LIVE BLOG : नागपुरात नागरिकांकडून गुंडाची हत्या

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Aug 2019 11:28 PM
पंढरपूर : धनगर आरक्षण आंदोलनाबाबत मागण्यांचा निर्णय 15 ऑगस्ट दुपारपर्यंत न झाल्यास 9 आंदोलक चंद्रभागेत जलसमाधी घेणार, सध्या 9 आंदोलकांचे गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु
पंढरपूर : सांगवी येथील दोघांचा भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू, हनुमंत गलांडे आणि धुला गलांडे यांचा मृत्यू
उस्मानाबाद : तुळजापूर पुजाऱ्यांच्या गैरकारभाराला प्रशासनाचा ब्रेक, तुळजाभवानीच्या 2020 पर्यंतच्या बूक झालेल्या पूजा रद्द, आधारकार्ड असल्याशिवाय एन्ट्री नाही, पुजारी, प्रशासन यांची लवकरच बैठक होणार
अमरावती : बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीची धारदार शस्त्राने हत्या, अमरावतीच्या पोटे टाऊनशीप मधील थरारक घटना, पैसे घेऊनही घराचे बांधकाम अर्धवट सोडून दिल्याने त्रस्त झालेल्या १६ वर्षीय युवकाने संतापाच्या भरात हत्या केल्याचा संशय
मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरसावला, पूरग्रस्तांसाठी मागील चार दिवसात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल 8.50 कोटी रुपये जमा
मुंबई : राज्यातील पूर परिस्थितीमुळे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला होणारं राज्य सरकारचं स्नेहभोजन आणि चहापान रद्द
नागपूरमध्ये एका अट्टल गुन्हेगाराची सामान्य नागरिकांनी हत्या केली आहे. आशिष देशपांडे (32) हा गुंड नागपुरातल्या शांतीनगरमधील नालंदा चौक वस्तीतून अरुंद गल्ल्यांतून rash driving करायचा. शिवाय वस्तीतील नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, अमली पदार्थांचे सेवन करुन महिलांना त्रास देणे असे त्याचे प्रकार चालायचे. काल रात्री हा गुंड चाकू घेऊन वस्तीतल्या महिलांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी स्थानिक आणि देशपांडेमध्ये हाणामारी झाले. त्यामध्ये देशपांडे मारला गेला.
नागपूरमध्ये एका अट्टल गुन्हेगाराची सामान्य नागरिकांनी हत्या केली आहे. आशिष देशपांडे (32) हा गुंड नागपुरातल्या शांतीनगरमधील नालंदा चौक वस्तीतून अरुंद गल्ल्यांतून rash driving करायचा. शिवाय वस्तीतील नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे, अमली पदार्थांचे सेवन करुन महिलांना त्रास देणे असे त्याचे प्रकार चालायचे. काल रात्री हा गुंड चाकू घेऊन वस्तीतल्या महिलांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी स्थानिक आणि देशपांडेमध्ये हाणामारी झाले. त्यामध्ये देशपांडे मारला गेला.
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील नितवडे ते वाकीघोल दरम्यानचा 100 फूट रस्ता वाहून गेला, गारगोटीकडे येण्याचा मार्ग बंद
सर्वोच्च न्यायालयात अयोध्या जन्मभूमीवादाच्या नियमित सुनावणीच्या पाचव्या दिवसाला सुरुवात.. रामललाचे वकील परासरन यांचा युक्तीवाद संपला.. रामललाचे दुसरे वकील सीएस वैद्यनाथन यांचा युक्तीवाद सुरु.. त्यांच्या मते कोणतंही दैवीस्थान, जिथे प्रत्यक्षात कोणतीही मूर्ती नसली तरी त्याला हिंदू धर्मात देवाचाच दर्जा आहे. जसं की कैलास पर्वत आणि राम-सीतेच्या वास्तव्याने पुनीत झालेला चित्रकूट पर्वत

कोल्हापूर :
शिवारबा डोंगराला पाच किलोमीटरपर्यंत मोठ्या भेगा
, कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील वझरेपैकी खोतवाडी, पेरणोली, नावलकरवाडी आणि धनगरवाडा ही चार गावात भितीच्या छायेखाली, प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी हजर नाहीत
बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी पोलिसांच्या ताब्यात,
डीएसके घोटाळ्याप्रकरणी कारवाई
नागपूर : केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानं विमान उड्डाण रद्द, दिल्लीत दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या श्रद्धांजली सभेकरता निघाले होते नितिन गडकरी
पालघरमध्ये एसटीच्या बसला अपघात, शाळा आणि कॉलेजमधील 50 विद्यार्थी जखमी
येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा,
पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये बरसणार
कोल्हापूर : महापुराच्या विळख्यातून पुणे-बेंगलोर महामार्गाची सुटका, एक आठवड्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरु, कोल्हापूर-इचलकरंजी मार्गावरील बससेवाही सुरु
जायकवाडी धरणाची पाणी पातळी 90.95 टक्के पाणी साठा झाल्यास धरणाचे दरवाजे उघडणार, मात्र तूर्तास आवक कमी झाल्याने दरवाजे उघडण्याची शक्यता कमी, पाटबंधारे विभागाकडून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

पार्श्वभूमी

1. महापूर ओसरल्यानंतर कोल्हापूर सांगलीतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, पेट्रोल, चाऱ्यासह मुलभूत गोष्टींची मोठी चणचण, सगळीकडे चिखलाचं साम्राज्य

2. सांगली, कोल्हापुरातील पुराबाबत विनाकारण चुकीचे मेसेज व्हायरल करु नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन विभागाचं आवाहन

3. कोल्हापुरातील 5 उपकेंद्र सुरु, 19 गावांसह 11 वाड्यांचा वीजपुरवठा दिवसभरात पूर्ववत, आज 7 उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम होणार

4. राज्य मंत्रीमंडळाची आज अखेरची कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता, बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीविषयी चर्चा

5. मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण, वाहनचालकांचे हाल, तर अनेक एक्स्प्रेस रद्द झाल्याने मुंबई-पुणे एसटीच्या ज्यादा बससेवा

6. गेल्या 18 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुट्टी, डिस्कव्हरी चॅनेलच्या कार्यक्रमात मोदींचा खुलासा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.