पावसामुळे बत्ती गुल, विधानभवन अंधारात, कामकाज ठप्प
तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला धारेवर धरलं. अडीच तास पाऊस पडल्यानंतर जर व्यवस्था कोसळत असेल, तर हे सरकार महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला.
विधानभवना वीजपुरवठा होणाऱ्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने, मेन स्विच बंद करण्यात आला आहे. परिणामी विधीमंडळ अंधारात आहे.
त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज स्थगित झालं आहे. इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचलं आहे.
पावसामुळे नागपुरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईसारखीच परिस्थिती नागपूरमध्ये घडली आहे. नागपुरातील या परिस्थितीवरुन शिवसेनेने नागपूर महापालिका आणि प्रशासन म्हणजेच भाजपवर तुफान टीकास्त्र सोडलं.
वीज गेल्यामुळे विधीमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तासांचा अवधी लागेल, असं सांगितलं जात आहे
नागपूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीज पुरवठा खंडित झाला आहे.