LIVE BLOG : पंढरपूर | मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण मागे

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Aug 2019 11:05 PM
पुणे-सोलापूर हायवेवर कुरकुंभ येथील अल्कली अमाईन्स कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश सक्ती नाही, गणवेश नसला तरी विद्यार्थी शाळेत उपस्थित राहु शकणार,
विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकेही बालभारतीकडून मोफत देण्यात येणार, शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक
हिंगोली : सव्वा लाखाची अवैध देशी दारु आणि 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हा दाखल
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी एमआयएमकडून मुख्यमंत्री साहाय्यता निधीत 10 लाखांची मदत, असदुद्दीन ओवेसींची घोषणा
सांगली आणि कोल्हापूर भागात पुराचा फटका बसलेल्या लोकांना वीजबिल भरण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ, 15 ऑगस्टपर्यंत कोल्हापूर , सांगलीमध्ये जिथे पूर ओसरला असेल तिथल्या सर्व वीज जोडण्या पूर्ण करत वीजपुरवठा पुन्हा सुरू केला जाणार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
#पंढरपूर | मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर सहा दिवसांपासून सुरु असलेले #धनगर समाजाचं आमरण उपोषण मागे

पुणे: कात्रज बोगद्याजवळ वेळू कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू, बॉयलरमुळे लागलेली आग आटोक्यात
पुणे: कात्रज बोगद्याजवळ वेळू कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू, बॉयलरमुळे लागलेली आग आटोक्यात
मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून राज्यातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला, 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पुरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत जाहीर,

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना समितीकडून मदत मिळणार,

भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या 5 हजार साड्या महिलांना देणार,

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी वेगळी तरतूद करणार
,
समितीच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसांचा पगार म्हणजे 3 लाखांचा निधी देणार
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पुरग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत जाहीर,

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना समितीकडून मदत मिळणार,

भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या 5 हजार साड्या महिलांना देणार,

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी वेगळी तरतूद करणार
,
समितीच्या कर्मचाऱ्यांकडून एक दिवसांचा पगार म्हणजे 3 लाखांचा निधी देणार
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र, बेळगावच्या जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्तीचक्र, कुलगावमधे दहशतवादी हल्ल्यादरम्यान शहीद झाले होते प्रकाश जाधव,
स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युध्द सेवा मेडल
पंढरपूर : धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या आज सहाव्या दिवशी सरकारकडून मागण्या मान्य करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु, थोड्या वेळात मागण्या मान्य केल्याची घोषणा अपेक्षित
ठोसेघर ते सातारा शहराला जोडणा-या बोगद्यात पहाटे दरड कोसळली,

दरड बाजूला करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश,

तात्पुरती एकेरी वाहतूक सुरू,

बोगद्याच्या एका बाजूने कोसळतायत वारंवार दरड,

पर्यायी रस्ताच नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल
नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राईक करणाऱ्या वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचा गौरव होणार, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त करणाऱ्या तुकडीचा सन्मान
विंग कमांडर अभिनंदन अर्थमान यांना वीरचक्र

महापालिकेच्या कचरा उचलून नेणाऱ्या वाहनातून मोठ्या संख्येने कत्तल केलेल्या गायींचे अवशेष रस्त्यावर पडले, घटनेनंतर महापालिकेने अज्ञात आरोपींविरोधात गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला
धुळे : दोन दिवसांपूर्वी पांझरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या फुले नगरातील अक्षय सोनवणे या युवकाचा मृतदेह सापडला
मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार, 21 ते 31 ऑगस्ट दरम्यान 11 दिवसांची जनादेश यात्रा, पूरपरिस्थितीमुळे जनादेश यात्रा पाच दिवस उशिरा, नंदुरबारमधून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे, 55 मतदारसंघ, 39 जाहीर सभा, 50 स्वागत सभा, ही यात्रा 1839 किमी प्रवास करणार, समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार, महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर होणार
धनगर आंदोलनाचा आज सहावा दिवस , सर्वच आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळली, मात्र उपचार घेण्यास नकार

पार्श्वभूमी

1. सोन्याचे दर चाळीस हजारांचा पल्ला गाठण्याची चिन्हं, घरंगळत चाललेला शेअर बाजार आणि अमेरिका-चीनमधल्या व्यापारयुद्धाचे परिणाम

2. तुळजाभवानीच्या सिंहासन पुजेच्या बुकिंगमधला घोळ एबीपी माझाकडून चव्हाट्यावर, बातमीनंतर 2020 पर्यंतच्या पूजेच्या बुकिंग रद्द, पुजाऱ्यांना दणका

3. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारची 6 हजार कोटींची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना, केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष

4. वंचितला आघाडीत घेण्यासाठी हालचाली, काँग्रेस नेते वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे उशिरा रात्री प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

5. महिलेला चाकूहल्ल्याची धमकी देणाऱ्या गुंडाची नागपूरकरांकडून हत्या, जमावाच्या हल्ल्यात गुंड आशिष देशपांडे ठार

6. प्रियांका गांधींच्या कार्यकर्त्याकडून एबीपीच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की, कलम 370 प्रकरणी प्रश्न विचारल्यानंतर उगारला हात

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.