LIVE BLOG | यवतमाळ, नांदेडमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
21 Jun 2019 10:04 PM
यवतमाळ, नांदेडमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के, यवतमाळमध्ये महागाव, उमरखेड तर नांदेडमध्ये किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव तालुक्यात
भागात भूकंपाच सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मंत्रालयात पिण्याच्या दुषित पाणी पुरवठ्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी उलट्या आणि जुलाबाने हैराण,
शेकडो अधिकारी/कर्मचारी दवाखान्यात दाखल
मुंबई : माझगाव डॉकयार्डमध्ये जहाजाला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु, आगीचे कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आमंत्रणावरुन आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर-राणा यांनी दिल्ली येथील शा यांच्या राहत्या घरी भेट घेतली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आमंत्रणावरुन आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर-राणा यांनी दिल्ली येथील शा यांच्या राहत्या घरी भेट घेतली
नवी मुंबई महापालिकेची धोकादायक इमारतींवर कारवाई, वाशीतील इमारतींचे वीज पाणी बंद, पोलीस बंदोबस्तात महापालिकेची कारवाई, धोकादायक इमारतीमध्ये राहणारे रहिवाशी संतप्त
नाशिक : परिवहन महामंडळाच्या बसचालकाला पिकअप ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांकडून बेदम मारहाण,
ओव्हरटेक करण्यावरुन वाद,
बस नाशिकहून कोपरगावला जात असताना सिन्नर घाटातील घटना
सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथे महाकाय पिंपळाचे झाड पडून तीन घरांचे नुकसान,
मान्सून पूर्व पावसाने जमिन चिखलमय झालेली आणि सोसाट्याच्या वाऱ्यामूळे पिंपळाचे झाड बाजूला असलेल्या घरांवर पडले, तीन घरांचे लाखाचे नुकसान मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
उद्या मुंबईत भाजप पदाधिकरी आणि लोकप्रतिनिधींची बैठक
,
दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक,
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा : छत्रपती संभाजी महाराज यांची मागणी
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानपरिषदेत विधेयक मंजूर, एकमताने विधेयक मंजूर, विधानसभेने मंजूर केलेले विधयेक परिषदेत मंजूर
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद मुस्लिम महिलांच्या सबलीकरणासाठी तात्काळ तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर
गहूंजे बीपीओ कर्मचारी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशी मुंबई उच्च न्यायालयानं पुढे ढकलली,
पुढील निर्देश येईपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश, 24 जूनला होणार होती पुरूषोत्तम बोराडे आणि प्रदिप कोकडे यांना फाशी
शिर्डी : तुरुंगाचे गज कापून दोन आरोपींचे पलायन, संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील प्रकार, पहाटेच्या सुमारास तुरुंगाचे तीन गज कापून केले पलायन, पळून गेलेल्या दोघांना तासाभरात पोलिसांनी केले जेरबंद
शिर्डी : तुरुंगाचे गज कापून दोन आरोपींचे पलायन, संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील प्रकार, पहाटेच्या सुमारास तुरुंगाचे तीन गज कापून केले पलायन, पळून गेलेल्या दोघांना तासाभरात पोलिसांनी केले जेरबंद
शिर्डी : तुरुंगाचे गज कापून दोन आरोपींचे पलायन, संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील प्रकार, पहाटेच्या सुमारास तुरुंगाचे तीन गज कापून केले पलायन, पळून गेलेल्या दोघांना तासाभरात पोलिसांनी केले जेरबंद
यवतमाळच्या वटबोरी गाव जवळ एसटी बस आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात, एसटी चालक ठार तर बसमधील 15 प्रवासी जखमी
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद मुस्लिम महिलांच्या सबलीकरणासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मांडणार
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद मुस्लिम महिलांच्या सबलीकरणासाठी तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मांडणार
मुस्लिम आरक्षण मुद्द्यावरून विधान परिषदेत आज विरोधकांचा गदारोळ, मुस्लिमांना शैक्षणिक आणि नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी
मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ
जमीन खरेदीदारांसाठी मोठा दिलासा, फसवणूक टाळण्यासाठी सातबाराचं नवं अद्ययावत रुप लवकरच, सरकार विधीमंडळात विधेयक मांडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी, सूत्रांची माहिती
केरळच्या गुरुयावूर मंदिरात आढळले मल्याळम भाषेतील धमकीचे पत्र
गडचिरोली नक्षलवादी हल्ला प्रकरणी पोलीस उपअधीक्षकाचे निलंबन, विधानपरिषदेत गृह राज्यमंत्री केसरकर यांची घोषणा, स्थानिक पोलीस उप अधीक्षकच्या विरोधात स्थानिक पातळीवर तीव्र भावना, शहीद झालेल्या पोलीस जवानाच्या पत्नीने केली होती तक्रार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निलंबनाची मागणी केली
ट्रान्स हार्बर मार्ग विस्कळीत, ऐरोली स्टेशनजवळ एक लोकल गेले 20 मिनिटे थांबून,
लोकलमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती
शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशबाबत तीन जून रोजी काढलेल्या परिपत्रकात सुधारणा, ज्या आयसीएसई विद्यार्थ्यांना राज्यातील कनिष्ठ महविद्यालयात प्रवेश घ्यायचा त्यांचे सरासरी गुण म्हणजेच percentage marks ग्राह्य धरले जाणार
पानसरे हत्या प्रकरण : आरोपी शरद कळसकरला घेऊन एसआयटीचे पथक तपासणीसाठी औरंगाबादेत, केसापुरी गावातील घराची आणि शेतातही तपासणी
पानसरे हत्या प्रकरण : आरोपी शरद कळसकरला घेऊन एसआयटीचे पथक तपासणीसाठी औरंगाबादेत, केसापुरी गावातील घराची आणि शेतातही तपासणी
International Yoga Day | आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने नांदेडमध्ये कार्यक्रम ,
योगगुरू रामदेव बाबा यांच्यासह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
पार्श्वभूमी
1. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम, नांदेडच्या योगगरु रामदेव बाबांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी
2. एमएमआरडीएचं अधिकारक्षेत्र वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर, एमएमआरडीएच्या अंतर्गत ठाणे, रायगड आणि पालघरचा समावेश, विकासकांमांना गती मिळणार
3. सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीसाठी कायदा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, तर संख्यानामाच्या वादानंतर समिती स्थापन करण्याचाही निर्णय
4. अखेर मान्सून महाराष्ट्रात धडकला, वरूणराजा कोकणात दाखल झाल्याचं हवामान खात्याकडून जाहीर, 25 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार
5. लोकसभेत आज तिहेरी तलाक विरोधी विधेयक सादर होणार, तीन तलाक आणि हलाला प्रथा हद्दपार करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांचं अभिभाषणातून आवाहन
6. टीम इंडियाला दुखापतींमुळे तिसरा धक्का, नेट प्रॅक्टीस दरम्यान विजय शंकरच्या तळपायाला दुखापत, अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अनिश्चितता