LIVE BLOG : विधानसभा निवडणुकीआधी राज्यात 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 20 Jul 2019 11:55 PM

पार्श्वभूमी
1. पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, रायगडवरुन परत येत असताना काळाचा घाला2. चुनारच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रियंका गांधीचं गेले 18 तास धरणं, सोनभद्र हत्याकांडावरुन राजकराण पेटलं,...More
1. पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, रायगडवरुन परत येत असताना काळाचा घाला2. चुनारच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रियंका गांधीचं गेले 18 तास धरणं, सोनभद्र हत्याकांडावरुन राजकराण पेटलं, महाराष्ट्र काँग्रेसही आक्रमक3. कर्नाटकातील राजकीय नाट्याचा नवा अंक सुरु, राज्यपालांच्या हस्तक्षेपावरुन कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात, आता विश्वासदर्शक ठरावावर सोमवारी चर्चा4. मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवावं हे शिवसेनेनं ठरवावं, माझाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान, धुळ्यातील जनआशीर्वाद यात्रेत शक्तप्रदर्शन5. मोठ्या प्रतिक्षेनंतर औरंगाबाद, जालना, बीड जिल्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी, बळीराजाला तात्पुरता दिलासा, सिंधुदुर्गातलही मुसळधार पाऊस6. विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड अखेर रविवारी होणार; महेंद्रसिंग धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार की, निवृत्त होणार, उत्सुकता अजूनही कायम
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन जण ताब्यात, चाईल्ड हेल्पलाईनची कारवाई : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर वणी येथील चार तरुणांनी वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचे यवतमाळमधील चाईल्ड हेल्पलाईनने उघडकीस आणले आहे. यापैकी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.