LIVE BLOG | लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीवर जाणार
देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 06 Mar 2019 10:33 PM

पार्श्वभूमी
सोलापुरातील विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार झाला म्हणजे आरक्षणाचा प्रश्न संपला असं होत नाही.. - भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांचं स्पष्टीकरण.. नामविस्तार कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडीनिवडणुका डोक्यावर...More
सोलापुरातील विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार झाला म्हणजे आरक्षणाचा प्रश्न संपला असं होत नाही.. - भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांचं स्पष्टीकरण.. नामविस्तार कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडीनिवडणुका डोक्यावर असताना निर्णयांचा सपाटा, शिक्षक-प्राध्यापकांना सातवा वेतन लागू, इतर 22 निर्णयांनाही मंजुरी2. 2011 पूर्वीचे गावठाण आणि सरकारी जमिनीवरची अतिक्रमित घरं नियमित करणार, ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय3. बारामती, माढा आणि नांदेडची जागा द्या, वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागणी, 22 जागांचाही आग्रह4. अजून घोषणा दिल्या तर तिकीटच कापेन, लॉबिंग करु पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा दम, माढ्यावरुन चंद्रकांत पाटलांनाही आव्हान5. हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत संस्थांवर पाकिस्तानकडून बंदी, तर मसूद अजहरच्या भावासह 44 अतिरेक्यांना अटक6. टीम इंडियाचा नागपूर वन डेत ऑस्ट्रेलियावर आठ धावांनी सनसनाटी विजय, कोहलीचं वन डेत चाळीसावं शतक, विजय शंकरची अष्टपैलू कमाल
प्रा. वामन केन्द्रे यांना एनएसडीचा ब.व.कारंथ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतिने दिला जाणारा ब.व.कारंथ स्मृति राष्ट्रीय रंग पुरस्कार हा यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रोख रूपये एक लाख,सम्मान चिन्ह,सन्मानपत्र,शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा आहे.