LIVE BLOG : सांगली कोल्हापुरातील पुरामुळे भाजपची राजकीय कार्यक्रमांना स्थगिती, महाजनादेश यात्रेलाही ब्रेक!

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Aug 2019 08:05 PM
कलम 370 रद्द, कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन,
370 कलम आणि पाकिस्तानबाबत मोदी काय बोलणार?
नांदेड : फोटो काढण्याच्या नादात युवकाचा तलावात बुडून मृत्यू, किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधब्या शेजारील घटना, सौरभ राठोड असं मृत तरुणाचं नाव
सांगली पुरात माणुसकीही मेली, घर सोडलेल्या पुरग्रस्तांच्या घरात चोरी, टीव्ही फ्रीजसह महत्त्वाचं साहित्य लांबवलं
पूरस्थितीमुळे मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस 12 ऑगस्टपर्यंत रद्द, रुळांवरील चिखलामुळे मुंबई ते पुण्यादरम्यानही अनेक एक्स्प्रेसही रद्द
राष्ट्रीय आपत्ती योग्य वेळी घोषित करु, रोगराईवर उपाय करण्यासाठी मुंबईहून डॉक्टर आणणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


आलमट्टी धरणात पाणी सोडण्यास कर्नाटक सरकारची मंजूरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

https://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE | राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

https://abpmajha.abplive.in/live-tv
आठ हजारांहून अनेक लोकांना सुरक्षित स्थळी सोडलं: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एअरलिफ्टिंग करण्याचे प्रयत्न सुरुं, घाबरून जाऊ नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हवामानामुळे सांगलीचा दौरा रद्द करावा लागला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंजाब, गोवा, गुजरातवरून बचावपथकं मागवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुराच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापूरमधून पत्रकार परिषद
नांदेड : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँगेस-भाजप नगरसेवक भिडले, नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की, कॉंग्रेसचे 52 नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याच्या वक्तव्यावरून गदारोळ, भाजपा नगरसेवक दिपक सिंह रावत आणि कॉंग्रेस नगरसेवकांत धक्काबुक्की, दिपकसिंह रावत निलंबित
गेल्या दोन दिवसापासून पुराच्या संकटात अडकलेल्या पंढरपूरकरांना दिलासा , पुराचे पाणी ओसरू लागले मात्र अजूनही शेकडो वाहने अडकली
सांगली-कोल्हापूरसह राज्यातल्या भीषण पूरस्थितीमुळे भाजपची राजकीय कार्यक्रमांना स्थगिती.. महाजनादेश यात्रेचा उद्याचा कार्यक्रमही स्थगित..10 ऑगस्ट रोजी होणारा मेगाभरतीचा दुसरा टप्पाही स्थगित करण्याचा पक्षाचा निर्णय
आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हातात शिवबंधन बांधणार
अमरावती : मागील 24 तासात अमरावती जिल्ह्यात 32.0 सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 500 मिमी म्हणजेच सरासरीच्या चौपट पाऊस धारणी तालुक्यात झाला आहे. धारणी तालुक्यातील दियामधील सिपना नदी आणि रोहिनीखेडा इथली गडगा नदी ओव्हर फ्लो झाल्याने बैरागड परिसरातील 27 गावांचा पुन्हा धारणीशी संपर्क तुटला आहे. धारणी तहसील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आलमट्टी धरणात पाच लाख क्यूसेक्स पाणी सोडायला कर्नाटक सरकार तयार, यामुळे सांगलीतील पाणी ओसरायला मदत होईल
सांगलीतील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांची एकत्र कोल्हापूरची हवाई पाहणी सुरू
सांगली । ब्रम्हनाळमधील बोट उलटून झालेल्या अपघातातील मृतकांचा आकडा वाढला, 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
कोल्हापुरात मागील 24 तासात सरासरीच्या 12 पट जास्त पाऊस, चंदगड तालुक्यात सर्वाधिक 262 मिमी पाऊस : भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांची माहिती



