LIVE BLOG : अतिउच्च वीज वाहिनीत बिघाडामुळे पालघरमधील चार तालुके अंधारात

काही भाग आणि डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा हे तालुके अंधारात आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Apr 2019 11:44 PM
बोईसर खैरपाडा इथल्या सबस्टेशनमधील 132 केव्ही या अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास वीज खंडित झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरु असून रात्री 12 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती एमएसईबीकडून देण्यात आली. यामुळे बोईसर एमआयडीसीचा काही भाग आणि डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा हे तालुके अंधारात आहेत.
मुंबई : बोरिवलीत भाजपच्या प्रचार फेरीचा स्थानिकांकडून निषेध, गोपाळ शेट्टींना प्रचारादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध, भाजप कार्यकर्ते आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची, एका स्थानिकाला अटक
लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान पूर्ण, मतदानाची आकडेवारी 60 टक्क्याचा उंबरठा ओलांडण्याची शक्यता, नक्षलींच्या दहशतीतही गडचिरोलीत 61 टक्के मतदान
नवी मुंबई : वाशीतील मिनी सिशोर येथील पादचारी पुलाचा भाग कोसळला, एक जण जखमी, महापालिका रुग्णालयात उपचार सुरु
मुंबई : माहिममध्ये खासगी गाडीतून तीन कोटींची रोकड जप्त, पैसे कुणाचे आणि कशासाठी आले होते याची चौकशी सुरु

मुंबईतील डबेवाले येत्या 15 ते 21 एप्रिल दरम्यान आपल्या मूळगावी यात्रेनिमित्त जाणार असल्याने, मुंबईकरांना या काळात जेवणाचा डबा मिळणार नाही. आम्ही वर्षभर डबे पुरवत असून फक्त सहा दिवस आमच्या गावी पुणे, अहमदनगर जिल्ह्यात यात्रेला जातो. त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं डबेवाल्यांनी सांगितलं.
डिझाइनरला केलेली मारहाण मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला भोवण्याची चिन्हं, डिझाइनर जान्हवी मनचंदा प्राजक्ता माळीविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार, काशीमिरा पोलीस स्थानकांत तक्रार
जळगाव : अमळनेरमध्ये भाजप मेळाव्यातील मारहाणीत जखमी झालेले बी एस पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने धुळ्यातील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या नाकाचं हाड, यकृत आणि हाताला दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर लेझर लाईट मारल्याचा संशय, राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचं गृह मंत्रालयाला पत्र, लेझरऐवजी उन्हामुळे माईक-कॅमेराचं परावर्तन झाल्याचीही शंका

अहमदनगर : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे नगरमधील भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या बैठकीला उपस्थित, विखे मुलाचा प्रचार करत असल्याचे फोटो, राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण

रायबरेली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधींचा पत्रकारांशी संवाद
रायबरेली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राहुल गांधींचा पत्रकारांशी संवाद
अकोला : मुख्यमंत्र्यांची सभा सुरु होण्यापूर्वीच मंडप कोसळला, वाऱ्यामुळे पडलेला मंडप पुन्हा उभारण्याचं काम सुरु, अकोल्यातील डाबकी रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी 3 वाजता सभा
मुंबई : 'शिट्टी' परत मिळवण्यासाठी बहुजन विकास आघाडी आणि बळीराम जाधव यांना हायकोर्टाकडून तातडीचा दिलासा नाही, मात्र निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानं आता कोर्टात दाद मागण्याऐवजी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा याचिकाकर्त्यांचा निर्णय, हायकोर्टानं याचिका निकाली काढली

उत्तर मुंबईतील काँग्रेस लोकसभा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली
प्रा. डॉ. विजय देव यांचे दीर्घ आजाराने निधन, अंत्यदर्शनासाठी पार्थिव आज सकाळी 10 वाजता घरी ठेवण्यात येईल, 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणार, गो. नी. दांडेकर यांचे ते जावई, देव यांच्या पश्चात पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि मधुरा या दोन कन्या असा परिवार

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव जवळ भीषण अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनटरची टेम्पोला धडक, अपघातात 3 जणांचा मृत्यू
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील पाटण येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या. किरण नाथा इंगोले असं आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे .

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात, विदर्भात 7 मतदारसंघामध्ये आज मतदान, सकाळी 7 ते सायंकाळी 6 करा मतदान

2. जळगावात भाजपच्या मेळाव्यात नाराजीनाट्यातून तुफान राडा, जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी. एस. पाटील भिडले, मध्यस्थी करणाऱ्या गिरीष महाजनांची दमछाक

3. लोकसभा निवडणुकांदरम्यान पीएम मोदी सिनेमाच्या प्रक्षेपणास बंदी, निवडणूक आयोगाचा निर्णय, तर मोदींना पाठिंबा देण्यावरून कलाविश्वात फूट

4. तब्बल 100 वर्षांनंतर जालियनवालाबाग हत्याकांडावर इंग्लंडला पश्चात्ताप, पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केला खेद

5. अंतराळातला कृष्णविवर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, शास्त्रज्ञांकडून फोटो जाहीर, पृथ्वीच्या निर्मितीचं कोडं उलगडण्यासाठी होणार मोठी मदत

6. कर्णधार कायरन पोलार्डच्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सचा पंजाबवर सनसनाटी विजय, पोलार्डची 31 चेंडूत 83 धावांची निर्णायक खेळी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.