LIVE BLOG | सनी देओल उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
नवनिर्वाचित भाजप खासदार सनी देओल आणि प्रसिद्ध हृदशल्यविशारद डॉ. पांडा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
05 Jun 2019 08:27 PM
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दिल्लीत, अमित शाहांची भेट घेणार, 7 जूनला मुंबईत भाजपच्या कोअर कमिटी महत्त्वपूर्ण बैठक, मंत्रिमंडळ विस्तार, विरोधीपक्षातील आमदारांचे पक्षप्रवेश, विधानसभा जागावाटपावर होणार चर्चा
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दिल्लीत, अमित शाहांची भेट घेणार, 7 जूनला मुंबईत भाजपच्या कोअर कमिटी महत्त्वपूर्ण बैठक, मंत्रिमंडळ विस्तार, विरोधीपक्षातील आमदारांचे पक्षप्रवेश, विधानसभा जागावाटपावर होणार चर्चा
लोणावळ्यातील INS Shivaji या नेव्हीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये अंडरट्रेनी असलेल्या 19 वर्षीय नाविकाचा मृतदेह सिलिॅग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला, मयत तरुण कन्नाला आकाश मूळचा तेलंगणा राज्यातील निर्मळ तालुक्यातील पार्डी गावचा
शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार अयोध्येला जाणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18 खासदार 15 जूनला राम लल्लाचं दर्शन घेणार
शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार अयोध्येला जाणार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18 खासदार 15 जूनला राम लल्लाचं दर्शन घेणार
नवनिर्वाचित भाजप खासदार सनी देओल आणि प्रसिद्ध हृदशल्यविशारद डॉ. पांडा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
World Cup 2019 Ind Vs SA : नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, सामना दुपारी 3 वाजता सुरु होणार
गाईच्या दूधविक्री दरात 8 तारखेपासून प्रति लीटर 2 रुपयांनी वाढ,
दुधाचा दर 42 रुपयांवरुन 44 रुपये होईल,
सहकारी दूध संघांच्या बैठकीतला निर्णय
पुणे : वनखात्याच्या कार्यालयात जप्त केलेल्या बॉम्बचा स्फोट, पौड येथील घटना, स्फोटात वनखात्याच्या इमारतीचं प्रचंड नुकसान
मुंबई : शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, लोकमान्य टर्मिनस परिसरातील घटना, आरपीएफ, जीआरपीएफ घटनास्थळी दाखल, लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे कारशेडमध्ये उभी शालिमार एक्स्प्रेसमध्ये 5 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, लोकमान्य टर्मिनस परिसर रिकामा केला
बारामती :
बारामती तालुक्यातील जिरायती गावामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुष्काळी दौऱ्यास सुरुवातस,
बारामती तालुक्यातील खैरेपडळ येथील जनावरांच्या छावणीस दिली भेट
कोल्हापुरात राडा; 3 पोलीस जखमी,
लहान मुलांच्या क्रिकेटच्या सामन्यातील वादानंतर महाराणा प्रताप चौक परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांत तुफान हाणामारी आणि दगडफेक,
परिसरात प्रचंड तणाव,
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही दगडफेक,
पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी
नाशिक : लग्नासाठी नकार दिल्याने फेक फेसबूक अकाऊंटद्वारे मुलीचे अश्लील फोटो व्हायरल, पीडित तरुणीची सायबर सेलकडे तक्रार, जळगावमधील एका मुलाविरोधात विनयभंगासह माहिती व तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल
‘माथेरानची राणी’ शुक्रवारपासून बंद, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय, माथेरान ते अमन लॉजपर्यंत असणाऱ्या शटल सेवा मात्र सुरू राहणार
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, 20 ते 25 मिनिटांपासून वाहतूक विस्कळीत
पार्श्वभूमी
राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा संंक्षिप्त आढावा
1. भोपाळ आणि पाटण्यात ईदचा चंद्र दिसला, आज देशभरात ईद साजरी होणार, देशभरातील मशिदींवर आकर्षक विद्यूत रोषणाई
2. उरणच्या पुलावर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि कोडवर्ड आढळल्यानं मोठी खळबळ, पुलाच्या खांबावर मोठी जहाजं, विमानतळ, पेट्रोल पंप उडवण्याचे निर्देश
3. विधानसभा जागावाटपाच्या फॉर्म्यूल्यावर शिवसेना नाराज, 144 जागांसाठी शिवसेना आग्रही असल्याची चर्चा, तर सर्वकाही आलबेल असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा
4. लोकसभेतील दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपा-बसपाची युती तुटली, मायावतींची घोषणा, सुधारणा झाल्यास पुन्हा एकत्र येण्याचे संकेत
5.विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकाच्या पहिल्या आव्हानासाठी सज्ज; आज सलामीच्या सामन्यात भारताचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी
6. डेल स्टेनची खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार; स्टेनचा खांदा उपचारांना साथ देईना, दक्षिण आफ्रिकी शिलेदाराची कारकिर्दही धोक्यात