LIVE BLOG : कोल्हापुरात बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी चौघांना अटक

रिझर्व्ह बँकेचं तिमाही पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात, रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Apr 2019 11:22 PM
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 10 एप्रिलला अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर सोनिया गांधी 11 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार
निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे : कमी कालावधीत जास्त पैसे देण्याच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक, एकूण नऊ गुंतवणूकदारांची एक कोटी 40 लाख 27 हजार 500 रुपयांना फसवणूक झाल्याचं निष्पन्न, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड : वीज कोसळून दोघांचा मृत्यू, केज तालुक्यातील तांबवा येथील तारामती चाटे (40) तर धारुर तालुक्यातील दुनकवाड येथील संदीपान काळे (20) यांचा मृत्यू
बीड : वीज कोसळून दोघांचा मृत्यू, केज तालुक्यातील तांबवा येथील तारामती चाटे (40) तर धारुर तालुक्यातील दुनकवाड येथील संदीपान काळे (20) यांचा मृत्यू
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, उद्याची रिलीजींग डेट लांबणीवर
कोल्हापूर : बेकायदेशीर शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या आणि पुरवणाऱ्या चौघांना अटक, कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तीन बंदुका, 37 जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल जप्त
अहमदनगरमध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. अहमदनगरमधील अकोलकर येथे दिवटे वस्तीवर राहत असलेल्या दिनेश दिवटे या 25 वर्षीय तरुणांची हत्या करण्यात आली आहे. मोटारसायकल वरून आलेल्या 4 अज्ञात इसमांनी दिनेशवर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली आहे.
छत्तीसगड : कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी चकमक, चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद
केरळ : राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान गोंधळ, बॅरिकेट तुटल्यानं काही पत्रकार जखमी, राहुल गांधी यांची स्वतः जखमींना उपचारासाठी मदत
जळगावात भाजपने उमेदवार बदलला, स्मिता वाघ यांचा पत्ता कट, भाजपकडून उन्मेष पाटील दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज भरणार, भाजपकडून उन्मेष पाटील यांना एबी फॉर्म
मुंबई : रिझर्व्ह बँकेचं तिमाही पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात, रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर
मुंबई : सिल्वासाच्या (दादरा-हवेली) जागेवरून पुन्हा शिवसेना-भाजपमध्ये वाद, सिल्वासामध्ये नटूभाई पटेल भाजपचे विद्यमान खासदार असताना शिवसेनेकडून अंकिता पटेलला उमेदवारी, मात्र भाजपच्या दबावामुळे शिवसेनेवर उमेदवारी मागे घेण्याची वेळ
मुंबईतील गुजराती, मराठी आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसचं युवा संमेलन, गुजरातमधील युवा नेता हार्दिक पटेल आणि सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर संमेलनाचे मुख्य आकर्षण
मुंबई : रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा बैठक, काल रात्री तिघांमध्ये 'वर्षा' निवासस्थानी बैठक
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको, मुंबईकडे जाणारी लोकल अडवली, दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांविरोधात संतप्त महिलांचा रेल रोको
काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर, बुधवारी रात्री रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकाच विमानातून मुंबई प्रवास, चिखलठाणा विमानतळावर व्हीआयपी कक्षेत दोघांची अर्धा तास चर्चा



काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळमधल्या वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार, कालिकत विमानतळावरुन कलपेट्टा इथे हेलिकॉप्टरने पोहोचणार तेथून रोड शो करत जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार, केसी वेणुगोपाल आणि केरळ प्रभारी मुकुल वासनिकसोबत असणार

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा




    1. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, संध्याकाळी 6 वाजता नागपुरातही जाहीर सभा



 




    1. तिहार कारागृहातील कैदी पोलखोल करेल याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती, गोंदियातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप



 




    1. येत्या 15 दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत राधाकृष्ण विखे पाटलांकडून राजकीय भूकंपाचे संकेत



 




    1. किरीट सोमय्यांचा पत्ता कट, ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांना उमेदवारी, तिकीटासाठी मातोश्रीची मनधरणी केली नसल्याची सोमय्यांची स्पष्टोक्ती



 




    1. गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याच्या दरात प्रतितोळा 2 हजारांची घट, चांदीचे भावही घसरले



 




    1. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर 37 धावांनी विजय, केदार जाधवची एकाकी झुंज. चेन्नईची विजय घोडदौड रोखण्यात मुंबईला यश



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.