LIVE BLOG | कुलभूषण जाधव प्रकरण : 15-1 मतांनी निकाल भारताच्या बाजूने
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
17 Jul 2019 07:20 PM
BREAKING | कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल ही पाकिस्तानला चपराक, उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
कुलभूषण जाधव यांची सुरक्षितता आता अधिक महत्त्वाची, उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
कुलभूषण यांच्या निकालानंतर हेगमधील भारतीयांनी जल्लोष केला. यावेळी भारत माता कि जय अशा घोषणांनी परिसर निनादून केला.
#BREAKING | कुलभूषण जाधव प्रकरण : फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार होणार, आंतरराष्ट्रीय वकील रीमा ओमर यांची माहिती
BREAKING | कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजूनं निकाल, कॉन्सूलर अॅक्सेस मिळणार
#BREAKING | कुलभूषण जाधव प्रकरण : भारताचा सर्वात मोठा विजय, उज्वल निकम यांची प्रतिक्रिया
कुलभूषण जाधव प्रकरण : भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती, भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय
केसरभाई इमारत दुर्घटनेला दाऊद जबाबदार, अंडरवर्ल्डच्या दबावामुळे इथल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण : मधू चव्हाण, सभापती, मुंबई म्हाडा
कुलभूषण जाधव प्रकरण । 15-1 मतांनी निकाल भारताच्या बाजूने, सूत्रांची माहिती
काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको - चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान
बीड तालुक्यातील वानगावजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, ट्रफिक पोलीस टिप्पर अडवत असताना घडला अपघात, बरेच वारकरी जखमी
बीड तालुक्यातील वानगावजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, ट्रफिक पोलीस टिप्पर अडवत असताना घडला अपघात, बरेच वारकरी जखमी
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीचे राज्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. मी याला पद नाही, जबाबदारी मानतो : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत दादा गेली साडेचार वर्षे अनेक खाती, जबाबदारी, विधानपरिषदेतील काम सक्षमपणे पाहत आहेत. कार्यक्षम मंत्री म्हणून प्रतिमा उभी केली पण त्यांचा मूळ पिंड संघटनात्मक कार्य आहे : मुख्यमंत्री
15 दिवसात कर्जमाफीची प्रकरणं पूर्ण करा, विमा कंपन्या आणि बँकांना उद्धव ठाकरेंचा इशारा, बँक खात्यातून शेतकऱ्यांची फसवणूक न करण्याचीही सूचना
आम्ही ज्यांचं अन्न खातो, त्यांना जागतो, मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी बांधील : उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक : उद्धव ठाकरे
मुंबई : डोंगरी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली, गृहनिर्माण मंत्री विखे पाटील, म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आणि संबंधित अधिकारी राहणार उपस्थित, दुर्घटनाग्रस्त इमारत कुठल्या प्राधिकरणाची होती याची जबाबदारी निश्चित करणार
कर्नाटक सत्तासंघर्ष : बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, विधानसभेत यायचं की नाही याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आमदारांना, उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरवाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
कल्याण : सकाळी ऐन गर्दीच्याच वेळी मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती, अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेच्या रेल्वेसेवेला फटका
दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 21 जणांची सुटका, बचावकार्य सुरुच
पार्श्वभूमी
1. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज कुलभूषण जाधव प्रकरणी अंतिम फैसला, संपूर्ण जगाचं निर्णयाकडे लक्ष, फाशीची शिक्षा टळण्यासाठी देशभर प्रार्थना
2. मुंबईतल्या डोंगरी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा बारावर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 21 जणांची सुटका, बचावकार्य सुरुच, दुर्घटनेच्या जबाबदारीवरुन म्हाडा आणि महापालिकेत टोलवाटोलवी
3. जागावाटपासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीची वेगवेगळी भूमिका, निम्म्या-निम्म्या जागांची राष्ट्रवादीची मागणी, तर मागच्या विधानसभा निकालानुसार जागावाटप व्हावं, काँग्रेसची भूमिका
4. मंत्री, आमदारांप्रमाणेच आता सरपंचही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय
5. राज्य सरकारकडून शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत चौपट वाढ, 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत मिळणार
6. तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा योग, मध्यरात्री 2 तास 29 मिनिटांचं खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा अनुभव