Ganesh Visarjan LIVE | मनोभावे सेवा केल्यानंतर अखेर 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप

मुंबई-पुणे-नाशिकसह राज्यभरात वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला जाईल. पहाटेपासूनच गणेश भक्तांसह ढोल-ताशांच्या पथकांमध्ये लगबग दिसून येत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Sep 2019 11:03 PM
मुंबईत श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर तीन वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. बाप्पाचं दर्शन घ्यायला भाविकांनी अलोट गर्दी केली होती. दुसरीकडे गिरगाव चौपाटीवरही बाप्पाच्या विसर्जनासाठी गर्दी झाली आहे.
मनोभावे सेवा केल्यानंतर अखेर 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप, लालबाग राजावर तीन वेळा पुष्पवृष्टी, गिरगावचा राजा, गणेशगल्लीच्या राजाचं विसर्जन
ठाणे, वसई, भिवंडीतही बाप्पाला वाजत-गाजत निरोप, बाप्पाला निरोप द्यायला भक्तांची गर्दी, अंबरनाथमध्ये ५०० रूपयांच्या मोदकाचा ९२ हजारांना लिलाव
मुंबईत थायलंडच्या नागरिकांकडून बाप्पाची मिरवणूक, पुण्यात ब्रझिलियनकडून जयघोष, कोल्हापुरात संभाजीराजेंसह पोलंडच्या नागरिकांचा ठेका
गणपती विसर्जनानिमित्त चांद्यापासून बांद्यापर्यंत ढोल ताशांचा गजर, नेत्यांनी धरला ठेका, मुख्यमंत्र्यांकडून बाप्पाचं पर्यावरणपूरक विसर्जन
धुळे:

गणेश विसर्जन करण्यासाठी आलेला 16 वर्षीय युवक पांझरा नदीच्या प्रवाहात वाहून गेला, धुळे शहरातील पंचवटी भागातील घटना, तरुणाचा शोध सुरू, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं युवक पाण्यात वाहून गेला .
नाशिकचा रोकडोबा मित्र मंडळाचा गणपती मार्गस्थ , चित्ररथ सुंदर फुलांनी सजवण्यात आलाय
पुण्यातला मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु
पुण्यातला मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु
लालबागचा राजा सभा मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ
लालबागचा राजा सभा मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ
गणपती विसर्जनानिमित्त मुंबईतील चौपाट्यांवर चोख सुरक्षा व्यवस्था,
50 हजार पोलीस तैनात
पुण्यात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ढोलताशाच्या गजरात मानाचा पहिला कसबा गणपती मार्गस्थ
पुण्यात कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
10 ते 10.30 च्या सुमारास लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार,
मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात
धरणातून पाणी सोडल्याने चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली,
पंढरपुरात बाप्पाचे नदीत उतरुन विसर्जन न करण्याचे आवाहन
धरणातून पाणी सोडल्याने चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली,
पंढरपुरात बाप्पाचे नदीत उतरुन विसर्जन न करण्याचे आवाहन
गणेश गल्लीचा राजा मंडपाबाहेर, विसर्जनासाठी मार्गस्थ
गणेश गल्लीचा राजा मंडपाबाहेर, विसर्जनासाठी मार्गस्थ
मुंबईच्या राजाची आरती संपन्न, थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार

पार्श्वभूमी

मुंबई : दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यावर आज गणरायाला निरोप देण्यासाठी राज्यभरात जय्यत तयारी सुरु आहे. मुंबई-पुणे-नाशिकसह राज्यभरात वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला जाईल. पहाटेपासूनच गणेश भक्तांसह ढोल-ताशांच्या पथकांमध्ये लगबग दिसून येत आहे.

मुंबईत बाप्पाच्या निरोपाची तयारी
मुंबईतील 129 ठिकाणी 5 हजार 630 सार्वजनिक आणि 31 हजार 72 घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जलतरणपटू, नौदलाची मदत घेऊन बोटी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विसर्जनासाठी येणारं वाहन रेतीत अडकू नये म्हणून लोखंडी फळ्या लावण्यात आल्या आहेत. तर छोट्या गणेशमूर्तींसाठी 45 जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनावेळी चौपाटीवर 636 जीवरक्षकांसह 65 मोटार बोटींची व्यवस्था केली आहे. त्यासोबतच निर्माल्य कलश, विविध वाहनं, नियंत्रण कक्ष, आरोग्य विभागाकडून प्रथोमोपचार कक्ष उभारण्यात आले आहेत.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था
मुंबईतील गणपती विसर्जनासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. मुंबईतील रस्त्यावर तब्बल 40 हजारपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईतील सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता स्थानिक पोलिसांसोबत सशस्त्र दल, सीआरपीएफ, दंगल नियंत्रण पथक, मुंबई वाहतूक विभाग यांचा फौजफाटा रस्त्यावर हजर असेल. याबरोबरच होमगार्ड, आरएसपी, एनएसएस, एनसीसी स्काऊट गाईड आणि विविध एनजीओची मदत घेतली आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी व लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीत साध्या वेशातील पोलिस गस्तीवर असणार आहेत.

5000 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवलं जाणार आहे तर गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, आणि पवई तलाव येथे ड्रोनच्या सहाय्याने निरीक्षण केलं जाणार आहे.

रस्ते वाहतुकीसाठी बंद
वाहतुकीच्या नियमनासाठी 53 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर 56 रस्त्यांवर एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. मुंबईतील 99 ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले असून 18 ठिकाणी रस्ते मालवाहतूक वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

लोकलच्या विशेष गाड्या
अनंत चतुर्दशी निमित्ताने आज गणेश विसर्जनानंतर घरी परतण्याची गैरसोय होऊ नये म्हणून लोकलच्या विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर या विशेष गाड्या असतील. सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरारदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.

पुण्यात नदीकाठी विसर्जन हौद
गणपती विसर्जनासाठी पुणे महापालिकेकडून मुठा नदीच्या काठावर विसर्जन हौद तयार करण्यात आले आहेत. परंतु धरण क्षेत्रात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे आणि चारही धरणं शंभर टक्के भरलेली असल्याने मुठा नदीच्या पात्रात बऱ्यापैकी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाऊस थांबल्यास पाण्याचा विसर्ग कमी होऊ शकतो पण आजही पाऊस सुरुच राहिल्यास पाणीपातळीत वाढ होऊ शकते असं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुण्यात गणपतीचं विसर्जन करताना सर्वांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.