जळगाव हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी 11 वाजता धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, धरणातून 91549 क्यूसेक वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
गोवा ब्रेकिंग:तिलारी धरणाचे चारही दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात सोडल्याने साळ गावात भीतीचे वातावरण,विधानसभा सभापती राजेश पाटणेकर अधिवेशनातून थेट साळ गावात पोचले, सखल भागातील 10 ते 15 घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले,मामलेदार प्रवीण पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य सुरु,सभापती पाटणेकर रात्री 10 पासून गावात दाखल,परिस्थिती नियंत्रणात असल्याची सभापतींची माहिती,अर्ध्या तासात दृष्टीचे लाइफ गार्ड साळमध्ये,लाइफ गार्ड रात्रभर असणार तैनात
गोवा ब्रेकिंग:तिलारी धरणाचे चारही दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात सोडल्याने साळ गावात भीतीचे वातावरण,विधानसभा सभापती राजेश पाटणेकर अधिवेशनातून थेट साळ गावात पोचले, सखल भागातील 10 ते 15 घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले,मामलेदार प्रवीण पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य सुरु,सभापती पाटणेकर रात्री 10 पासून गावात दाखल,परिस्थिती नियंत्रणात असल्याची सभापतींची माहिती,अर्ध्या तासात दृष्टीचे लाइफ गार्ड साळमध्ये,लाइफ गार्ड रात्रभर असणार तैनात
सिंधुदुर्ग :

मुंबई गोवा महामार्ग रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद होता. कुडाळ भनसाळ नदीच्या पुराचे पाणी महामार्गावर आल्याने बंद होता आता वाहतूक सुरळीत, मुंबई गोवा सागरी महामार्गावर केळुस गावात पाणी असल्याने चौथ्या दिवशीही वाहतूक बंद, तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने बांदा दोडामार्ग रस्ता बंद, मनेरी गावात पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता बंद, कुडाळ तालुक्यातील माणगाव मधील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावरुन गेल्या चार दिवसापासुन पाणी जात असल्याने 27 गावांचा संपर्क अजुनही तुटलेला, बांदा, खारेपाटण, माणगाव बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी, वेंगुर्ले केळुस गावातील 40 ते 50 लोक गेल्या तीन ते चार दिवसापासून पुराच्या पाण्यात अडकलेली अजून कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून मदत नाही , कुडाळ सरंबळ गावात पूरस्थिती कायम, आतापर्यंत 150 लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं.
सांगली : जोरदार पावसाचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. मिरजेतील रुग्णालयात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहेत. तर औषधसाठा पुरेसा आहे.
सांगली : जोरदार पावसाचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. मिरजेतील रुग्णालयात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहेत. तर औषधसाठा पुरेसा आहे.
गडचिरोली : पर्लकोटा नदीच्या पातळीत प्रचंड वाढ, भामरागड शहरात पुराचे पाणी, शंभरहुन अधिक घरे पाण्याखाली, अनेक लोक अडकले
सांगली -: सांगली मधील जिल्हा कारागृहातील बॅरकमध्ये पाणी घुसले, कारागृहात 340 कैदी अडकले, कैद्यांना बाहेर काढण्याची जेल प्रशासनाची जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे विनंती
सिंधुदुर्ग : पावसामुळे सावंतवाडी बस डेपोच्या 150 बस फेऱ्या रद्द
सिंधुदुर्ग : पावसामुळे सावंतवाडी बस डेपोच्या 150 बस फेऱ्या रद्द
नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल आणि कळमेश्वर या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर झाले होते, कालपासून नरखेड आणि काटोल तालुक्यात दमदार पाऊस . मात्र कळमेश्वर तालुक्यात पावसाने दडी मारली
मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि मार्ड संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बुधवारी (8 ऑगस्ट) रात्री झालेल्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय

पार्श्वभूमी

१. पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे मुंबईत दुधाचा तुटवडा, 13 लाख लिटर दुधाची आवक घटली

२. राधानगरीत धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, 18 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, कोल्हापुरात पाणी वाढण्याची शक्यता

३. सांगली, साताऱ्यातही पावसाचं थैमान सुरुच, सांगलीतील अनेक गावंही महापुरात बुडाली, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

४. जम्मू-काश्मीरमधील कलम-370 रद्द केल्यावर पाकिस्तानचा तिळपापड, भारताशी व्यापारी संबंध तोडले, भारतातील उच्चायुक्तांनाही परत बोलावलं

५. मिशन काश्मीरनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल शोपियानच्या रस्त्यांवर, सुरक्षा व्य़वस्थेचा आढावा, स्थानिकांसोबत जेवणाचा आस्वाद

६. सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात,  ०.35 टक्क्यांच्या कपातीनंतर नवा दर 5.40टक्क्यांवर, कर्जावरील EMI स्वस्त होणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.