LIVE BLOG | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली लगावली

अंबरनाथच्या डम्पिंग ग्राऊंडला आग लागली आहे. या आगीमुळे झालेल्या धुराच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 May 2019 11:23 PM
जालना: बनावट खत निर्मितीच्या कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांचा संयुक्त छापा फर्टिलायझर्स कंपनीतून 80 लाखांचे बनावट खत जप्त
सोलापूर : सोलापूर-हैदराबाद रोडवर दोन ट्रकची समोरासमोर धडक, हा अपघात इतका भयानक होता की ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला, या अपघातात एका ट्रकचा चालक गंभीरपणे जखमी झाला आहे. बसवराज वालेकर असे 40 वर्षीय जखमी चालकाचे नाव
ठाण्यातील सावरकरनगर येथील सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने आलेल्या वृद्ध दाम्पत्याने अक्षयतृतीयेनिमित्त ऑर्डर केलेल्या ग्राहकांच्या तब्बल साडेअकरा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेला हा प्रकार सीसी टीव्हीमध्ये कैद झाला असून वर्तकनगर पोलीस या वृद्ध जोडप्यासह त्यांच्यासोबत आलेल्या अन्य एका दाम्पत्याचा शोध घेत आहेत.

गोंदिया: तिरोडा येथे अदानी विद्युत निर्मिति प्रकल्पातील राख घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकची गोंदिया वरुण घोगरा कड़े जाणाऱ्या दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार, ट्रक फारार असून पोलिसांनीच ट्रक पळवण्यासाठी मदत केल्याचं नागरिकांचं वक्तव्य

गोंदिया: तिरोडा येथे अदानी विद्युत निर्मिति प्रकल्पातील राख घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकची गोंदिया वरुण घोगरा कड़े जाणाऱ्या दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार, ट्रक फारार असून पोलिसांनीच ट्रक पळवण्यासाठी मदत केल्याचं नागरिकांचं वक्तव्य
भिवंडी महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नालेसफाईत दिरंगाई, शहरात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
पुणे : कासारवाडीमध्ये ड्रेनेजचे काम सुरू असताना सुरक्षा भिंत कोसळली. दोन मजुरांसह एका लहान मुलाला सुखरुप बाहेर काढले, यशवंत प्राईड सोसायटीची ही सुरक्षा भिंत कोसळली
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू असलेल्या समृध्दी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परला इलेक्ट्रीक तारांचा स्पर्श झाल्याने टिप्पर जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली.
ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, गुन्हे शाखा व ठाणे शहरातील काही डॉक्टरांच्या पुढाकाराने सार्वजनिक ठिकाणी 'थुंकू नका आणि थुंकू देऊ नका' ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ठाणे शहरात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ 4 मे 2019 रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला .
सांगली : मुलास पोहण्यास शिकवताना वडिलाचा विहिरीत बुडून मृत्यू, सांगलीतील तासगावच्या बलगवडेमधील घटना
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज दिवसभर मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली लगावली, दिल्लीतील मोतीनगर येथे रॅलीमध्ये कानशिलात लगावली
बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कांचन कुल यांनी आपले पती आमदार राहुल कुल आणि मुलांसोबत घेतले विठ्ठल दर्शन
अंबरनाथच्या डम्पिंग ग्राऊंडला आग, धुराच्या त्रासाने नागरिक हैराण, नगरपालिका प्रशासनाकडून आगीकडे डोळेझाक

बीड: घरगुती भांडणातून सोन्याला झळाळी देणाऱ्या रसायनाने हल्ला, एक जखमी तर एकावर चाकू हल्ला
अंबरनाथच्या चिखलोली धरणाने गाठला तळ,

धरणात आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
,
धरणातून टँकरमाफियांची सर्रास पाणीचोरी
रत्नागिरी -- मुंबई गोवा महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली. 

रावसाहेब दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत रसद पाठवली. हर्षवर्धन यांनी सांगावं 50 लाख पकडले गेले ते कोणाचे होते. दानवे रोज हर्षवर्धन यांना रोज पैसे पाठवत होते. मी आढावा घेतला आहे. शिवसेना बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांचा नवा आरोप
रामटेकमधील उमरेड येथून स्ट्राँग रुमचे चोरुन नेलेले डिव्हीआर चोराने परत होते त्या जागी आणून ठेवले
विदर्भात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा, 5, 6 आणि 7 मे रोजी विदर्भामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी गावात 11 गायी, चार म्हशी दगावल्या,
चारा शोधता-शोधता कोवळ्या ज्वारी खाल्ल्याने जनावरं दगावली असल्याचे बोलले जात आहे
सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे आपल्या लष्कराने केला : राहुल गांधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांची पत्रकार परिषद लाईव्ह
न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार : राहुल गांधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांची पत्रकार परिषद लाईव्ह
लष्कराचा कोणीही अपमान करु नये : राहुल गांधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांची पत्रकार परिषद लाईव्ह -
बेरोजगारी हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा मुख्य मुद्दा,
अर्ध्या निवडणुकीनंतर मोदींचा पराजय निश्चित : राहुल गांधी
सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे आपल्या लष्कराने केला : राहुल गांधी
भाजप लोकसभा निवडणूक हरणार, राहुल गांधींना विश्वास
अमेरिकेत लँडिंगदरम्यान विमान रनवेवरुन घसरलं,
क्युबातून आलेल्या विमानाला अपघात, 136 जण प्रवास करत असल्याची माहिती
गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोटप्रकरणी माओवाद्यांविरोधात गुन्हा दाखल,
कंपनी चार टिपागड आणि कोरची दलमच्या माओवाद्यांविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल
फनी चक्रीवादळामुळे ओदिशात 8 जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत, वीज-मोबाईल नेटवर्कसारख्या सेवा ठप्प

पार्श्वभूमी

1. फनी चक्री वादळाच्या तडाख्यामुळे पूर्व किनारपट्टीवरचं जनजीवन विस्कळीत, दिवसभरात एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान, वादळाची ओदिशानंतर बंगालला धडक..

2. गारूड्यांचा साप हाताळणाऱ्या प्रियंका गांधींवर निशाणा साधताना मोदींचा नेहरूंवर हल्लाबोल, तर माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत प्रियंकांचा मोदींवर प्रहार

3. सहा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसची मोदींकडून खिल्ली, स्ट्राईकविरोधात निदर्शने करणारे आता मीटू मीटू करताहेत, राजस्थानातल्या सभेत मोदींचा हल्लाबोल

4.जावई हर्षवर्धन जाधवांसाठी दानवेंनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप, मातोश्री-वर्षासह शाहांच्या दरबारातही तक्रार

5.पानी फाऊंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला, नाशकातल्या चांदवडमधली संतप्त घटना,

6. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी वय चोरी करुन खेळला असल्याचे समोर, खुद्द आफ्रिदीकडून त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात खुलासा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.