LIVE BLOG : महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल : नरेंद्र मोदी

महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल, घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलला आहे, असं टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदियात झालेल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या प्रचारसभेत सोडलं

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Apr 2019 10:45 PM
गोवा : भाजपचा महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला आणखी एक दणका, 2017 च्या निवडणुकीतील नावेलीचे उमेदवार सत्यविजय नाईक यांची 'मगो'ला सोडचिठ्ठी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत 250 समर्थकांसह भाजपप्रवेश
विरार : वसई विरार महापालिकेची पाईप लाईनच्या वॉल फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विरार पूर्व कुंभारपाडा परिसरात आज सायंकाळी साडे सातच्या सुमारास हा वॉल फुटला आहे.
ही माझी शेवटची निवडणूक, जाहीरपणे सांगतो, सोलापुरातील सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची घोषणा
ही माझी शेवटची निवडणूक, जाहीरपणे सांगतो, सोलापुरातील सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची घोषणा
महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलला आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलला आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
वैद्यकीय आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू करण्याविरोधात हायकोर्टात याचिका, सरसकट आरक्षण लागू केल्यानं राज्यातील आरक्षण 78 टक्के, समाजात असमतोल भावना वाढत चालल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप
माहुलवासियांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, 15 हजार रुपये मासिक भाडं आणि 45 हजार रुपये वार्षिक अनामत रक्कम म्हणून देण्याचे राज्य सरकारला निर्देश, प्रकल्पबाधितांना माहुलमध्ये पुनर्वसनाची सक्ती, राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका
माहुलवासियांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, 15 हजार रुपये मासिक भाडं आणि 45 हजार रुपये वार्षिक अनामत रक्कम म्हणून देण्याचे राज्य सरकारला निर्देश, प्रकल्पबाधितांना माहुलमध्ये पुनर्वसनाची सक्ती, राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका
लोकसभा निवडणुकीत पत्ता कट झालेले भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचं पुनर्वसन होणार, राज्यसभेवर भाजप किरीट सोमय्या यांना संधी देणार, सूत्रांची माहिती
मुंबई ईशान्यमधून किरीट सोमय्या यांचा पत्ता कट, मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर
शेतातील उसाला लागलेल्या आगीमुळे पुण्यात बिबट्यांच्या पाच बछड्यांचा होरपळून मृत्यू, साधारण 15 ते 20 दिवसांपूर्वीच त्यांचा जन्म झाल्याचा वनविभागाचा अंदाज
यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव, जून ते सप्टेंबर ह्या कालावधीत देशामध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता, स्कायमेटचा अंदाज
मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची बिनविरोध निवड, पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा यशवंत जाधव यांच्याकडे
मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची बिनविरोध निवड, पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा यशवंत जाधव यांच्याकडे

मुंबई : 'इलेक्शन ड्युटी' खाजगी शाळांतील शिक्षकांना लागू होत नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टात कबुली, खाजगी शाळांमधील शिक्षकांना मोठा दिलासा
मुंबई : चेंबूरमध्ये 2 ते 3 जण सेप्टिक टँकमध्ये पडले, माहूल रोड इथली सकाळी दहा वाजताची घटना
मुंबई : चेंबूरमध्ये 2 ते 3 जण सेप्टिक टँकमध्ये पडले, माहूल रोड इथली सकाळी दहा वाजताची घटना
कवी कुमार विश्वास भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, कुमार विश्वास यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात सकाळी 8:30 च्या सुमरास कंटेनर पलटला, चालकाचा ताबा सुटल्याने अपघात, एका लेनवरुन धिम्यागतीने वाहतूक सुरु
मनमाड : मालेगाव तालुक्यातील लखाने इथल्या आदिवाशी वस्तीवर राहणाऱ्या अजय श्रावण सोनवणे नावाच्या मुलाचा मृत्यू, उष्माघातनाने अजयचा मृत्यू झाल्याची शक्यता
पुणे : जुन्नर तालुक्यात शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ, केवळ छंद असल्याने ज्येष्ठ व्यक्तीने हा साठा तयार केल्याची प्राथमिक माहिती, जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी येथील हा प्रकार, पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसची कारवाई
जम्मू-कश्मीरच्या पुंछ भागात पाकिस्तानकडून गोळीबार, पाच नागरिक जखमी, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर

पार्श्वभूमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात, गोंदियात संध्याकाळी जाहीर सभा, तर उद्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचाही महाराष्ट्र दौरा

2. पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबियांची चिंता करु नये, कोल्हापुरातील सभेत शरद पवाराचं प्रत्युत्तर तर पुतणे अजित पवारांवर स्तुतीसुमनं

3. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यासाठी सुरुवात, आज सुप्रिया सुळे, इम्तियाज जलील, मोहन जोशींसह अनेक दिग्गज नेते अर्ज दाखल करणार

4. निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं टेम्पल रन, वसईतील गुरुद्वारामध्ये माथा टेकवला, तर बिशप हाऊस आणि वसई किल्ल्यालाही भेट

5. यंदाच्या मान्सून संदर्भात स्कायमेटचा दुसरा अंदाज आज जाहीर होणार, अंदाजाकडे शेतकऱ्यांसह सामान्यांचंही लक्ष

6. राजस्थान रॉयल्सकडून बंगलोरचा सात विकेटसनी धुव्वा, जोश बटलरची 59 धावांची खेळी, आयपीएलमध्ये बंगलोरचा सलग चौथा पराभव

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.