आज दिवसभरात... 28 जानेवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 28 Jan 2019 10:37 PM

पार्श्वभूमी
1. मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी, मागास प्रवर्गाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना देण्यावर निर्णय होणार2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र, भाजपची जालन्यात तर शिवसेनेची मुंबई बैठक, राजकीय प्रस्तावांवर चर्चा...More
1. मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी, मागास प्रवर्गाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना देण्यावर निर्णय होणार2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र, भाजपची जालन्यात तर शिवसेनेची मुंबई बैठक, राजकीय प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता3. पोकळ स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते, नितीन गडकरींचा सूचक इशारा, गडकरी मोदींविरोधात बोलल्याची दबक्या आवाजात चर्चा4. आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणात तपास अधिकाऱ्याची बदली, चौकशीला विलंब केल्याचा ठपका, सीबीआयकडून मात्र अधिकृत निवेदन नाही5. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर, घटनापीठापुढील उद्याची सुनावणी रद्द, न्यायमूर्ती बोबडे अनुपस्थित राहणार असल्याने निर्णय6. भारत-न्यूझीलंड दरम्यान आज तिसरा एकदिवसीय सामना, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, मालिका विजयाची भारताला संधी
जालना | शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या रावसाहेब भवरची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडून हात वर, जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्याने भवरची हकालपट्टी केल्याची दानवेंची माहिती, मारहाणीचं कदापि समर्थ नाही, पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना