LIVE BLOG | #CSKvDC :चेन्नई सुपरकिंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा

चेन्नई सुपरकिंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा, क्वालिफायर टू सामन्यात चेन्नईचा विजय, आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा सामना

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 May 2019 11:04 PM
चेन्नई सुपरकिंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा, क्वालिफायर टू सामन्यात चेन्नईचा विजय, आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा सामना
चेन्नई सुपरकिंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा, क्वालिफायर टू सामन्यात चेन्नईचा विजय, आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई आणि चेन्नईचा सामना
1126891727418056704
आयपीएलच्या क्वालिफायर टू सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्जला विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत आपल्या लौकिकाला पुन्हा जागला. पंतच्या धडाकेबाज खेळीने या सामन्यात दिल्लीला वीस षटकात नऊ बाद 147 धावांची मजल मारुन दिली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी दिल्लीला नऊ षटकांत तीन बाद 59 असं रोखलं होतं. त्या कठीण परिस्थितीत मैदानात उतरलेल्या रिषभ पंतने एक खिंड लावून धरली आणि दिल्लीची धावगतीही सातत्याने उंचावत ठेवली. त्याने 25 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी उभारली.
आयपीएलच्या क्वालिफायर टू सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपरकिंग्जला विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात दिल्लीचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत आपल्या लौकिकाला पुन्हा जागला. पंतच्या धडाकेबाज खेळीने या सामन्यात दिल्लीला वीस षटकात नऊ बाद 147 धावांची मजल मारुन दिली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी दिल्लीला नऊ षटकांत तीन बाद 59 असं रोखलं होतं. त्या कठीण परिस्थितीत मैदानात उतरलेल्या रिषभ पंतने एक खिंड लावून धरली आणि दिल्लीची धावगतीही सातत्याने उंचावत ठेवली. त्याने 25 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह 38 धावांची खेळी उभारली.
#CSKvDC : चेन्नई सुपरकिंग्जना विजयासाठी 148 धावांचं आव्हान, दिल्ली कॅपिटल्सच्या 9 बाद 147 धावा, आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी #Qualifier2 मध्ये चेन्नई-दिल्लीमध्ये संघर्ष


अहमदनगर : आंतरजातीय विवाहातून हत्या प्रकरणाला नवीन वळण, मंगेश आणि रुक्मिणी या दाम्पत्याला मुलीच्या घरच्यांनी जाळलं नसल्याचं निष्पन्न, पोलिसांचा अहवाल पारनेर कोर्टात सादर, मंगेश रणसिंग याचा पोलिस घेणार जबाब, तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी
ठाणे : ठाण्यातील आंबे विक्रेत्यावरील वादानंतर मनसे 17 तारखेला ठाण्यात मोठा मोर्चा काढणार, मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता, या मोर्चात संपूर्ण ठाण्यातील शेतकरी, आंबा विक्रेते आणि मनसे कार्यकर्ते सहभागी होणार
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती जवळपास निश्चित, मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार सोमवारी स्वीकारण्याची शक्यता, डॉ. अजॉय मेहता यांच्या पदोन्नतीनंतर परदेशींची वर्णी लागण्याची चिन्हं
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, लवकरच प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटणार, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा विद्यार्थ्यांची फी भरण्याचं आश्वासन, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची घोषणा
मुंबई : मेडिकल पीजी विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या केबिनमध्ये ठिय्या, आश्वासन मिळेपर्यंत केबिन न सोडण्याचा इशारा
पंढरपूरमध्ये बाबासाहेब बडवे यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना,
विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर बडवे यांनी वेगळं विठ्ठल मंदिर उभारलं आहे
आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
पाकिस्तानच्या हद्दीतून भारतात घुसलेल्या कार्गो विमानाला भारतीय वायुसेनेने जयपूर विमानतळावर उतरवले,
वैमानिकाची चौकशी सुरु
अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात असलेल्या पाच आरोपींना अटक, अटकेतील आरोपींची संख्या नऊवर. सर्वांना 16 मेपर्यंत पोलिस कोठडी
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची टीम 12 ते 20 जून दरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार
सिंधुदुर्ग : विराट कोहलीच्या प्रशिक्षकांचे कणकवलीतील विनोद कांबळी क्रिकेट अकादमीच्या विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा , नाबार्डने 21 कोटी तोट्यात पकडण्याच्या दिल्या होत्या सूचना , ते पैसे ताळेबंद मध्ये पकडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश , नोटबंदीनंतर नाशिकसह अडचणीत आलेल्या राज्यातील 8 जिल्हा बँकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
परभणी : शेतकऱ्यांनी अडवला गंगाखेड-परभणी महामार्ग ,

