुलडाण्याच्या मेहकर-डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात
ट्रक आणि स्कॉर्पिओ कारमधील अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर तर एक किरकोळ जखमी
पार्श्वभूमी
चित्रदुर्गमधल्या सभेत नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून संशयित पेटारा उतरवल्याचा काँग्रेसचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
ईव्हीएमवरुन पुन्हा राजकारण तापलं, विरोधक सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार, दिल्लीत पत्रकार परिषद घेत थेट मोदींना आव्हान
पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं षडयंत्र, माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजिज कुरेशी यांचं वादग्रस्त वक्तव्य
मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होतोय, अशोक चव्हाणांची कार्यकर्त्यांसमोर खदखद, गद्दार कार्यकर्त्यांना धडा शिकवण्याचं आश्वासन
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, नाशकात वीज पडून तिघांचा मृत्यू, आज मराठवाड्यात पावसाची शक्यता
क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ ठरवण्यासाठी निवड समितीचं आज मतदान; विराट आणि धोनीसह बाराजणांवर पसंतीची मोहोर नक्की, तीन जागांसाठी चुरस