LIVE BLOG | मुंबईत दुसरी एसी लोकल दाखल होणार
मुंबई | मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा विचार, अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यातील आमदार मुंबईत विधानभवनात परिसरात असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अधिक ताण, सर्व VIP एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर जास्त संवेदनशील
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 27 Feb 2019 09:34 PM

पार्श्वभूमी
पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैशचं कंबरडं मोडलं, मेहुणा, 2 भावांसह 325 अतिरेक्यांचा खात्मा, दहशतवादी ट्रेनिंग सेंटर बेचिराखभारतीय वायूसेनेच्या 12 मिराज विमानांचं पाकिस्तानात एअर स्ट्राईक, दहतवाद्यांच्या डोक्यावर फोडला 1...More
पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैशचं कंबरडं मोडलं, मेहुणा, 2 भावांसह 325 अतिरेक्यांचा खात्मा, दहशतवादी ट्रेनिंग सेंटर बेचिराखभारतीय वायूसेनेच्या 12 मिराज विमानांचं पाकिस्तानात एअर स्ट्राईक, दहतवाद्यांच्या डोक्यावर फोडला 1 हजार किलोचा इज्रायली बाँम्बभारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून 7 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन, मुझफ्फराबाद सीमेवर पाकचं कंट्रोल रुम, गाव रिकामी करण्याचे प्रयत्न सुरुभारताच्या कारवाईनंतर चीनचं तोंड उघडलं, पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारताला संयम बाळगण्याचा चीनचा सल्ला, ऑस्ट्रेलियाची भारताला साथसौगंध इस मिट्टी की, मै देश को मिटने नही दूंगा, एअर स्ट्राईकनंतर पहिल्याच भाषणात नरेंद्र मोदींचा घणाघात,भारतीय वायुसेनेच्या कर्तबागारीनं देशाचा ऊर भरुन आला, कुठे जल्लोष, कुठे फटाक्यांची आतषबाजी तर कुठे मिठाई-पेढ्यांचं वाटप
पंढरपूर | माढा लोकसभा मतदारसंघातून खा. राजू शेट्टी यांनी शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवावी, वेळापूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात रविकांत तुपकर यांनी मांडला ठराव