LIVE BLOG : राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर चार विकेट्सनी विजय

भोर तालुक्यातील बांडेवाडी या गावातील यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Apr 2019 11:05 PM
डोंबिवली :डोंबिवली एमआयडीसीतल्या श्रीजी लाईफस्टाईल कंपनीत मोठी आग, अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई : ईशान्य मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मान-अपमानावरून हाणामारी, घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर भाजप कार्यालयच्या उद्घाटन प्रसंगी राडा, स्वागतावेळी भाजप अनुसूचित जाती -जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाटोळे यांचं नाव हेमंत भास्कर यांनी न घेतल्याने मारहाण
सोलापूर : अकलूज येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींची 17 एप्रिलची नियोजित सभा रद्द करण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्षांची मागणी, सभा नियमबाह्य असल्याचा आरोप
सोलापूर : सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊसाची हजेरी, अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित
कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये महागाव रस्त्यावर एसटी आणि कारचा भीषण अपघात, एकाच गावातील सात जणांचा मृत्यू
कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये महागाव रस्त्यावर एसटी आणि कारचा भीषण अपघात, एकाच गावातील सात जणांचा मृत्यू
शिवसेना भाजप युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना शांतीगिरी महाराज यांनी पाठिंबा दिला. औरंगाबादच्या हर्षवर्धन जाधव यांच्या पाठोपाठ नाशिकमध्ये गोडसे यांना पाठिंबा
रत्नागिरी : रेल्वे ब्रिज बघण्याचा मोह महागात पडला, ट्रेनच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, 5 विद्यार्थी थोडक्यात बचावले, रत्नागिरीतील कुवारबाव रेल्वे पुलावरली घटना
रामनवमीनिमित्त पुण्यातील भोर तालुक्यातील बांडेवाडी या गावातील यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांची समोरासमोर भेट
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोन मध्ये वाघाची शिकार, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या इतिहासातील पाहिली घटना, शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाश्यात अडकून 2 वर्षीय वाघिणीचा मृत्यू..
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोन मध्ये वाघाची शिकार, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या इतिहासातील पाहिली घटना, शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाश्यात अडकून 2 वर्षीय वाघिणीचा मृत्यू..
संजय निरुमप आणि राज ठाकरे वाद सर्वांनी पाहिला आहे. ज्या संजय निरुमप यांनी नेहमीच मराठीचा द्वेष केला, त्यांना मनसैनिक मतदान करणार का? असा प्रश्न शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे.
राज ठाकरेंच्या भाषणामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपला भीती वाटतेय. त्यामुळे सभांच्या खर्चाचा प्रश्न विचारला जातोय, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
नवी दिल्ली: यूपीएससी परीक्षेऐवजी खाजगी क्षेत्रातून 9 जणांची संयुक्त सचिवपदी निवड
नवी दिल्ली: यूपीएससी परीक्षेऐवजी खाजगी क्षेत्रातून 9 जणांची संयुक्त सचिवपदी निवड

पार्श्वभूमी

1. विरोधक भाजपात का चाललेत याचे पुरावे निवडणुकीनंतर देईन, माझाच्या तोंडी परीक्षेत अजित पवारांचं विधान, भाजपवर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोप


2.  शहिदांच्या नावानं मतं मागणाऱ्या नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंची तोफ धडाडली, परस्परविरोधी वक्तव्यांचे व्हीडिओ सादर, फडणवीसांना बसवलेल्या मुख्यमंत्र्यांची उपमा


3. भाजपचा प्रचार करणारे राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्येच राहणार, नगरच्या सभेत मुलगा सुजयकडून सस्पेन्सवर पडदा, तर भाषण थांबवल्यानं खासदार दिलीप गांधी उखडले


4. मुस्लिम मतदारांना थेट धमकी देणारा मनेका गांधींचा व्हीडिओ व्हायरल, मतं दिली नाही तर काम करणार नसल्याचा भरसभेत धमकीवजा इशारा


5. देशभरात रामनवमी उत्सवाला सुरुवात, साईंच्या शिर्डीत आणि नाशिकच्या काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, अयोध्या नगरीतही उत्सवासाठी भाविकांची गर्दी

6. आयपीएलवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडन्डची सुरक्षा वाढवली

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.