LIVE BLOG : दक्षिण मुंबईतून तब्बल 135 किलो सोनं जप्त, डीआरआयच्या पथकाची कारवाई
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 29 Mar 2019 10:22 PM
पार्श्वभूमी
1. मुंबईच्या दिशेने येणारं लाल वादळ थांबवण्यात सरकारला यश, किसान मोर्चावर सकारात्मक तोडगा, वन हक्क जमिनीचे दावे तीन महिन्यात निकाली काढणार2. धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यासोबतची बैठक निष्फळ, सरकारने तोंडाला पानं पुसल्याचा...More
1. मुंबईच्या दिशेने येणारं लाल वादळ थांबवण्यात सरकारला यश, किसान मोर्चावर सकारात्मक तोडगा, वन हक्क जमिनीचे दावे तीन महिन्यात निकाली काढणार2. धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यासोबतची बैठक निष्फळ, सरकारने तोंडाला पानं पुसल्याचा नेत्यांचा आरोप, धनगर आंदोलन सुरु होण्याची शक्यता3. 2018-19 आर्थिक वर्षासाठी ईपीएफच्या व्याजदरात वाढ, 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्के व्याजदर करण्याचा निर्णय4. सांताक्रुझच्या बेस्ट कँटीनमध्ये उंदरांचा सुळसुळाट, अस्वच्छतेचा कळस, कर्मचाऱ्यांसोबत प्रवाशांचेही आरोग्य धोक्यात5. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी, भारताच्या वाट्याचं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्याचा केंद्र सरकारचा निर्णय6. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, दोन रुळांच्या मध्ये पडल्याने जीव वाचला, काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत7. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध, तर पाकिस्तानकडून हाफीज सईदच्या 'जमात-उद-दावा' संघटनेवर बंदी
दक्षिण मुंबईतून तब्बल 135 किलो सोनं जप्त, डीआरआयच्या पथकाची कारवाई , सोनं तस्करांवर करण्यात आलेली आतापर्यंतची ही मोठी कारवाई
बीड : वाहन तपासणी दरम्यान एका कारमध्ये तब्बल साडे आठ लाख रूपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करून निवडणूक विभागाच्या आचारसंहिता पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.