LIVE BLOG | हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश, मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटलांची उपस्थिती
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Sep 2019 09:11 PM
पार्श्वभूमी
1. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपची आज तिसरी मेगाभरती, काँग्रेसचा हात सोडणाऱ्या हर्षवर्धन, आनंदराव पाटलांचा आज भाजपात प्रवेश, तर उदयनराजे आणि राणे पिता-पुत्र वेटिंगवरच2. भाजप-शिवसेना युतीचा तिढा कायम, शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यासाठी...More
1. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपची आज तिसरी मेगाभरती, काँग्रेसचा हात सोडणाऱ्या हर्षवर्धन, आनंदराव पाटलांचा आज भाजपात प्रवेश, तर उदयनराजे आणि राणे पिता-पुत्र वेटिंगवरच2. भाजप-शिवसेना युतीचा तिढा कायम, शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यासाठी आग्रही, गृहमंत्री अमित शाह घेणार युतीचा अंतिम निर्णय3. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा राजीनामा, पत्राद्वारे केली काँग्रेसच्या कारभाराची पोलखोल, मुंबईतल्या नेत्यांविरोधात तक्रारीचा सूर4. विधानसभेसाठी राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, दिल्लीत सोनिया गांधींशी भेट घेतल्यानंतर शरद पवारांची माहिती5. नवी वाहनं खरेदी करण्याऐवजी लोकांचा ओला-उबरकडे कल, ऑटोमोबाईल उद्योगात मंदी येण्यास ओला-उबर कारणीभूत, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा6. जम्मू-काश्मीर भारताचं राज्य, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरविरुद्ध गरळ ओकल्यानंतर बाहेर मात्र कबुली7. “आरेला हात लावू देणार नाही”, आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं, जागा सुचवण्यात घोटाळा झाल्याचाही संशय, अश्विनी भिडे यांच्या बदलीचीही मागणी8. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युती अखेर तुटली, इम्तियाज जलील यांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका, असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून स्पष्ट9. अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी देण्यास हायकोर्टाचा नकार, जन्माला येणाऱ्या बाळाला दत्तक देण्याची मुभा10. अॅपलकडून आयफोन 11, अॅपल वॉच, आयपॅडचं लॉन्च, अनेक नव्या फिचर्सचा समावेश, भारतात 13 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात सात वर्षांची शिक्षा झालेले माजी मंत्री व शिवसेना नेते सुरेश जैन हायकोर्टात, कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत तुरूंगातून सुटका करण्याची मागणी, कोर्टाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी होऊन अंतिम निर्णय येईपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी