LIVE BLOG : अयोध्या प्रकरणी 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
02 Aug 2019 11:28 PM
पालघर :जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु, सूर्या प्रकल्पच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे 50 सेमीवरुन 70 सेमीने उघडले, धामणी आणि कवडास धरणातून मिळून 21,600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला, नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा, गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार
नाशिक : पेठ रोडवर रासेगावजवळ ट्रक आणि क्रूझर गाडीची समोरासमोर धडक, दोन जण ठार, सहा ते सात जण गंभीर जखमी
नाशिक : पेठ रोडवर रासेगावजवळ ट्रक आणि क्रूझर गाडीची समोरासमोर धडक, दोन जण ठार, सहा ते सात जण गंभीर जखमी
नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणावर 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी, मध्यस्थ समितीच्या अहवालात तोडगा न निघाल्याने निर्णय, आठवड्यात तीन दिवस सुनावणी होणार
जम्मू काश्मीरमध्ये 28 हजार जवान पाठवले नाही : गृह मंत्रालय
जर 200 च्या पुढे जागा जिंकण्याचा विश्वास आहे तर बॅलेट पेपरवर घ्यायला काय हरकत आहे : राज ठाकरे
अमेरिकेत बनलेल्या चीपेवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा : राज ठाकरे
मतदारांकडून ईव्हीएम संबंधित मत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरुन घेणार
ममता बॅनर्जींनी देखील या लढाईत सहभागी होण्याबाबत सांगितलं आहे : राज ठाकरे
ईव्हीएमबाबत समज-गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपली : बाळासाहेब थोरात
21 तारखेचा मोर्चा कुण्या पक्षाचा नाही तर सर्वसामान्य जनतेचा असेल : राजू शेट्टी
सगळ्यांना एकत्र आणल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानले पाहिजेत : छगन भुजबळ
अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘गोल्डन ग्लोब’ ॲवाॅर्डस् साठी, ‘मोशन पिक्चर इन फाॅरेन लॅंगवेज’ ह्या कॅटॅगरी मध्ये ‘बाबा’ ची निवड
LIVE : एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार घोषित, रवीश कुमार यांच्य़ा प्राईम टाईम कार्यक्रमातून वास्तविक आणि सामान्य नागरिकांचे अत्यंत दुर्लक्षित राहिलेल्या विषयांवर भाष्य होत असल्याचा या पुरस्कारातून गौरव
नागपूर - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज नागपुरात, मुख्यमंत्री करतील रोड शो
बेळगाव-संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीला पूर,गोटूर बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
बेळगाव-भडकल गल्ली,बेळगुंदी येथे मुसळधार पावसामुळे घराच्या भिंती कोसळल्या.
बेळगाव-खाणपेठ येथे महिलेवर बलात्कार,कटकोळ पोलिसात गुन्हा दाखल.
पुणे | पुण्यातील गणेश पेठेत बोरा हॉस्पिटलजवळ मध्यरात्री वाड्याची भिंत कोसळली; घराची भिंत पडत असल्याचं वेळीच लक्षात येताच आई-मुलगा बाहेर पळाल्याने बचावले.
पुणे | पुण्यातील गणेश पेठेत बोरा हॉस्पिटलजवळ मध्यरात्री वाड्याची भिंत कोसळली; घराची भिंत पडत असल्याचं वेळीच लक्षात येताच आई-मुलगा बाहेर पळाल्याने बचावले.
पार्श्वभूमी
1. राज ठाकरे ईडीच्या रडारवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, कोहीनूर मिलचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
2. ईव्हीएमबाबत भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार
3. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं मिशन विधानसभा सुरु तर शिवसेनेसाठी आजपासून बांदेकर भावोजींचा माऊली संवाद, जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य आज नांदेड, परभणीत
4. राष्ट्रवादी सोडणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल, गयारामांना शरद पवारांचा टोला, तर कुरघोड्या थांबल्या नाहीत म्हणून पक्ष सोडल्याचा शिवेंद्रराजेंचा पलटवार, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेची शपथ
5. राज्यभरात पावसाची संततधार, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडले, हतनूर धरणाच्या 36 दरवाजांमधून विसर्ग सुरु, नाशिक चंद्रपुरातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला
6. पाकिस्तानच्या ताब्यातील कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळणार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानचा निर्णय