LIVE BLOG : अभिजीत बिचुकलेला जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jul 2019 08:35 PM
नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदा बरखास्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारचा निर्णय, पाचही जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्याही बरखास्त
यवतमाळ :
कुंभारखणी येथे कोळसा खाणीत गुदमरुन दोघांचा मृत्यू, दोन कर्मचारी जखमी
मराठी बिग बॉसफेम अभिजीत बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार,
बिचुकलेविरोधातील खंडणीचा खटला जलदगतीने निकाली काढण्याचे सातारा सत्र न्यायालयाला हायकोर्टाकडून निर्देश,
21 जूनला मुंबईत मराठी बिग बॉसच्या सेटवरून बिचुकलेला अटक झाली होती.
भिवंडी : कामवारी नदीच्या पात्रात मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या इरफान शेखचा (12) पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
गुजरात : काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकेर यांचा भाजपमध्ये प्रवेश



कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान कासकरला अटक, खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन केली अटक, रिझवान देश सोडून जाण्याचा प्रयत्नात होता
सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे, ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट
मुंबई : दाऊदचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिझवान याला अटक, मुंबई क्राईम ब्रांचकडून बेड्या
कर्नाटक : कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला, कुमारस्वामींकडे 100 पेक्षा कमी संख्याबळ, भाजपकडे बहुमत, विधानसभेत मतदानापूर्वी येडियुरप्पांचा दावा
#Chandrayaan2 मोहिमेची तारीख जाहीर, 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी प्रक्षेपण होणार
राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, दोन ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणी दररोज सुनावणी, पाच न्यायाधीशांचं खंडपीठ करणार सुनावणी
कसारा घाटात इगतपुरीकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचा डबा घसरला, रात्रीची घटना, मात्र अजूनही डबा हटवलेला नाही, त्यामुळे इगतपुरीकडे जाणारा डाऊन मार्ग पूर्णपणे बंद, अप आणि मिडल लाईनवरुन पर्यायी वाहतूक सुरु, मुंबई गोरखपूर एक्स्प्रेसचा एक डबा घसरला अशी माहिती आरपीएफने दिली आहे.

पार्श्वभूमी

 




    1. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण यांच्या फाशीवरची स्थगिती कायम, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जल्लोष, मात्र नव्यानं खटला सुरु होणार असल्यानं आव्हान कायम





 




    1. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकने टेकले गुडघे, हाफिजला भारताकडे सोपवण्याच्या मागणीला जोर





 




    1. आजपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जनआशिर्वाद यात्रेवर, विधानसभेच्या तोंडावर जनतेशी जवळीक साधण्याचा सेनेचा नवा प्रयोग





 




    1. काँग्रेसचा कार्याध्यक्षच भाजपच्या वाटेवर असल्याचे चंद्रकांत पाटलांचे संकेत, तर चंद्रकांत पाटलांचं विधान हास्यास्पद, काँग्रेसच्या विश्वजीत कदमांचं उत्तर





 




    1. कर्नाटक विधानसभेत आज कुमारस्वामींची विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा, बंडखोर आमदारांना हजर राहण्याची सक्ती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय





 




    1. पन्हाळ्यावर दारु पित बसलेल्या टोळक्याला शिवराष्ट्र कार्यकर्त्यांनी दिला चोप, पावनखिंडीवरची सुरक्षा वाढवण्याची गरज अधोरेखित करणारी घटना



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.