LIVE BLOG | विश्वचषकातील पाकिस्तान वि. श्रीलंका सामना पावसामुळे रद्द

पाकिस्तान आणि श्रीलंका संघांमधला विश्वचषकाचा साखळी सामना आज पावसामुळे रद्द करावा लागला. यंदाच्या विश्वचषकात पावसामुळे रद्द झालेला हा पहिलाच सामना आहे. ब्रिस्टलमधल्या या सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना एकेक गुण बहाल करण्यात आला. इंग्लंडच्या वेळेनुसार दुपारी पावणेचारच्या सुमारास पंचांनी खेळपट्टी ओलं असल्याचं कारण सामना रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांच्या खात्यात तीन सामन्यांत एक विजय, एक हार आणि एक रद्द सामना या कामगिरीचे तीन गुण झाले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Jun 2019 11:36 PM

पार्श्वभूमी

1. रेपो रेटमध्ये कपात केल्याने कर्ज स्वस्त होणार, आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंटसाठी लागणारे शुल्कही रद्द, आरबीआयचा दुहेरी दिलासा2. पुणे म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत, साडेचार हजारांपेक्षा जास्त सदनिकांसाठी सोडत, सकाळी 10...More

एम. पी. मिल कंपाऊंड प्रकरणी लोकयुक्तांनी अहवाल शासनाकडे सोपवल्यानंतर प्रकाश मेहता यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, कोअर कमिटी बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याने मेहतांची उपस्थिती लक्षवेधी, बैठकीत चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजनही उपस्थित