LIVE BLOG : पाकिस्तानमधील पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला
मुरबाडमधील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल, वरण-भात खाल्ल्याने 15 मुलांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
11 May 2019 10:39 PM
अमरावती : मेळघाटच्या धारणी तालुक्यातील भवर येथे लग्नाच्या जेवणातून 58 जणांना विषबाधा, सर्वांवर साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु, काहींची प्रकृति चिंताजनक
राज्यभरातील 10 महानगरपालिकांमधील रिक्त झालेल्या 20 नगरसेवकांच्या जागांवर पोटनिवडणूक,
राज्य निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जाहीर,
मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूरसह 10 महानगरपालिकांमध्ये पोटनिवडणूक
औरंगाबाद : आडूळ बालानगर शिवारातील कोरड्या पडलेल्या विहिरीत पाणी टाकताना टँकर कोसळला,
प्रसंगावधान राखून चालकाने टँकर बाहेर उडी घेतल्याने अनर्थ टळला
औरंगाबाद : आडूळ बालानगर शिवारातील कोरड्या पडलेल्या विहिरीत पाणी टाकताना टँकर कोसळला,
प्रसंगावधान राखून चालकाने टँकर बाहेर उडी घेतल्याने अनर्थ टळला
पाकिस्तानमधील पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला,
3 ते 4 दहशतवाद्यांचा हॉटेलमध्ये गोळीबार
नांदेड : उष्माघाताने 69 वर्षीय कमलाबाई पातोळे यांचा मृत्यू, मुखेड तालुक्यातील हंगरगा येथील घटना, शेतात पेरणी पूर्व मशागतीच काम करताना चक्कर आली होती
मुरबाड : मुरबाडमधील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळली, वरण-भात खाल्ल्याने 15 मुलांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास, मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही
मुरबाड : मुरबाडमधील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळली, वरण-भात खाल्ल्याने 15 मुलांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास, मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अद्याप कुणालाही अटक नाही
हिंगोली : बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना टिप्परने चिरडले, एकाचा मृत्यू तर दुसऱ्यावर नांदेडमध्ये उपचार सुरु

नवी मुंबई : मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव मारहाण प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रान्चने मयुर चपळेकर, किरण सोलंकर, तेजस म्हात्रे यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर भाजप नगरसेवक विजय चिपळेकरसह सहा आरोपी अद्यापही फरार आहेत.
नाशिकमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, 'अलबत्या गलबत्या' नाटकादरम्यान अभिनेता वैभव मांगले यांच्या सहकाऱ्यांची बॅग बसमधून चोरीला, बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि नाट्य परिषदेचं ओळखपत्र असल्याची माहिती
नाशिकमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, 'अलबत्या गलबत्या' नाटकादरम्यान अभिनेता वैभव मांगले यांच्या सहकाऱ्यांची बॅग बसमधून चोरीला, बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि नाट्य परिषदेचं ओळखपत्र असल्याची माहिती
विरारमध्ये मायलेकाने रहात्या घरी विषारी औषध पिऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असं 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे तर सरस्वती प्रकाश चौगुले असं 42 वर्षीय आईचं नाव आहे. हे दोघे नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत भाड्याने राहत होते.

मुंबई : मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रिती अत्राम-धुर्वे यांचा मृत्यू, आजारी असतानाही बळजबरीने निवडणुकीचं काम करायला लावल्याने मृत्यू झाल्याचा कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचा आरोप
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दुधनी गावात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून कुऱ्हाडीने हल्ला चढवून हत्या, चिंतामण विठ्ठल जाधव असे मयत इसमाचे नाव
एस्प्लनेड मेंशन रिकामी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 दिवसांची मुदतवाढ,
३० मे पर्यंत इमारत म्हाडाच्या हवाली करण्याचे निर्देश
,
या हेरीटेज इमारतीच्या दुरूस्तीसाठी अंदाजे 30 कोटींचा खर्च अपेक्षित,
एस्प्लनेड मेंशन रिकामी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 दिवसांची मुदतवाढ,
३० मे पर्यंत इमारत म्हाडाच्या हवाली करण्याचे निर्देश
,
या हेरीटेज इमारतीच्या दुरूस्तीसाठी अंदाजे 30 कोटींचा खर्च अपेक्षित,
हिंगोली : पाणी आणायला गेलेली महिला विहिरीत पडून जखमी,
शीतल इंगळे 60 फूट विहिरीत पडल्या,
जखमी शीतल वर सेनगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु
हिंगोली : पाणी आणायला गेलेली महिला विहिरीत पडून जखमी,
शीतल इंगळे 60 फूट विहिरीत पडल्या,
जखमी शीतल वर सेनगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु
नऊ तासांच्या खोळंब्यानंतर स्पाईसजेटचे प्रवासी नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याने बंगळुरु-दिल्ली विमानाने नागपूर विमानातळावर इमर्जन्सी लॅण्डिंग केलं आहे. तेव्हापासून पर्यायी विमानाची वाट पाहत प्रवासी नागपूर विमानतळावर अडकले होते. विमान आल्यानतंर सर्व प्रवासी दिल्लीला रवाना झाले आहेत.
मध्य रेल्वेच्या सायन कुर्ला दरम्यान रुळाला तडे ,
ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा
मध्य रेल्वेच्या सायन कुर्ला दरम्यान रुळाला तडे ,
ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये पाईप लाईन फुटून पाणी वाया जाण्याचे सत्र सुरूच. थेरगाव परिसरात पवारनगर येथे पहाटेच्या सुमारास जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया
हिंगोली : पाण्यासाठी गेलेली तरुणी 60 फूट खोल विहिरीत पडली, वेळीच बाहेर काढल्याने सुदैवाने जीव वाचला, जखमी शीतल इंगळेवर सेनगाव तालुक्यातील रुग्णालयात उपचार सुरु
नागपूर : स्पाईसजेटच्या बंगळुरू - दिल्ली विमानाचे काही तांत्रिक कारणामुळे नागपुरात रात्री दीड वाजता इमर्जन्सी लँडिंग, दीडशे प्रवासी नागपूर विमानतळावर अडकले
पार्श्वभूमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. मेडिकल पीजीला प्रवेश न मिळाल्यास आत्महत्या करू, मराठा विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, प्रवेशाच्या जागा वाढवण्यासाठी सरकारचा खटाटोप
2.अहमदनगर ऑनर किलिंग प्रकरणाला नवं वळण, बापाने नाही तर नवऱ्यानेच बायकोला जाळल्याचा पोलिसांचा दावा
3. भारतात दुफळी निर्माण करणारा नेता या मथळ्यासह 'टाईम' वर मोदींचा फोटो, मासिकाच्या मुखपृष्ठावरुन वादाला तोंड
4. नोटबंदीमुळं अडचणीत आलेल्या जिल्हा बँकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, अब्जावधींच्या जुन्या नोटा हिशेबात दाखवण्याची मुभा
5. पंढरपुरात बडव्यांकडून वेगळ्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, सरकारनं अधिकार काढून घेतल्यानंतर वेगळ्या मंदिराचा घाट
6.आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई चौथ्यांदा फायनलमध्ये, क्वालिफायर टू सामन्यात चेन्नईकडून दिल्लीचा 6 विकेट्सनी धुव्वा