LIVE BLOG : डॉ. प्रमोद येवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवे कुलगुरू

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2019 10:49 PM
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ,

वाचनालयाला, मराठी शाळांना राज्य सरकार अनुदान देईल.मराठीच्या संवर्धनासाठी लागणारी संपूर्ण मदत राज्य सरकार करेल ,

आणखी २ मंत्र्यांची नियुक्ती सीमा भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून आश्वासनांची खैरात,
कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत पुढच्या महिन्यात निर्णय घेणार,
31 डिसेंबर 2019 पर्यंत पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत निर्णय होणार
पालघर : डहाणू- नाशिक बसला जव्हार नाशिक महामार्गावर मोखाडा मधील तोरंगण घाटात अपघात, भराव खचलेला असल्याने बस घसरली, सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप
चिपळूण : महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी
औरंगाबाद- पुणे महामार्गावरील दहेगाव जवळील वीस नंबर खोलीजवळ अपघात, गतिरोधकावर ट्रकचा वेग मंदावल्याने कार धडकून अपघात, यात गंगापूर येथील डॉक्टर अमोल वावरे यांचा जागीच मृत्यू , तर त्यांच्यासोबत असलेले मुकुंद पाठे गंभीर जखमी
नागपूर : नागपूर महानगर पालिकेचा महत्वाचा निर्णय, अत्यल्प पावसामुळे नागपूरला 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय, बुधवार, शुक्रवार, रविवारी ला पाणीपुरवठा होणार नाही
डॉ. प्रमोद येवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवे कुलगुरू.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती.
रत्नागिरी : पुरात अडकलेल्या 6 जणांना वाचवण्यात यश
,
खेड तालुक्यातील सुसेरी गावात अडकले होते 6 जण

नारंगी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकले होते 6 जण
,
खेडच्या मदत ग्रुपने वाचवले 6 जणांचे प्राण
रत्नागिरी : पुरात अडकलेल्या 6 जणांना वाचवण्यात यश
,
खेड तालुक्यातील सुसेरी गावात अडकले होते 6 जण

नारंगी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकले होते 6 जण
,
खेडच्या मदत ग्रुपने वाचवले 6 जणांचे प्राण
मुंबई : मराठा आरक्षणानंतर खुल्या प्रवर्गातील मेडिकल प्रवेशाच्या जागा कमी झाल्या आहेत.
आरक्षणामुळे ज्यांचे प्रवेश होणार नाहीत, अशा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खासगी,अभिमत विद्यापीठातील प्रवेशाच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार आहे. या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण होईपर्यंत शुल्क प्रतिपूर्ती करणार, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
सातारा : आमदार जयकुमार गोरेंना पाडण्यासाठी सर्वपक्षीय बैठक, बैठकीत राष्ट्रवादी, रासप, भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित, कोणीच पक्ष प्रमुखांचे ऐकणार नाही, बैठकीत निर्णय, आमदार जयकुमर गोरेंनी दुष्काळी भागासाठी काम केले नसल्याचा आरोप
भंडारा : चुल्हाड गावातील तलावात बुडून 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, दीनदयाल शरणागत असं मृत व्यक्तीचं नाव
भंडारा : चुल्हाड गावातील तलावात बुडून 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, दीनदयाल शरणागत असं मृत व्यक्तीचं नाव
मुंबई : बेळगाव सीमाप्रश्नी शिवसेना पुन्हा आक्रमक होणार आहे. बेळगाव सीमाप्रश्नावर महाराष्ट्र एकीकरण समितीने आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे खासदार लवकरच बेळगावचा दौरा करणार आहेत. तसंच बेळगाव सीमाप्रश्नावर शिवसेनेचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे.
रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद, रस्त्यावर मोठी दरड आणि दगड आल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने मार्ग पूर्णपणे बंद
रत्नागिरी

: उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस, वाशिष्ठी नदी पुलावरील वाहतूक अवजड वाहनांसाठी बंद,

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली
तांत्रिक कारणांमुळे चांद्रयान-2चं प्रक्षेपण इस्रोनं थांबवलं, क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन भरताना अडचणी

पार्श्वभूमी

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर




    1. तांत्रिक कारणांमुळे चांद्रयान-2चं प्रक्षेपण इस्रोनं थांबवलं, क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन भरताना अडचणी, प्रक्षेपणासाठी इस्रो नवी तारीख जाहीर करणार





    1. क्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता, आधी 50-50 आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये अंतिम सामना टाय, सर्वाधिक चौकार आणि षटकारांच्या निकषानुसार इंग्लंड विश्वविजेता





    1. तब्बल 5 तासांच्या लढतीनंतर सर्बियाच्या ज्योकोविचची स्वित्झर्लंडच्या रॉजेर फेडररवर मात, ज्योकोविचला सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचं विजेतेपद





    1. राज्यात विधानसभेसाठी 10 सप्टेंबरपासून आचारसंहिता तर 10 ऑक्टोबरपासून निवडणुका, गिरीश महाजनांनी सांगितला विधानसभेचा मुहूर्त, दिवाळीआधीच विधानसभेचं बिगुल वाजण्याचे संकेत





    1. अहमदाबादमध्ये आकाशपाळणा कोसळून दोघांचा मृत्यू, तर 29 जण जखमी, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद





    1. घरी असताना फावल्या वेळेत काय करता हे सरकारला सांगावं लागणार, केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून सर्व्हेला सुरुवात


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.