LIVE BLOG | मुंबई : दादर पोलिस स्टेशन कॉलनीत सिलेंडर स्फोट

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 May 2019 11:35 PM
औरंगाबाद : कन्नड तालुक्यात गराडा गावातील घराला आग, लग्नासाठी खरेदी केलेलं सर्व साहित्य जळून खाक, चार जनावरांचाही होरपळून मृत्यू
मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन,
चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय
आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या 20 षटकात 8 बाद 149 धावा,
विजेतेपदासाठी चेन्नईसमोर 150 धावांचे आव्हान
आयपीएल 2019 : अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
मुंबई : दादर पोलिस स्टेशन कॉलनीत सिलेंडर स्फोट, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल, सिलेंडर स्फोटामुळे तीन घरांचे नुकसान
जळगाव : चोपडा शिरपूर रस्त्यावर पहाटे ट्रॉली आणि कारचा अपघात, अपघातात तीन जणांचा मृत्यू, तर एकजण गंभीर, ट्रॉली चालक फरार
 हिंगोली : हिंगोली मधल्या वसमत तालुक्यातील खांडेगाव येथे तरूणाची विष प्राशन करून आत्महत्या, रामा कुसळे वय अंदाजे 26 वर्ष असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव

अहमदनगर : पाण्याच्या टाकीचा वॉल फुटला, लाखो लिटर पाणी वाया, शहरातील आगरकर मळ्यातील पाण्याच्या टाकीचा वॉल फुटल्याने पाणी वाया
बारामती : बारामती शहरातील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक मॉलला आग, आगीत संपूर्ण मॉल भस्मसात, अग्निशमन दलाच्या तीन बंबानी आग विझविली, दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक
बारामती : बारामती शहरातील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक मॉलला आग, आगीत संपूर्ण मॉल भस्मसात, अग्निशमन दलाच्या तीन बंबानी आग विझविली, दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक
अकोला : बाळापूर पारस फाट्याजवळ बेंजो वाल्यांच्या वाहन आणि ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात एक ठार, तर 12 जखमी, अपघातामूळे बाळापूर-अकोला वाहतूक प्रभावीत
अकोला : बाळापूर पारस फाट्याजवळ बेंजो वाहन आणि ट्रकची समोरासमोर धडक, एक ठार, 12 जखमी, जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू, अपघातामुळे बाळापूर-अकोला वाहतूक खोळंबली
औरंगाबाद : शहरातील सिडको भागातील शटर उचकटून चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, सिडको पोलिसात गुन्हा दाखल
पालघर : डहाणू, तलासरी भागात रात्री पासून वारंवार भूकंपाचे धक्के, सकाळी सात वाजल्यापासून भूकंपाचे तीन धक्के
अमरावती : अचलपूर तालुक्यातील सावळी गावंडे या गावात एका शेतकऱ्याच्या गोदामला रात्री लागली भीषण आग, शेतीचे साहित्य जळून खाक
मेळघाटच्या भवर गावात विवाह समारोहात 58 लोकांना जेवणातून विषबाधा, साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यात 59 जागांसाठी मतदान, अखिलेश यादव, दिग्विजय सिंग, प्रज्ञा ठाकुरांसह दिग्गजांचं भवितव्य ठरणार

2. मुंबई-चेन्नई संघात आज चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना, हैदराबादच्या मैदानावर रंगणार महामुकाबला

3. मेडिकल पीजीच्या मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, आश्वासन नको मेडिकलची सीट द्या, विद्यार्थ्यांची मागणी, तर मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक

4. बघ्यांच्या असंवेदनशिलतेमुळं अपघातग्रस्त डॉक्टरचा बळी, वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू, औरंगाबादेत आठवडाभरातील दुसरी घटना

5. हैदराबादेत एका कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेतेच आपापसात भिडले,  दोघांमध्ये जबरी मारहाण, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

6. आई वडिलांची सेवा करणारी मुलगी मिळेना, पुण्यातील तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.