LIVE BLOG | मराठा मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी छेडलेलं आंदोलन तूर्तास स्थगित

मराठा मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी छेडलेलं आंदोलन तूर्तास स्थगित, शुक्रवारपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची पाहणार वाट, चार दिवसात ठोस आश्वासन आणि सरकारने भूमिका मांडली नाही तर राज्यभर छेडणार आंदोलन

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 May 2019 07:15 PM
अल्पवयीन मुलीशी 52 वर्षीय वकिलाने केलेलं लग्न हायकोर्टाने वैध ठरवलं, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीने आरोपीसोबत नांदायची दाखवलेली तयारी तिच्या हिताचीच, हायकोर्टाचं निरीक्षण, मात्र बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याबाबत पुढील वर्षी विचार करण्याचं स्पष्टीकरण
मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड कामावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली, पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या याचिकेनंतर कामाला दिली होती स्थगिती, स्थगिती उठवल्याने कोस्टल रोड कामाला पुन्हा सुरुवात
बेशिस्त खपवली जाणार नाही, पक्षात गटबाजीला स्थान नाही, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा पक्षातील सर्व नेत्यांना स्पष्ट इशारा, विधानसभा निवडणुकांसाठी एकत्र काम करण्याचा निर्धार, बैठकीला संजय निरुपम मात्र अनुपस्थित
मराठा मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी छेडलेलं आंदोलन तूर्तास स्थगित, शुक्रवारपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची पाहणार वाट, चार दिवसात ठोस आश्वासन आणि सरकारने भूमिका मांडली नाही तर राज्यभर छेडणार आंदोलन
पुणे : खासदार राजू शेट्टी साखर आयुक्तांच्या भेटीला, थकित एफआरपी देण्यासंदर्भात चर्चा
अकोल्यातील सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्येप्रकरणी भाजयुमोचे उपाध्यक्ष विक्रम गावंडेसह पाच जणांवर गुन्हा, सर्व आरोपी फरार
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 91.10 टक्के, 500 पैकी 499 गुणांसह 13 विद्यार्थी संयुक्तरित्या अव्वल
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 91.10 टक्के, 500 पैकी 499 गुणांसह 13 विद्यार्थी संयुक्तरित्या अव्वल
वर्धा : महात्मा गांधी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीला भीषण आग, आगीच कारण अस्पष्ट, भौतिकशास्त्रची प्रयोगशाळा जळून खाक, तीन खोल्यांतील साहित्य जळालं, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
मुंबई : आंतरजातीय प्रेमला विरोध करणा-या आई-वडिलांविरोधात हायकोर्टात याचिका. पुण्यातील १९ वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा जगण्याच्या अधिकारासाठी संघर्ष
सीबीएसईचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार,
दुपारी 3 वाजता सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल
सीबीएसईचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार,
दुपारी 3 वाजता सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल
जालन्यासाठी आम्ही खोतकरांची समजूत काढली. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरै जे दानवेंबद्दल सांगत आहेत ते जर खरं ठरलं तर लोक बिथरतील. खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे, खैरे कधीही खोटं बोलत नाहीत. कागदोपत्री दानवेंचे जावई हे आमचेच आमदार आहेत : संजय राऊत
मुंबई : माझ्या अग्रलेखाचा टायमिंग चुकला पण आमच्यात काहीही मतभेद नाही. तुम्ही काहीही मनात आणू नका, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकच आहेत, शिवसेना नेते संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
कोल्हापूर : पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना शेतकऱ्यांचा घेराव, पंचगंगा नदीवरील उपसाबंदी रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
नाशिक : 3 लाखांच्या पैठणींवर चोरांचा डल्ला, येवल्यातील नाकोडा पैठणी दुकानात चोरी, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल
#मराठाआरक्षण :
वैद्यकीय शिक्षणात मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मुंबईत आंदोलन,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन सामान्य नागरिकाची नक्षलवाद्यांकडून हत्या
गडचिरोलीमधील एटापल्लीत नक्षलवाद्यांकडून नागरिकाची निर्घृण हत्या
नागपुरात 48 तासांत हत्येची तिसरी घटना, पोलीस प्रशासन हतबल,
गोळीबार चौक आणि गृहलक्ष्मी नगरमध्ये हत्येच्या घटना
पुणे : तुळशीबाग येथील राम मंदिरात चोरी करणाऱ्याला अटक,
शंकर कांबळे असे आरोपीचे नाव असून त्याने मूर्तीच्या पायातील दागिने चोरले होते
मतदान शांततेने पार पडत असताना जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ला, जीवितहानी नाही
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील 51 मतदार संघात मतदानाला सुरुवात,
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राजवर्धन सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला

पार्श्वभूमी

1. आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान, राहुल गांधी, सोनिया गांधींचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार, तर भाजपचे राजनाथ सिंह, राज्यवर्धन राठोडही रिंगणात

2. राजीव गांधींवरच्या विधानासाठी देश मोदींना माफ करणार नाही, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा, राहुल प्रियंकाचाही हल्लाबोल

3. राफेलवरून टीका करणाऱ्या राहुल गांधींवर अनिल अंबानींचा पलटवार, युपीएच्या काळात मंजूर केलेल्या 1 लाख कोटींच्या प्रकल्पाची आवर्जून आठवण

4. लातूरच्या चेरापाटीजवळ टेम्पो आणि ऑटोचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी, एका वर्षाची मुलगी सुदैवाने बचावली

5. रशियात पेटत्या विमानाचं ईमर्जन्सी लँडिंग, दुर्घटनेत 41 प्रवाशांचा मृत्यू तर 33 प्रवासी बचावले

6. अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईकडून कोलकात्याचा 9 विकेट्सनी धुव्वा, विजयासह आयपीएल गुणतालिकेत मुंबईनं गाठलं अव्वल स्थान

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.