2 तासापासून महामार्गावरची वाहतूक ठप्प
,
खळी पाटीवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज मुंबईत मुंबा देवीच्या दर्शनाला, त्यांनी मंदिरात जाऊन पूजा केली
शिर्डी : नाशिक पुणे महामार्गावर अपघातात दोन ठार तर दोन जखमी, दुचाकी आणि ट्रकचा मध्यरात्रीच्या सुमारास अपघात, संगमनेर शहराजवळ बायपास वर घडली घटना, वडील आणि तीन वर्षीय मुलीचा मृत्यू
मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांने मंत्री चंद्रकांत पाटलांना फोनवरून आत्महत्या करण्याची धमकी दिली
मराठा आरक्षण : वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षण डॉ. तात्याराव लहाने, मराठा मोर्चाचे नेते आणि विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तोडगा काढण्याचं दिलं आश्वासन
अयोध्या प्रकरणाची सुनावणी तीन महिन्यांनी लांबणीवर,
मध्यस्थ कमिटीने बंद पाकिटातून सुप्रीम कोर्टात अहवाल ठेवला ,
कमिटीने 15 ऑगस्टपर्यंत मुदत मागितली, कोर्टाकडून मागणी मान्य
सोलापूर : मेडिकलच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा विद्यार्थ्यांसोबत भेट ,
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणार
सोलापूर : मेडिकलच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा विद्यार्थ्यांसोबत भेट ,
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणार
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरात दरोडा, पहाटे 3 वाजेच्या सुमारास पडला दरोडा, चोरांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करून बांधून ठेवले, दानपेट्या फोडून अंदाजे 10 ते 12 लाख रुपये लुटले, घटनास्थळी पोलीस दाखल
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित कोहा जंगलात वाघाचा मृत्यू झाला.

सात वर्ष वयाचा वाघ बुधवारी संध्याकाळी छोट्या तलावात मृतावस्थेत आढळला. वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण संशोधन अहवाल आल्यावर स्पष्ट होईल.
जांबोटी: गोव्याहून जांबोटीकडे येणाऱ्या वॅगनर कारला बुलेटने समोरासमोर धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाल्याची घटना ११ वाजता घडली. या अपघातात बुलेटस्वार जखमी झाले असून वॅगनर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर चोर्ला महामार्गावरील वाहतुक कोलमडली होती. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. बघता-बघता दोन्ही वाहने भस्मसात झाली.
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले वजराठ पिंपळगाव येथे आंबा, काजू बागेस अति उष्णतेच्या कारणामुळे अचानकपणे आग लागून सुमारे दोन लाखांचे नुकसान
अकोला : अकोल्यातील राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम मोरेश्वर कडोळेची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. युद्धनौकेच्या वापरावरून मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या आरोपानंतर राजकारण तापलं, नौसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून आरोपांचं खंडन, काँग्रेसचा मोदींवर पलटवार

2. अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, त्रिसदस्यीस समितीकडून तोडगा काढण्यासंबंधीचा अहवाल आज सुपूर्द होण्याची शक्यता

3. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, प्रवेश खोळंबू नये म्हणून महाराष्ट्र केंद्राकडे जादा जागा मागणार

4. जेट एअरवेजनं गाशा गुंडाळल्यानं हापूस आंब्याच्या परदेशातील निर्यातीला फटका, नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस पडून

5. पोलीस व्हॅनमध्येच गुंडाकडून टिकटॉकचा व्हिडीओ शूट, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट, नागपूर पोलिसांची अब्रू वेशीवर

6. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, सचिनच्या बॉलिंगवर विनोद कांबळीची बॅटिंग

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.