LIVE BLOG : जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवलं, राज्यसभेत विधेयक बहुमताने मंजूर

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2019 06:55 PM
विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 61 मतं

6 आणि 7 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्वच शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर,

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आदेश,
कोल्हापूर शहराच्या अनेक भागात पाणी साचलं,

ग्रामीण भागातील बहुतांश मार्गावर वाहतूक बंदी
तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यसभेत ३७० कलम हटवण्याच्या विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान

योग्य वेळ आल्यावर जम्मू काश्मीर पुन्हा राज्य होईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवलं, राज्यसभेत विधेयक बहुमताने मंजूर
धुळे : जम्मू काश्मीर बाबत सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिवसैनिकांचा भर पावसात जल्लोष, सरकारच्या निर्णयाचं स्वागत
अकोला: अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी केले विषप्राशन, सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील होते. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेतजमीन गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ, गंभीर स्थितीतील शेतकऱ्यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु
Jammu & Kashmi : बसपानंतर बिजू जनता दल आणि एआयडीएमकेचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा, संयुक्त जनता दलाच्या खासदारांचा सभात्याग
#JammuAndKashmir काश्मीरबाबतच्या सरकारच्या प्रस्तावाला बसपाचा पाठिंबा #Article370
नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक संपली, काश्मीरबद्दल लोकसभेत गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात निवेदन करणार #JammuAndKashmir
नाशिक : जिल्ह्यात गेल्या 24 तासात रेकॉर्डब्रेक पाऊस,
तब्बल 1900 मिलिमीटर पावसाची नोंद, त्र्यंबकेश्वर आणि ईगतपुरीला पावसाने अक्षरशः झोडपले, त्र्यंबकेश्वर येथे 396 मिलिमीटर तर ईगतपुरीला 368 मिलिमीटर पावसाची नोंद
, नाशिक, दिंडोरी, पेठ येथे देखील 150 मिमीहून अधिक पाऊस
नागपूर : गीतांजली टॉकीज चौक बजेरिया वस्ती येथे अज्ञातांकडून सुमारे 20 ते 25 वाहनांची तोडफोड, मध्यरात्रीच्या सुमारास सर्व गाड्यांच्या काचा फोडल्या, महिनाभरातील तिसरी घटना
नवी दिल्ली : लोकसभेत काश्मीरप्रश्नी काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव, कामकाज सुरु होताच काश्मीरबाबत चर्चेची मागणी #JammuAndKashmir
मुंबई : कालपासून बंद असलेली सीएसएमटी ते कसारा वाहतूक सुरू, कसारावरुन लोकल आणि एक्सप्रेस गाड्या मुंबईकडे येण्यास सुरुवात, सीएसएमटीकडून कसाऱ्यासाठी लोकल सुरु, कल्याण ते कर्जत मार्ग मात्र अजूनही बंदच

पार्श्वभूमी

1. कलम ३५ ए वरुन काश्मीरमध्ये हालचालींना वेग, कलम १४४ लागू तर मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला नजरकैदेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे देशाचं लक्ष

2. आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

3. पावसाचा जोर ओसरल्यानं मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर, तिन्ही रेल्वे मार्ग पूर्ववत, लांबपल्ल्याच्या गाड्या मुंबईत येण्यास सुरुवात

4. गोदावरी, पंचगंगा, बारवी, उल्हास आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, गोदाकाठच्या परिसरातला वीजपुरवठा खंडीत, कोयनेचं पाणी कराड, पाटण शहरात

5. काँग्रेसचं अध्यक्ष तरूणांच्या हाती सोपवली जाण्याची शक्यता, देवरांकडून सचिन पायलट आणि सिंधिंयांचं नाव पुढे, 10 ऑगस्टला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

6. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त बाबुलनाथ, घृष्णेश्वर मंदिरं सजली, पहाटेपासून भक्तांची गर्दी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.