- मुख्यपृष्ठ
-
महाराष्ट्र
LIVE BLOG : रत्नागिरी : राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार
LIVE BLOG : रत्नागिरी : राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 Sep 2019 11:23 PM
अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हलर आणि टेम्पोचा भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलरमधील 2 जण जागीच ठार तर 8 जण जखमी, टेम्पोचा टायर फुटल्याने अपघात
मुंबई : राज्य सरकारी,निमसरकारी, जिल्हा परिषद, चतुर्थ श्रेणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचा उद्याच्या संपाशी काहीही संबंध नाही, संप समन्वय समितीने पुकारला नसल्याने या संपात सहभागी न होण्याचे आवाहन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव यांच्या नेतृत्वात भाजपच्या निवडणूक समितीची उद्या दुपारी 2 वाजता बैठक,
निवडणूक निरीक्षकांच्या मतदारसंघ निहाय अहवालावर चर्चा
होणार, शिवसेना-भाजप युतीच्या जगावाटपाच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याने भाजप लढणार असलेल्या मतदारसंघांचा या अहवालाच्या आधारावर आढावा घेतला जाणार,
युतीत कुठल्या जागा कोणाला सुटणार याचीही चाचपणी होणार
रत्नागिरी : राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार, जाधव 2004 मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादीत सामील झालेले. जाधवांबरोबरच गुहागर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवबंधन बांधणार
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, येत्या 11 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश, राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश करणार
उस्मानाबाद : 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना 2005 आधीची पेन्शन योजना लागू करा, या मागण्यासाठी उद्या राज्यभरात शिक्षकांचा आंदोलन, राज्यात उद्या एक दिवसासाठी शाळा बंद राहणार, मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर मोठी वाहतूक कोंडी, उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथून मुंबईत परतणारे गणेशभक्तांना त्रास, पर्यायी मार्गाचा वापर करावा, महामार्ग पोलिसांचं आवाहन
कोल्हापूर : जोरदार पावसाने चंदगड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने बुजवडे, गवसे, कुरणी गावात जाणारी वाहतूक बंद, नदीचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने वाहतूक बंद
ऑर्बिटरने संपर्क तुटलेल्या विक्रम लॅंडरचे फोटो काढले, ऑर्बिटरला विक्रम लॅंडरची माहिती मिळाली, इस्रोचे प्रमुख के सीवन यांची ए्एनआयला माहिती
नागपूर : 'आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही ओवैसी यांच्यासोबत झाली आहे, ओवैसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची युती कायम' - प्रकाश आंबेडकर
गोवा : अल्पवयीन जलतरणपटूवर लैंगिक अत्याचार प्रकरण, दिल्ली येथून काल अटक करण्यात आलेल्या सुरजीत गांगुली या आरोपीला म्हापसा न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलिस कोठडी
मुंबई : मुसळधार पावसाने हिंदमाता परिसरात पुन्हा पाणी साचलं, लालबागच्या राजाच्या सभामंडपातही पाणी, तरीही भक्तांची गर्दी
पुणे : उत्पादन शुल्क विभागाची पुणे जिल्हात मोठी कारवाई, विदेशी दारुचा मोठा साठा पकडल्याची माहीती
ठाण्यातील लूईसवाडी भागातील चाळीत सिलेंडर ब्लास्ट, एक महिला जखमी, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जखमी महिला उपचारसाठी खासगी रुग्णालयात दाखल
गोवा : सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डिचोली तालुक्याला पूराचा धोका, डिचोली नदीच्या पाण्याची पातळीत वाढ, गावकरवाडा येथील घरात पाणी शिरले, , परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याची डिचोलीचे मामलेदार प्रवीण पंडीत यांची माहिती
नवी दिल्ली : ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचं वयाच्या 95 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन, दिल्लीतल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
पालघर : जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस, सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण क्षेत्रात 103 मिमी पावसाची नोंद, धामणी धरणाचे तीन दरवाजे उघडले, धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांचा मिळून 7837 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या दिशेने, सध्या पंचगंगा पाणी पातळी 38 फुट 4 इंच, राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची भीती, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
१. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये रात्रभर पावसाच्या जोरदार सरी, अनेक सखल भागांत पाणी साचलं, येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधारेचा अंदाज
२. कोल्हापुरातील राधानगरी धरणक्षेत्रात पाऊस, सर्व स्वयंचलित दरवाजे खुले, भोगावती नदीपात्रात मोठा विसर्ग, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
३. दोन दिवसांपासून गडचिरोलीत पावसाचं धूमशान, मुख्य रस्ते पाण्याखाली, 300 गावांचा संपर्क तुटला
४. मुंबईतल्या मेट्रोच्या पायाभरणीसह मोदींकडून वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन, औरंगाबादमध्ये ऑरिक सिटीचं उद्घाटन, तर महिला बचत गटांसाठी मोठ्या घोषणा
५. येत्या 2 ते 4 दिवसांत युतीचं जागावाटप निश्चित होणार, खुद्द उद्धव ठाकरेंची घोषणा, नरेंद्र मोदींकडून उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ म्हणून उल्लेख
६. विधानसभेसाठी काँग्रेस 10 तारखेला पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता, काँग्रेसनं 60 तर राष्ट्रवादीनं 70 उमेदवारांची नावं निश्चित केल्याची सूत्रांची माहिती