LIVE BLOG | निवडणूक आयोगाकडून दुष्काळासंदर्भात काम करण्याची परवानगी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
03 May 2019 11:37 PM
IPL 2019 : कोलकात्याची पंजाबवर विकेट्सने मात, शुभमन गिलचे शानदार अर्धशतक
निवडणूक आयोगाकडून दुष्काळासंदर्भात काम करण्याची परवानगी, जिथे निवडणुकीची प्रक्रिया पार पडली, तिथे काम केलं तर कोणतंही बंधन नाही, फक्त केलेल्या कामाचा प्रचार, पब्लिसिटी करण्यात येऊ नये, असे आदेश
जालनाच्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे एअर व्हॉल्व फोडून पाणी चोरणाऱ्या बारा जणांविरुद्ध गुन्हा, 39 लाख नुकसान केल्याची नगर अभियंत्याची पाचोड पोलिसात तक्रार, ज्या पाईपलाईनमधून जालना शहराला जायकवाडी धरणातून पाणी जाते त्यातून पाणी चोरल्याप्रकरणी गुन्हा
पुणे : धरणातील पाणीसाठा लक्षात घेता नियमितपणे पाणी पुरवठा केला जाणार, आठ ते दहा दिवसानी फेर आढावा घेणार, जून अखेरपर्यंत पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नाही, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची माहिती
नाशिक : उन्हाने हैराण झालेल्या नागरिकानी मोबाईल चोरांचा घेतला धसका, रात्री गच्चीवर झोपणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय ,एकाला अटक, 6 मोबाईल जप्त
घाटकोपर पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर 30 वर्षापेक्षा जास्त जुने असलेले सर्वोदय एसटी स्थानक पालिकेने डिसेंबर महिन्यात रस्ता रुंदीकरणाचे कारण सांगत बंद केलेय. चार महिने उलटून देखील या ठिकाणी बस स्थानक तयार न झाल्याने अखेर घाटकोपरच्या प्रगती मंचच्या सदस्यांनी या ठिकाणी तात्पुरता निवारा उभा करण्याचा प्रयत्न केला असता पालिकेने ते देखील काढून टाकले.
दूरदर्शन प्रशासनाविरोधात 140 हंगामी कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन, कागदोपत्री कामाचे केवळ आठ दिवस दाखवून महिनाभर काम करून घेणे, कमी पगार अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन
दूरदर्शन प्रशासनाविरोधात 140 हंगामी कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन, कागदोपत्री कामाचे केवळ आठ दिवस दाखवून महिनाभर काम करून घेणे, कमी पगार अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन
भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा उद्या दुपारी एक वाजता अमेठीत मेगा रोड शो, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप अमेठीमध्ये पूर्ण ताकद लावणार, 6 मे रोजी अमेठीमध्ये मतदान होणार
मुंबई : गणपती उत्सवासाठी कोणकणात जाणाऱ्या सर्व गाड्या फुल्ल, काही मिनिटांत बुकिंग संपलं, कोंकणवासीयांची पंचाईत
उल्हासनगर : पोलिसांच्या जाचाला कंटाळून सतीश खेडकर या तरुणाची आत्महत्या, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे दोन पोलीस आपल्याला त्रास देत असल्याची सतीशची मृत्यूपूर्वी माहिती, सतिशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार, मध्यवर्ती पोलीस ठाण्यासमोर मोठ्या जमावाचं ठिय्या आंदोलन
औरंगाबाद : दूषित पाण्यामुळे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 175 विद्यार्थिनींना डायरिया, खाजगी टँकरमधून आलेल्या दूषित पाण्यामुळे विद्यार्थिनींना डायरिया
मुंबई : बीग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याबाहेरील संरक्षक भिंतीवर लगेच हातोडा नाही, संरक्षक भिंत स्वत:हून काढून घेण्यासाठी बच्चन यांना एक महिन्याचा कालावधी दिला जाणार
चांदवड - दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर डोंगरावरील आदिवासी जमावाकडून हल्ला,
चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथील धक्कादायक घटना, हल्ल्यात काही जण जखमी,
हल्लेखोरांनी सहा ते सात मोटारसायकल जाळल्या
औरंगाबाद - दूषित पाण्यामुळे विद्यापीठातील 175 विद्यार्थीनींना डायरिया,
विद्यार्थिनी वसतिगृहात पाणी टंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा केल्याने विद्यार्थीनींना डायरियाची लागण,
काही विद्यार्थिनींवर खासगी रुग्णालयात तर काही विध्यार्थीनींवर विद्यापीठात उपचार

यवतमाळ : गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यातील शहीद अग्रमन रहाटे यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले आहेत. तरोडा गावात आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
यवतमाळ : गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यातील शहीद अग्रमन रहाटे यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले आहेत. तरोडा गावात आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यातील शहीद झालेले हिंगोलीतील जवान संतोष चव्हाण यांच्यावर आज ब्राह्मणवाडा इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यातील शहीद झालेले हिंगोलीतील जवान संतोष चव्हाण यांच्यावर आज ब्राह्मणवाडा इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
बुलडाणा : गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील जवान राजू गायकवाड यांचं पार्थिव आज सकाळी त्यांच्या मेहकर या मूळगावी आणण्यात आलं. अंत्ययात्रेनंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.

बीड : गडचिरोली नक्षल हल्ल्यातील शहीद शेख तौसिफ यांच्यावर पाटोदा इथे आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. शहीद जवान शेख तौसिफ यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाटोद्यातील त्यांच्या घरासमोर ठेवलं आहे.
फनी वादळ ओदिशा किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात,
पुरी, भुवनेश्वर, चिल्कामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
हिंगोली - वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे घरगुती गॅसचा स्फोट, तिघांचा मृत्यू
आज सकाळी 10 ते दुपारी 12 च्या दरम्यान 'फनी' चक्रीवादळ ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता,
वादळामुळे कोलकाता आणि भुवनेश्वर विमानतळ बंद,
223 रेल्वे थांबवल्या,
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष
मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावर चेंबूरजवळ टॅक्सीला आग
आगीमुळे चेंबूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या रस्ता काही काळ थांबवण्यात आला होता
सीएसएमटीहून चेंबूरला जाणारी मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी
पार्श्वभूमी
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारींचा 6 मेपर्यंत निकाल लावा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
2. राज ठाकरेंना मोदींविरोधातल्या प्रचारसभांचा खर्च सादर करावाच लागणार, निवडणूक अधिकारी दिलीप शिंदेंची माहिती, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
3. यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाला मराठा आरक्षणाचा लाभ नाही, नागपूर खंडपीठाचा निर्णय, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार
4. मुलांच्या घोषणाबाजीच्या व्हीडिओवरून प्रियंका गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस, मोदींविरोधातल्या घोषणा कुणी शिकवल्या, 3 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश
5. आज फनी चक्रीवादळ ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकणार, वादळामुळे सुमारे 220 रेल्वे बंद, तर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज
6. सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवर सनसनाटी विजय, मुंबईचं आयपीएलच्या प्ले ऑफचं तिकीट कन्फर्म