LIVE BLOG | बैठक सुरु असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, परभणी लोकसभेच्या पराभवावरून वादावादी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
23 Jun 2019 11:37 AM
सांगली- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 लाखाचे लुटमार प्रकरण, आठवड्याभरानंतरही पोलिसांना चोरीचे धागेदोरे सापडले नाहीत, आठवडाभरात सांगली पोलिसांनी तब्बल 1 हजार जणांची केली चौकशी,
संशयित चोरट्यांची रेखाचित्रेही पोलिसांकडून जाहीर
संशयित चोरट्यांची रेखाचित्रेही पोलिसांकडून जाहीर
सांगली- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 लाखाचे लुटमार प्रकरण, आठवड्याभरानंतरही पोलिसांना चोरीचे धागेदोरे सापडले नाहीत, आठवडाभरात सांगली पोलिसांनी तब्बल 1 हजार जणांची केली चौकशी,
संशयित चोरट्यांची रेखाचित्रेही पोलिसांकडून जाहीर
संशयित चोरट्यांची रेखाचित्रेही पोलिसांकडून जाहीर
मुंबई : राष्ट्रवादीच्या काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी भवनाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, परभणीचे कार्यकर्ते आपसात भिडले, परभणी लोकसभा मतदारसंघात पराभव कोणामुळे झाला यावरून वादावादी
बुलडाणा : बोलेरो- कंटेनरचा अपघात, अपघातात चार जण जागीच ठार
बुलडाणा : बुलडाण्याच्या घाटपुरी इथं घरावर निबांचे झाड पडल्याने तिघांचा मृत्यू, हिरडकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मृतकात एक महिला आणि दोन मुलांचा समावेश
जालना-दोन ठिकाणी वीज पडून 10 शेळ्या आणि एका बैलाचा मृत्यू
उत्तर नगर जिल्ह्यात काही भागात पावसाला सुरूवात,
राहुरी ,राहाता तालुक्यात मुसळधार पाऊस तर श्रीरामपूर येथे रिमझिम
राहुरी ,राहाता तालुक्यात मुसळधार पाऊस तर श्रीरामपूर येथे रिमझिम
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात जोरदार पाऊस. हिवरखेड गावात रस्त्यावर साचलं पाणी.
पातूर येथे वीज केंद्राजवळ वीज पडून एकाचा मृत्यू, एक जण जखमी, मृतक अभिजीत इंगळे बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथील रहिवाशी
वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पाऊस, रोहिणी आणि मृग नक्षत्र खाली गेल्यानंतर आद्र नक्षत्रामध्ये पाऊस
पिंपरी चिंचवडमध्ये स्पेअर पार्टचं डाय बनवणाऱ्या कंपनीत सिलेंडरचा स्फोट , तीन कामगार जखमी
पार्श्वभूमी
- मान्सून 21 जूनपर्यंत कोकणात, तर 24 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार, हवामान विभागाची माहिती, पेरण्या खोळंबल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
- राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार, निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची शक्यता, राज्याचा विकासदर साडेसात टक्के
- अमित शाहांकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर जेपी नड्डा भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी, मोदींकडून नड्डांचं अभिनंदन, काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सस्पेन्स कायम
- नवी मुंबईतल्या कळंबोलीत बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं खळबळ, वस्तूमध्ये आयईडी असल्याचा पोलिसांना संशय, बॉम्बशोधक पथकाला पाचारण
- बालभारतीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये नवे बदल, 21 ते 99 मधील अंकांना संख्यावाचनानुसार शिकवण्याच्या सूचना
- विश्वचषकामध्ये बांगलादेशचा वेस्ट इंडिजवर सनसनाटी विजय, बांगलादेशकडून 7 विकेट्स राखत 322 धावांचं आव्हान पूर्ण
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -