अॅट्रॉसिटीच्या समर्थनासाठी बीडमध्ये दलितांचा मोर्चा
या मोर्चामध्ये एक तरुण लग्नाचं बाशिंग बांधून थेट मोर्चात सहभागी झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मोर्चानिमित्त दीड हजारावर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्या सोबत पाच हजार स्वयंसेवकही नेमण्यात आले होते.
या मोर्चामध्ये सहभागी दलित समाजातील बांधवांना खाण्या-पिण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
मोर्चाच्या अनुषंगाने धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक गढी, मांजरसुंबा येथून वळवली होती.
या मोर्चामध्ये दलित, आदिवासी व भटके विमुक्त समाज बांधव पहिल्यांदाच निळ्या झेंड्याखाली एकत्रित झाले होते. विविध जातींचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याने या मोर्चासाठी पांढऱ्या रंगाचा ‘ड्रेस कोड’ करण्यात आला होता.
या मोर्चासाठी दलित ऐक्याची महिनाभरापासून मोर्चे बांधणी सुरु होती. वाड्या, वस्त्या, तांड्यांवर व तालुका, शहरस्तरावर बैठका घेण्यात आल्या.
कोपर्डीप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अॅरट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित ऐक्य मूक मोर्चा काढण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -