LIVE BLOG :पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला आणखी 3000 कोटींचा प्रस्ताव पाठवणार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Sep 2019 11:10 PM
पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला आणखी 3000 कोटींचा प्रस्ताव पाठवणार,
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय,

पहिल्या प्रस्तावात 6,813 कोटींची मागणी प्राथमिक अंदाजाच्या आधारावर करण्यात आली होती, आता पंचनामे आणि केंद्रीय पथकाच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यानंतर अतिरिक्त 3000 हजार कोटींची मागणी
कर्नाटकातील काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांना अटक, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, वैभववाडीत मुसळधार पाऊस, गणेशोत्सवात ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, वैभववाडीत मुसळधार पाऊस, गणेशोत्सवात ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या कृपाशंकर सिंह यांच्यावर युतीच्या नेत्यांची कृपा, काल मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या घरी भेट दिली होती, त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या कृपाशंकर सिंह यांच्यावर युतीच्या नेत्यांची कृपा, काल मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या घरी भेट दिली होती, त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली
आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला राज ठाकरे यांची भेट, काल अमित शाह यांनी घेतलं होतं दर्शन
मुंबई : शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 800 अंकांची कोसळला, रुपयाच्या मुल्यात 64 पैशांनी घसरण
काश्मीरमध्ये एमटीडीसीची दोन रिसार्ट होणार, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय, 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये रिसॉर्ट करणारं महाराष्ट्र हे पहिल राज्य, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
कोल्हापूर : भडगाव ते सामनगड घोडागाडी शर्यतीत अपघात झाल्याची घटना, अंगावर काटा उभा राहील अशी अपघाताची दृश्य, 1 सप्टेंबर रोजी झाली होती घोडा गाडी शर्यत, अपघात झाल्यावरही दोन जोड्या पुन्हा शर्यतीत धावू लागल्या
धुळे : जिल्ह्यातील दोंडाईचा जवळ असलेल्या मांडळ रोडवरील के एस कोल्ड स्टोरेजला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आग, तब्बल 12 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश
#Uran | रायगड : उरण ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये भीषण आग, सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, मृतांमधे अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश
#Uran | रायगड : उरण ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये भीषण आग, सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, मृतांमधे अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश
उरणच्या ओएनजीसी गॅस प्लँटला भीषण आग, उरण, जेएनपीटी आणि ओएनजीसी फायर ब्रिगेडच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी, तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार, सायन, हिंदमाता भागात पाणी साचलं, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही संततधारा सुरुच, मध्य रेल्वे उशिरानं

पार्श्वभूमी

 




    1. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार, सायन, हिंदमाता भागात पाणी साचलं, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही संततधारा सुरुच, मध्य रेल्वे उशिरानं



 




    1. भाजपच्या वाटेवर असलेल्या उदयनराजेंची मनधरणी करण्यात अमोल कोल्हे अपयशी, मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही, बैठकीनंतर कोल्हेंचे सूचक उद्गार



 




    1. अमेरिका बनावटीची 8 अपाचे एएच-64 लढाऊ हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल, पठाणकोटमध्ये आज लोकार्पण कार्यक्रम



 




    1. युद्धाची भाषा करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नरमले, पाककडून पहिल्यांदा अण्वस्राचा वापर होणार नसल्याचं विधान



 




    1. टीम इंडियानं जमैका कसोटीत विंडीजचा २५७ धावांनी उडवला धुव्वा, भारताचं मालिकेत २-० असं निर्भेळ यश



 




    1. दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचं आज विसर्जन, मुंबईतल्या समुद्रात दुपारी भरतीच्या लाटा उसळणार, कृत्रिम तलाव वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.