LIVE BLOG | सातारा : बिग बॉस स्पर्धक अभिजीत बिचुकलेच्या जामिनावर 27 जूनला सुनावणी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 24 Jun 2019 10:24 PM

पार्श्वभूमी
1. येत्या तीन दिवसात कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, मुंबईतही मान्सून आजच दाखल होण्याची शक्यता2. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान मुंबई महापालिकेच्या डिफॉल्टर यादीत, इतर अनेक मंत्र्यांचीही 8 कोटींची थकबाकी, माहिती...More
1. येत्या तीन दिवसात कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, मुंबईतही मान्सून आजच दाखल होण्याची शक्यता2. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान मुंबई महापालिकेच्या डिफॉल्टर यादीत, इतर अनेक मंत्र्यांचीही 8 कोटींची थकबाकी, माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा3. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी भाजप-शिवसेनेची संयुक्त बैठक, आमदारांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती4. काळ्या पैशांबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्वपूर्ण अहवाल सादर होणार, अहवालात देशविदेशातल्या काळ्या पैशाबाबत विस्तृत माहिती5. ताडोबाच्या जंगलात बछड्यांना शिकार शिकवणारी माया वाघीण पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद, रानगवा थोडक्यात बचावला6. पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी विजय, आफ्रिकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात, आज अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये लढत
मुंबई : सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी 22 निर्दोष आरोपींना हायकोर्टाची नोटीस, सोहराबुद्दीनचा भाऊ रूबाबुद्दीन शेखनं दिलंय सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला आव्हान