LIVE BLOG | राजस्थानच्या बिकानेर बॉर्डरवर भारतीय वायूदलाने संशयित ड्रोन पाडलं

संपूर्ण देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Mar 2019 08:15 PM
पुण्यातील भिमाशंकर डोंगरावर प्रेमी युगुलाची दरीत उडी मारुन आत्महत्या, पोलिस घटनास्थळी दाखल, ट्रेकर्सची टीमही रवाना
50 वर्षांचा युवक राहुल गांधी बालबुद्धी असलेला युवक नेता, खासदार पूनम महाजन यांची राहुल गांधींवर शेलक्या शब्दात टीका
राजस्थानच्या बिकानेर बॉर्डरवर भारतीय वायूदलाने संशयित ड्रोन पाडलं, ड्रोन भारताच्या सीमेवर घिरट्या घालताना सैन्याची कारवाई, आज सकाळीच पाकिस्तानकडून हवाई मार्गाने घुसखोरीचाही प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे शहीद निनाद मांडवगणे यांचा घरी दाखल,
मांडवगणे कुटुंबाच्या सांत्वनासाठी भेट
RSS च्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काँग्रेसच्या पत्राला उत्तर
RSS च्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काँग्रेसच्या पत्राला उत्तर
मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ चारचाकी जाळून खाक, भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकीला अचानक आग लागली, चालक आणि इतर प्रवाशी सुखरुप, काहीकाळ महामार्गावरील वाहतूक रोखली

मुंबई : काल उद्घाटन झालेल्या परेल टर्मिनसवर आज तांत्रिक बिघाड, पॉईंट फेल झाल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक बंद, सीएसएमटीकडे जाणारी आणि दादरकडे जाणारी वाहतूक 12.55 पासून विस्कळीत, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु
मुंबई : काल उद्घाटन झालेल्या परेल टर्मिनसवर आज तांत्रिक बिघाड, पॉईंट फेल झाल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक बंद, सीएसएमटीकडे जाणारी आणि दादरकडे जाणारी वाहतूक 12.55 पासून विस्कळीत, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु
बॉम्ब जंगलात पडले नसते, तर पाकिस्तानने उत्तर दिलं नसतं, किती अतिरेकी मारले हे मोजणं आमचं काम नाही, एअर स्ट्राईकनंतर वायूसेनेचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण

शांततेच्या नोबेलसाठी मी पात्र नाही, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्वीट, काश्मिरी जनतेच्या कलाने काश्मिर प्रश्न सोडवणारी आणि उपखंडात शांती आणि विकास प्रस्थापित करणारी व्यक्तीच नोबेलसाठी पात्र ठरेल, इम्रान यांचं वक्तव्य




मुंबई : 'साहेब, मराठी शाळा वाचवा' महापालिकेने मान्यता दिलेल्या 104 खाजगी शाळांना अनुदान द्या, प्राथमिक शाळा शिक्षिकांचं 'मातोश्री'बाहेर आंदोलन, आंदोलनाची ही जागा नाही, पोलिसांनी शिक्षिकांना हटवलं
शरद पवार यांची काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक, थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत घेणार बैठक
नाशिक | त्र्यंबक मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार, खासदार हेमंत गोडसे करणार मध्यस्थी

पार्श्वभूमी


  1. RSS च्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काँग्रेसच्या पत्राला उत्तर

  2. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा खात्मा झाल्याची सर्वत्र चर्चा, 26 फेब्रुवारीपासून कुणालाही भेटला नसल्याचीही माहिती

    2. एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांकडून सैन्याचं मानसिक खच्चीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, यूपीतील अमेठीत अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती सुरु होणार

    3. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या स्पष्टोक्तीमुळे आघाडीत पुन्हा तिढा, पुत्र सुजय भाजपच्या वाटेवर असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे संकेत

    4. दुसऱ्या टप्प्यातल्या मोनोला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील, तर परळ टर्मिनसचंही रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार

    5. भाजपच्या बाईक रॅली अभियानात मंत्री बबनराव लोणीकर घोड्यावर, जालन्यातील मंठा परिसरात घोड्यावरुन फेरफटका

    6. महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, लाखो भक्तांनी मंदिरं गजबजली, मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात शिवलिंगावर दुग्धाभिषेक

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.