LIVE BLOG : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Aug 2019 10:58 PM
बीड : अंबाजोगाई-लातूर रोडवर नंदगोपाल दूध डेअरीच्याजवळ दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी
दिल्लीत कॉंग्रेसची बैठक सुरु, बैठकीत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधींसह कॉंग्रेसचे इतर नेते उपस्थित
नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड, राहुल गांधी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर
राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलून राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी आणि मदत व पुनर्वसन कामांना प्राधान्य द्यावे, काँग्रेसचे नेते रणजित देशमुख यांची मागणी
भिवंडीतील वळ ग्रामपंचायत हद्दीतील हिताची स्पेअर पार्टच्या गोदामाला भीषण आग, गोदामात मोठ्या प्रमाणात एसी, फ्रिज, कॉम्पुटरचे स्पेअर पार्ट, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल
LIVE : भाजपला सत्तेचा माज, जनतेशी काहीही देणंघेणं नाही : राज ठाकरे
LIVE : कर्नाटकने सरकारने वेळोवेळी मदत केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतं आहे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
LIVE : काही मदत कॅशद्वारे तर काही थेट बँक खात्यात दिली जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://abpmajha.abplive.in/live-tv

LIVE : शेतीतील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टरी १३ हजार रुपयांची मदत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : जनावरं गमावलेल्या आणि जमिनीचे नुकसान झालेल्यांना देखील मदत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://abpmajha.abplive.in/live-tv
रत्नागिरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे कळंबट इथल्या डोंगराला तडे जाऊन मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमधील अंतर वाढत जाऊन फुटांपर्यंत गेलं आहे. सध्या या परिसरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.
LIVE : मृतांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE : पूरग्रस्तांना पैसे देताना रोख देण्याचे मुख्य सचिवांना आदेश दिले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://abpmajha.abplive.in/live-tv
माथाडी कामगार संघटनेचा पूरग्रस्तांना मोठा हातभार, 60 लाखांचा निधी पूरग्रस्तांना देणार, नरेंद्र पाटलांची माहिती
सांगलीतील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत दाखल, हिराबाग कॉर्नरमधील रेस्क्यू ऑपरेशनस्थळाला भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत, पाच दिवसानंतर दिवसानंतर मुख्यमंत्री पूरग्रस्त क्षेत्रात, पूरग्रस्त क्षेत्राचा आढावा घेतला,
सांगली : पांजर पोळा संस्थेतील 40 ते 50 गायी गणपती मंदिर परिसरात अडकून, चारा संपल्याने जनावरं दोन दिवसांपासून उपाशी, सांगलीतील तरुणाची सरकारकडे चारा उपलब्ध करुन देण्याची विनंती

बचावकार्याल आणखी वेग आणण्यासाठी विशाखापट्टणमधून भारतीय नौदलाची 15 अतिरिक्त पथकं दुपारपर्यंत कोल्हापुरात पोहोचणार, मुख्यमंत्री कार्यालयाची ट्विटरवर माहिती

बचावकार्याल आणखी वेग आणण्यासाठी विशाखापट्टणमधून भारतीय नौदलाची 15 अतिरिक्त पथकं दुपारपर्यंत कोल्हापुरात पोहोचणार, मुख्यमंत्री कार्यालयाची ट्विटरवर माहिती

पूरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंवर मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह जाहिरातबाजी
गोवा : दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथील दूधसागर धबधबा कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रौद्ररुप धारण करुन ओसंडून वाहत आहे. एरव्ही या धबधब्याचे पाणी शेजारुन जाणाऱ्या रेल्वे पुलावर येत नाही. मात्र प्रचंड वेगाने खाली दुधाळ रंगात खाली कोसळणाऱ्या दूधसागर धबधब्याचे वेगळे रुप यावेळी पाहायला मिळत आहे. देश-विदेशातील लाखो पर्यटक दरवर्षी या दूधसागर धबधब्याचे सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी गोव्यात येतात.

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली दौऱ्यावर
,
12 वाजता सांगलीत मुख्यमंत्री येणार
,
पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री करणार पाहणी
,
सांगलीत प्रशासकीय यंत्रणा झाली अलर्ट
व्हॅक्यूम क्लिनर नाटकाचा 18 ऑगस्टच्या प्रयोगाद्वारे आलेली रक्कम पूरग्रस्तांच्या निधीसाठी, शिवाजी मंदिर येथे होणार प्रयोग
कसारा घाटात वाहतूक कोंडी , वाहनांच्या लांबच लांब रांगा , रस्ता खचल्याने आठवडाभरापासून घाटातील एकाच मार्गाने सुरु आहे वाहतूक, वाहनचालकांना रोज सहन करवा लागतोय नाहक मनस्ताप
पूरग्रस्तांसाठी मुंबईतली गणपती मंडळं पुढे येणार,

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सर्व मंडळांना आवाहन,

गणेशउत्सवात भरमसाठ खर्च न करता
मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याचं आवाहन
राज्यातील पूरस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश निश्चितीची मुदत वाढवली, विद्यार्थी जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करू शकणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगर खचल्याने अनेक गावांना धोका, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे, असनिये, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे, सासोली, कुडासे येथे डोंगर खचले

, वेंगुर्ले तालुक्यातील तुळस तर कुडाळ तालुक्यातील आकेरी घाट, नेरुर वाघोटनेवाडी गावात डोंगर खचले
कोल्हापुरात महापुराची स्थिती गंभीरच, शिरोळ तालुक्यात चिंता वाढली, पंचगंगा नदीची रात्री 1 वाजताची पाणी पातळी 52.5 इंच इतकी, काल संध्याकाळपासून पावसाची रिपरिप सुरू, पुरग्रस्तांसाठी जिल्ह्याला 25 कोटींचा निधी मिळाला, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती, पाणी, वीज पुरवठा अद्याप विस्कळीतच, इंधनाची समस्या अधिक वाढली, शाळा आणि महाविद्यालयांना आज आणखी एक दिवस सुट्टी
सांगलीत सातव्या दिवशी पूर स्थिती गंभीर, अलास गावात अनेक नागरिक अडकले, मदतीसाठी आवाहन

पार्श्वभूमी

१. कोल्हापूर, सांगलीत पाचव्या दिवशीही महापुराचं थैमान, अन्न-धान्य, स्वच्छ पाणी,औषधांची मोठी गरज, राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु

२. आलमट्टी धरणातून 4 लाख 80 हजार क्यूसेक्स वेगानं विसर्ग, येडीयुरप्पांची मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती, आता पाणी ओसरण्याची आशा

३. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायक ट्रस्ट, 100 ट्रक भरून शुद्ध पाणी पाठवणार, तर पवारांच्या आवाहनानंतर बारामतीतून एक कोटींची मदत

४. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हंगामी अध्यक्ष आज ठरण्याची शक्यता, गांधी घराण्याबाहेरील नावाची चर्चा, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

५. श्वसनाच्या त्रासामुळे अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची एम्सची माहिती, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा भेटीला

६. 66व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, हिंदीमध्ये अंधाधून तर मराठीत भोंगा ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, नाळमधील चैत्या ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.